यंदा गरब्याचे  ढोल ऑनलाइनच.. पण माहौल तर तयार होणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:38 PM2020-10-15T14:38:36+5:302020-10-15T14:38:47+5:30

शाळा ऑनलाइन भरतात, ऑफिसच्या मीटिंग झूमवर चालतात, डान्स क्लासही होतातच ऑनलाइन. मग गरबा ऑनलाइन का शक्य नाही? आणि माहौलचं काय? माहौल मनानं ठरवलं की तयार होतोच, 

This year, Garbha's drum is only online .. but the atmosphere will be ready! | यंदा गरब्याचे  ढोल ऑनलाइनच.. पण माहौल तर तयार होणारच!

यंदा गरब्याचे  ढोल ऑनलाइनच.. पण माहौल तर तयार होणारच!

Next

- सारिका पूरकर -गुजराथी

* शाळा ऑनलाइन भरतात, ऑफिसच्या मीटिंग झूमवर चालतात, डान्स क्लासही होतातच ऑनलाइन. मग गरबा ऑनलाइन का शक्य नाही? आणि माहौलचं काय? माहौल मनानं ठरवलं की तयार होतोच, असं म्हणणा:या अनेक उत्साहींनी गेले काही दिवस ऑनलाइन गरबा क्लासेस, गरबा प्रॅक्टिस उत्तम केली. आपापले ग्रुप बनवून कॉन्फरन्स गुगल, झूमवर ऑनलाइन गरबा खेळायचे प्लॅन केले. ड्रेसकोड ठरले. ज्वेलरी ठरली.
*आता मस्त नटूनथटून गरबा नाइट घरच्या घरी रंगणार आहेत. साईन अप, रजिस्ट्रेशन या सिंपल स्टेप्स फॉलो करून झूमवर गरबा खेळण्याची संधी अनेक नामांकित ग्रुप्सनेही आता उपलब्ध करून दिली आहे. ही लिंक फॉवरवर्ड करून फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत मस्त गरबा घरातच खेळता येणार आहे.
*यापूर्वी गरबा कॉम्पिटिशनमध्ये मैदानावरचा परफॉर्मन्स पाहून बेस्ट जोडी, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट डान्स, बेस्ट स्टेप्स अशी अनेक बक्षिसे दिली जात होती. यंदा मैदानातील नाही तर ऑनलाइन परफॉर्मन्स पाहूूनही बक्षिसे दिली जाणार आहेत. गुजरातमध्ये अनेक ग्रुप्सने ऑनलाइन गरबा स्पर्धा ठेवल्या आहेत. स्पर्धकांनी व्हिडिओ बनवून ते संबंधितांर्पयत पोहोचवायचे आहेत. त्यातून मग विजेते ठरणार आहेत. गरबा ‘होम हा नवा ट्रेण्ड यंदा गाजणार अशी चिन्हं आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देश-परदेस-ऑल-ऑनलाइन
कोरोनामुळे गरबा नाही म्हणून खरं तर मन खट्ट झालं होतं. कारण दरवर्षी माङयाकडे गरबा शिकण्यासाठी झुंबड उडायची. यंदा कोणीच इंट्रेस्टेड नसणार असंच वाटत होतं; पण ऑनलाइन क्लासेसची मागणी होऊ लागली. मग झूमवर मी गरबा क्लास घेऊ लागले. उत्तम प्रतिसाद होता, यंदा या मरगळ वातावरणात अनेकांना गरबा हे काहीतरी नवीन शिकण्याचं, उत्साहाचं माध्यम वाटलं. एरव्ही तरी स्थानिकच लोक बॅचला यायचे, यंदा ऑनलाइन असल्याने देश-परदेशातले अनेकजण क्लासला ठरल्यावेळी ऑनलाइन जमू लागले.’
- हेतल गंगानी, 
गरबा डान्सर, कोरिओग्राफर, गोवा

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

यंदा ऑनलाइन मजा करणार!
दरवर्षी गरबा मोठय़ा ग्रुप्सच्या इव्हेंटमध्ये जाऊन एन्जॉय केलाय. मात्र यावर्षी ऑनलाइन गरबा खेळणार आहे. तयारीही जोरदार केलीय त्यासाठी. विशेष म्हणजे यामुळे माझ्या परिवारासोबत गरबा खेळता येणार आहे. दरवेळेस मित्र -मैत्रिणींसोबत गरबा खेळण्यात दंग असायचे; पण यंदा फॅमिली गरबा. त्याची गंमतच वेगळी असणार आहे. खूप उत्सुकता आहे, गरब्याच्या या नव्या फॉर्मची पण.
- शालिनी काला, 
गरबाप्रेमी

 


( सारिका मुक्त पत्रकार आहे.)

queen625@gmail.com

 


 

Web Title: This year, Garbha's drum is only online .. but the atmosphere will be ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.