शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

तरुण मुलं का म्हणतात, पॉलिटिक्स नक्को यार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:19 PM

निवडणुका झाल्या, निकाल लागले, नवमतदारांचा कल कुणाला अशी चर्चाही झाली. प्रत्यक्षात मात्र तरुण मतदारांनी मतदान फार केलंच नाही, ते लांबच राहिले सार्‍या प्रक्रियेपासून आणि काहीसे उदासीनही. असं का झालं?

ठळक मुद्देतरुण मतदार राजकारणापासून असा फटकून का वागतो आहे?

- राहुल गायकवाड

मैत्रीत राजकारण नको.- हे वाक्य तरु णांच्या तोंडी नेहमी असतं.जाऊ दे ना यार, आपण कशाला पॉलिटिक्स करायचं असं कुणीही पटकन म्हणतं.त्याही पुढं जाऊन राजकारणाचा इन जनरल विषय निघालाच तर, पॉलिटिक्सचा नि आपला काही संबंध नाही, असं सांगणारेही अनेक.एकीकडे नवमतदार, युवा मतदार, युवा नेते, कार्यकर्ते, सोशल मीडियातले कार्यकर्ते यांची चर्चा जोरदार असते. नवमतदारांचा कल कुणाला, म्हणून माध्यमांत चर्चा होतात आणि दुसरीकडे मतदानाचा टक्का घसरतो. त्यातही तरुण मुलं मतदानाला जात नाहीत, गेले तरी सेल्फी पुरते. त्यात राजकारण समजून घेणं हे कमीच असं चित्रही सर्रास दिसतं. सध्या राजकारण या शब्दाचे समानार्थी शब्द म्हणजे आरोप-प्रत्यारोप, पक्षांतरं आणि त्यातले फायदे-तोटे, कट- कारस्थानं असंच तारुण्याला वाटू लागलं आहे असं तरुण मुला-मुलींचं मत. तसं ते स्पष्ट बोलूनही दाखवतात कट्टय़ांवर. विधानसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीतही तरुण नवमतदार म्हणजेच फस्ट आणि सेकंड टाइम व्होर्ट्सनी फार रस घेतला नाही असंच एकूण वातावरण. आकडेवारी हाताशी नसली तरी कॉलेज कट्टय़ांवर, नेहमीच्या तरुण अड्डय़ांवर फिरून तपासून पाहिलं तर अनेकांना कोण कुणाचा उमेदवार, कोणाचा कुठला पक्ष हेही नीट माहिती नव्हतं. विशेषतर्‍ शहरी भागातलं हे चित्र. राज्याच्या मतदानाची टक्केवारीसुद्धा कमीच. त्यात शहरी मतदान तर आणखी कमी. नेमकं काय कारण आहे की तरुण मतदार इतका उदासीन आणि अलिप्त राहिला, आता नवीन सरकार येईल तर आपलं भविष्याशी त्यांचं काही नातं आहे असं या तारुण्याला वाटतं की नाही हे शोधून पाहण्याचा प्रयत्न केला.पुण्यात अनेक तरुण कट्टय़ांवर मुलांना बोलतं केलं आणि विचारलंच की, राजकारण तुम्ही सिरीअसली घेता की नाही? आणि त्याचं गांभीर्य वाटत नसेल किंवा कनेक्टच वाटत नसेल तर त्याचं कारण काय? पॉलिटिक्स . राजकारण हा शब्द उच्चारला तरी अनेकजण पटकन सांगत, त्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही बरं का, तेवढं सोडून बोला.हे असं का, असं खोलात जाऊन विचारलं तरी मुलं-मुली फार बोलत नाही. पण तरी एक लक्षात येतं की, त्यांना राजकारण, सरकार याबाबत फारसं जाणून घेण्याची, माहिती घेण्याची इच्छाच नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचीसुद्धा त्यांची इच्छा नाही. त्यातच कोणीही निवडून आलं तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही असा पक्का समज. त्यामुळे मतदान करण्याविषयीची आणि लोकशाही  प्रक्रियेविषयी तरुणांमध्ये अनास्थाच फार.  त्यातच विविध माध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून चालविल्या जाणार्‍या प्रपोगंडामुळे इतकी माहिती येऊन आदळते की कोण बरा, कोण बुरा, कोण खरंच सांगतो आणि कोण ब्रॅण्डिंग करतं, हे काहीच कळत नाही. त्यापेक्षा यापासून लांब राहिलेलंच बरं असं अनेक मुलं सांगतात. एकीकडे तरुणांची मतदानाविषयी, राजकारणाविषयी अनास्था असली तरी अनेक तरु ण हे राजकारणाकडे एक करिअर म्हणून बघताहेत. लोकशाही बळकट व्हावी आणि देश संविधानाच्या आधारे चालावा अशी त्यांची इच्छा आहे. परंतु सध्या राजकारणात विकासाच्या मुद्दय़ांऐवजी वैयक्तिक होणारे हल्ले, आरोप-प्रत्यारोप यांमुळे तरु णांमध्येदेखील एक निराशेची भावना निर्माण होताना दिसत आहे. निवडणूक आयोग, माध्यमांची कमी होत चालली विश्वासार्हता या सगळ्यामुळे आपण राजकारणात कोणासाठी यायचे असा प्रश्नही आता या तरु णांसमोर पडला आहे.म्हणजे एकीकडे तरुण मतदार राजकारणापासून लांब आणि दुसरीकडे ज्यांना सक्रिय राजकारणात रस आहे त्यांना त्या व्यवस्थेत आपण शिरकावच कसा करणार असाही प्रश्न आहे. पैसा, बडी आडनावं, घराणेशाही, यापलीकडे तरुणांना राजकारणात काही वाव आहे का, असा प्रश्नही तरुण राजकीय कार्यकर्ते विचारतात. सर्वच पक्षांत जर दादा-भाऊ-ताईंचं नेतृत्व करणार असतील तर तरुण धडाडीच्या राजकीय कार्यकत्र्याना ‘स्पेस’ कुठं आहे, असा प्रश्नही राजकीय कार्यकर्ते विचारतात.मात्र त्यांच्या या प्रश्नांचं उत्तर व्यवस्थेकडे नाही.त्यामुळे एकीकडे तरुण नवमतदार उदासीन, दुसरीकडे तरुण राजकीय कार्यकर्ते आपली स्पेस शोधण्याच्या संघर्षात असं एकूण चित्र दिसतं आहे.जे अर्थातच फार बरं नाही.निवडणूक संपली, तरी या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच हवी नाहीतर तरुणांची ही राजकीय अनास्था लोकशाहीला घातक ठरू शकते.

