शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

यवतमाळचे 90 विद्यार्थी आणि केरळमधले 13 दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 7:00 AM

यवतमाळच्या सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयातले 90 विद्यार्थी ‘टीम राहत’ बनून केरळमध्ये प्रत्यक्ष मदतीला गेले तेव्हा.....

ठळक मुद्देही मुलं पुन्हा यवतमाळात पोहोचली त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तकापलीकडच्या समाजकार्याच्या शिक्षणाची एक नजर तयार झाली होती.

-ज्ञानेश्वर मुंदे

नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा माणुसकीचं विलक्षण दर्शन होतं. लोक एकमेकांच्या मदतीला धावतात. आपसातले सारे भेद विसरून एकजूट होऊन कामाला लागतात. अलीकडेच केरळच्या भयंकर पुरात हे सारं अनुभवायला आलं. देशभरातून मदतीचे ओघ सुरू झाले.मात्र यवतमाळच्या एका महाविद्यालयातल्या तरुण मुलांनी ठरवलं की नुसता निधीच का गोळा करून द्या, आपण स्वतर्‍ मदतीला जायला हवं. त्यानुसार मग यवतमाळच्या सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी थेट केरळलाच गेले. प्रा. घनश्याम दरणे यांच्या नेतृत्वात एक-दोन नव्हे तब्बल 90 विद्यार्थी केरळमध्ये पोहोचले. त्यात 27 मुलींचा समावेश होता. या मुलांनी ठरवलं की, समाजकार्य विषयाचे शिक्षण पुस्तकांतून घेतोच आता गरजेच्या वेळी थेट मैदानात उतरू. मात्र तिथं जायचं तर सगळ्यात मोठा अडसर भाषेचा होता. पण जमेल तशी त्यावरही मात करू, असं म्हणत ही मुलं केरळला पोहोचली. तिथं 13 दिवसांत सहा जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गावांमध्ये ‘टीम राहत’ या नावानं त्यांनी जमेल तशी मदत पोहोचवली.यवतमाळचे सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाने आतार्पयत गुजरात भूकंप, त्सुनामी, बिहार पूर आदी संकटातही अशी प्रत्यक्ष मदत केली आहेच. केरळला जाण्यापूर्वी या तरुण मुलांनी शहरातून एक मदतफेरी काढली. त्या मदतफेरीत मोठा औषधी साठा जमा केला तोही सोबत नेला होता. प्रा. घनश्याम दरणे सांगतात, दोन दिवसांच्या 1200 किलोमीटरच्या प्रवासानं आम्ही सगळे थकलो होतो. मात्र केरळमध्ये उतरलो, तिथली परिस्थिती पाहिली आणि झडझडून कामालाच लागलो. थकवा पळालाच, कामाला लागलो. सर्वप्रथम सोबत आणलेली औषधं वैद्यकीय शिबिरार्पयत पोहोचविली. सुरुवातीला ऐर्नाकुलम जिल्ह्यातील 35 गावांचं या  टीमने वस्तुस्थितीदर्शक सव्रेक्षण केलं. त्याचा एक अहवाल तिथल्या  जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. पथनामथिट्टा जिल्ह्यातील तीन गावातील गाळ काढून स्वच्छ करण्याचं काम या चमूने रामकृष्ण मिशन, गुंज संस्था व एसीसी (सीएसआर) ग्रुप सोबत केलं. इथं भेटणार्‍या प्रत्येक माणसाची एक कहाणी होती. प्रत्येकाला ऐकून घेणारं कुणीतरी हवं होतं. कोमल गोरडे सांगते, ‘मी  एर्नाकुलम जिल्ह्यात पट्टनथटी गावात गेले. तेव्हा नव्यानंच डिजिटल झालेल्या शाळेतील सर्व संगणक पाण्यात भिजून गेले होते. ग्रंथालयातील पुस्तकंसुद्धा ओली चिंब झाली होती. मोठय़ांनी मुलांना दूरच्या नातेवाइकांकडे पाठवलं होतं. जीवहानी कमी होती तरी मानसिक धक्का बसलेल्या स्त्रिया आमच्या आजूबाजूला विमनस्क चेहर्‍यानं बसल्या होत्या. मी हलकेच एका आजीच्या खांद्यावर थोपटलं तर ती आजी माझ्या स्पर्शाला आसूसल्यासारखी मला बिलगली.  रडलीच.  ती मल्याळीमध्ये काहीतरी पुटपुटत होती. मला भाषा कळली नाही; पण तिला मात्र मन मोकळं करता आलं याचा आनंद वाटला. हे एवढं करणंही त्याक्षणी तिच्यासाठी किती मोलाचं होतं, असं क्षणभर वाटून गेलं.शिवानी भोयर सांगते, अश्वमुल्ला गावातील अथीना भेटली तेव्हा अगदी शांत होती. आम्हाला एकमेकींची भाषा समजत नव्हती; पण तिथं तिचं घर पाहिलं. तिची सगळी महत्त्वाची सर्व कागदपत्रे या पुरात वाहून गेली होती, पण ती वैतागली नव्हती. हिमतीनं सारं उभं करायचं म्हणत होती. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा या कवितेचा अर्थ मला इथं कळला.’

केरळमध्ये या तरुण मुलांनी 18-18 तास काम केलं. कुणाच्या घरातील गाळ काढ, तर कुणाला मानसिक आधार दिला. पेयजलाची शुद्धता, आरोग्य, स्वच्छता आणि गुरांच्या वैरणाचीही व्यवस्था या विद्याथ्र्यानी केली. दिवसभर मदत केल्यानंतर जेवणाची आणि निवासाची कोणतीही सोय नसायची. कोणत्या तरी शिबिरात जेवायचे आणि रात्री मंदिर अथवा चर्चमध्ये मुक्काम करायचा. 13 दिवस या विद्याथ्र्याचा हाच दिनक्रम होता. मल्ल्याळी भाषा कुणालाही येत नव्हती. देहबोलीचा वापर करून संवाद साधला जात होता. संकटात केवळ हृदयाचीच भाषा समजते. याचा अनुभव या टीमने घेतला. प्रा. राजू केंद्रे यांनी या टीमसोबत समन्वय ठेवून नेमकं कुणी कुठं आणि कोणतं काम करायचं याचं मार्गदर्शन केलं. ही मुलं पुन्हा यवतमाळात पोहोचली त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तकापलीकडच्या समाजकार्याच्या शिक्षणाची एक नजर तयार झाली होती.

 

**

 प्रत्यक्ष आपत्तीग्रस्त भागात मुलांना घेऊन जाऊन काम करण्याचा हा माझा चौथा अनुभव. ही आमची चार भिंतीपलीकडील जोखीम पत्कारलेली एक वेगळीच शाळा असते. प्रथम आम्ही जोखीम पत्करतो आणि त्यानंतर विद्यार्थी पत्करतात. खर्‍या अर्थानं हे जीवन शिक्षण असतं.-प्रा. घनश्याम दरणे, पथकप्रमुख, टीम राहतसावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ

------------------

चार दिवस फिल्डवरमी ईडुकी जिल्ह्यातील चेंगनूर तालुक्याच्या चेरियानाड, पानाड, आला व पेरीसिरी गावात चार दिवस राहून लोकांच्या गरजांचं छोटेखानी सर्वेक्षण केलं. मदत साहित्याचं प्रत्यक्ष घरोघरी जाऊन वाटप केलं. आपत्तीत सापडलेल्या माणसांना मदत करतानाही त्यांचा स्वाभिमान जपायला हवा असं आम्हाला प्रशिक्षणात शिकवतात. म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवता आलं. 

- नीलय आगलावे