***********

राष्ट्रवादीची कार्यकर्ती संध्या सोनवणे हिच्याशी बोलल्यावर जाणवलं की तरु णांची, नागरिकांची निवडणुकीविषयी असलेली अनास्था पाहता राजकारण चुकीच्या दिशेने चाललं असल्याचं तिला वाटतं. ती म्हणते, तरुणांच्या असलेल्या अपेक्षा मागण्या, विविध पक्षांकडून, उमेदवारांकडून पूर्ण केल्या जात नाहीत. त्यातच निवडणुका या शिक्षण, रोजगार या मुद्दय़ांवर न होता, इतर भावनिक तसेच आरोप-प्रत्यारोपांवर होत असल्याने तरु ण त्याकडे दुर्लक्ष करणंच पसंत करतात. दिवसेंदिवस राजकारणाची पातळीदेखील खालवत चालल्याने लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा आता बदलतोय. राजकारण हे सर्वसामान्यांसाठी नाही असं आता तरुणांना वाटू लागलं आहे. राजकारणी लोक त्यांच्या मुख्य प्रश्नांवर भर देत नाहीत, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागीच व्हायला नको असं तरु णांना आता वाटतं आहे. त्यातच राजकारणात असलेल्या घराणेशाहीमुळे इतर तरु णांना डावललं जात असल्यानं राजकारणात न पडण्याचा विचार तरु णांकडून केला जात आहे. त्याचबरोबर माध्यमं ज्या पद्धतीने ओपिनियन पोलच्या माध्यमातून किंवा एरव्हीही जे चित्र उभं करत आहेत, त्यामुळेही तरुण मुलांना नेमका राजकारणाचा अंदाज येत नाही.

*************महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा कार्यकर्ता असणारा कल्पेश यादवचंही मत हेच की, तरु णांमध्ये एक चीड आहे. त्यांना रोजगार नाही, योग्य शिक्षण नाही, असं असताना जर राजकारणी इतर मुद्दय़ांवर भर देत असतील तर मतदान कशासाठी करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे. एकीकडे तरु णांच्या मनात राग असताना दुसरीकडे माध्यमं जर त्यांचा राग मांडत नसतील तर तरु णांना हे पाहून एक प्रकारे निराशा येते. तरु णांच्या मुद्दय़ांना हात जर घातला नाही किंवा त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना प्रचारात, राजकारणात स्थान दिलं नाही तर तरु णांची मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची संख्या अजून कमी होत जाईल असं त्याला वाटतं.

***************तरु णांना जर राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली तर तरु ण निश्चितच मतदान करतात असं मत कॉंग्रेसची कार्यकर्ती कल्याणी माणगावे मांडते. ती म्हणते,  आताच्या निवडणुकांत ज्या ठिकाणी तरु ण उमेदवार होते, तेथे मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसून आलं. तरु ण उमेदवार असल्यास तो आपला मित्र आहे असे तरु णांना वाटते. तसेच तो आपले प्रश्न समजावून घेऊन मांडू शकतो याची त्यांना खात्री पटते. ज्येष्ठ नेत्यांशी तरु ण फारसे रिलेट करत नाहीत. तंत्रज्ञानाच्या युगात ते आपले प्रश्न किती समजावून घेऊ शकतील याची त्यांना शंका वाटते. त्यातच राजकारण म्हणजे ज्यांना आयुष्यात काही जमलं नाही ते राजकारणत येतात असंच समीकरण गेली अनेक दशके मांडलं जात आहे. त्यामुळे यात बदल होण्याची खर्‍या अर्थाने गरज आहे. 

 

(राहुल लोकमत ऑनलाइन पुणे येथे वार्ताहर आहे.)