शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

प्रोटीन पावडर कशाला? हा घ्या, घरच्या घरी ‘हेल्दी’ पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:37 IST

व्यायाम करण्याचा हंगामी अटॅक हल्ली सरसकट येतो. पण आहाराचं काय? सर्रास प्रोटीन पावडरी खाण्याची चूक महागात पडू शकते!

ठळक मुद्देआहार दिसायला फॅन्सी असण्यापेक्षा आणि उगीचच महागडा असण्यापेक्षा तो उपयुक्त आणि पौष्टिक असेल याची काळजी घेतली तर त्याचा अधिक फायदा होईल.

- वैद्य राजश्री कुलकर्णी

आपल्याकडे अनेक गोष्टी ‘सिझनल’ करायची पद्धत आहे. म्हणजे अमुक एक गोष्टीचे असे वर्षातून ठरावीक वेळी अटॅक येतात. हंगामी अटॅक. हिवाळा आणि व्यायाम याचंही असंच आहे. दिवाळी संपली, वातावरणात गारवा वाढला की जिम, जॉगिंग ट्रॅक, वेगवेगळे स्पोर्ट्स क्लब गर्दीने अगदी फुलून जातात. कधीकधी तर ट्रॅकवर चालायला जागा नसते अशी सकाळी आणि संध्याकाळी परिस्थिती  असते. अचानक सगळे ‘हेल्थ कॉन्शस’ होतात आणि पळायलाच लागतात.  त्यातही तरुण मुलामुलींचा (विशेषतर्‍ मुलांचा भरणा) अधिक. सिक्स पॅक, बायसेप्स, ट्रायसेप्स, टोण्ड बॉडी हे शब्द अनेकांना हाका मारायला लागतात. शरीर पिळदार झालं पाहिजे, मसल्स कसे वेगवेगळे दिसले पाहिजेत, शरीरावर कुठेच फॅट्स साठलेले दिसता कामा नयेत, फक्त मस्क्युलर बॉडी दिसली पाहिजे असं काहीसं डोक्यात ठेवून मुलांचे त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू असतात.आयुर्वेद याविषयी फार छान मार्गदर्शन करते. आपण हिवाळ्यातच इतक्या उत्साहानं व्यायाम का करतो बरं? त्याचंही शास्त्नीय कारण आहे ते म्हणजे उन्हाळ्यात आधीच दिवसभर गरम हवा, घामघाम यामुळे आपल्या शरीरातील पाणी किंवा फ्लूइड्स यांचा लॉस होतो आणि क्षार कमी झाल्यानं आपण पटकन थकून जातो .याउलट हिवाळ्यात घाम अजिबात येत नाही! जर आपल्याला वजन किंवा शरीरातील चरबी, फॅट्स कमी करायचे असतील तर घाम येईर्पयत व्यायाम करण्याची आवश्यकता असते. साहजिकच हिवाळ्यात जेव्हा भरपूर शारीरिक कसरत किंवा व्यायाम करू, तेव्हाच घाम येतो आणि मग पुष्कळ वेळ व्यायाम केल्याने शरीर कमावणं किंवा सिक्स पॅक, अ‍ॅब्स डेव्हलप करणं शक्य होतं; पण व्यायाम करीत असताना नुसता नादिष्टपणे करून उपयोगी नाही, त्याबरोबर इतरही अनेक गोष्टींचा विचार करायला हवा नाहीतर पायात गोळे येणं, प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा जाणवणं, अंग दुखणं अशा अनेक प्रकारच्या तक्र ारी उद्भवू शकतात.  म्हणजे व्यायामाला आहाराची जोड हवी. आणि तिथंच गाडं अडतं, योग्य डाएट करायचं कसं?डायटचं फॅड मनात ठेवून व्यायाम केल्यास शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. याच दिवसांत विविध पौष्टिक औषधे, प्रोटीन सिप्लमेंट्स, काही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या यांच्या जोरदार जाहिराती झळकू लागतात आणि यातील आपल्याला  काय आवडेल, पटेल, आकर्षित करेल ते प्रत्येक जण घ्यायला लागतो. त्यावर मस्त डेव्हलप झालेल्या पिळदार मसल्सचे फोटो असतात त्यामुळे तरु ण मुलं पटकन आकर्षित होतात आणि जाहिरातींना भुलून बळी पडतात, पण या कृत्रिम प्रोटीन पावडरी घेऊन खूप उपयोग झाल्याचं दिसून येत नाही कारण त्या पचायला खूप जड असतात. यापेक्षा आपल्या रोजच्या आहारात असे पदार्थ हवेत की जे उत्तम पोषण देतील आणि  चांगल्या पद्धतीने पचतील व शक्तीही देतील. आहार दिसायला फॅन्सी असण्यापेक्षा आणि उगीचच महागडा असण्यापेक्षा तो उपयुक्त आणि पौष्टिक असेल याची काळजी घेतली तर त्याचा अधिक फायदा होईल.

त्यासाठी या काही गोष्टी करून पहा.

1. काजू, बदाम, किसमिस, अक्रोड, पिस्ते, जर्दाळू, खारीक, खोबरं, खजूर या सगळ्या सुक्यामेव्याचा समावेश होतो. तसेही थंडीच्या दिवसांत हे पदार्थ वापरून लाडू करायची आपल्याकडे पद्धत आहेच! शरीराची ऊब टिकविण्यासाठी यात गूळ, तीळ, खसखस यांचाही वापर करता येईल. नैसर्गिक पोषण मूल्यं, अँटी ऑक्सिडण्ट्स त्यातून मिळतील. निसर्गातील प्रथिने व स्निग्ध पदार्थ अधिक गुणकारी असतात.*आहारात गायीचं दूध आणि तूप अवश्य ठेवावं. * थंडीच्या दिवसांत मिळणारी फळं म्हणजे बोरं, आवळे, पेरु  खावीत. ऊस, हरबरे, मटार, ताजी गाजरे, वांगी, वाल, या भाज्या स्वास्थ्य उत्तम राखतात.* व्यायाम करून आल्यानंतर अंगाला तिळाचं किंवा खोबर्‍याचं तेल लावून थोडा मसाज करावा मग हरबरा डाळीचं पीठ आणि हळद एकत्न करून ते मिश्रण अंगाला चोळावं म्हणजे घाम, डेड स्किन निघून जाते आणि मग मस्त गरम पाण्याने अंघोळ करून छान फ्रेश व्हावे. * रात्नीचं जेवण लवकर करावं आणि झोपण्यापूर्वी गरम दुधात थोडं तूप आणि ड्रायफ्रूट पावडर घालून प्यावं. अशा पद्धतीने आहार आणि व्यायाम यांचा मेळ साधला तर थंडीच्या दिवसांत शरीर कमावण्याची इच्छा खरंच पूर्ण होईल!

व्यायामाची पथ्यं

* व्यायाम उपाशीपोटी करावा. सकाळी केल्यास उत्तम पण तसं जमत नसेल तर निदान चार ते पाच तास पोट रिकामं हवं.* एकच एक प्रकारचा व्यायाम रोज, सातत्याने करू नये तर शरीराचे सगळे स्नायू, अवयव यांना व्यायाम घडेल असे प्रकार शक्यतो करावेत.* जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, स्किपिंग, स्वीमिंग हे व्यायाम बदलून बदलून करणं शक्य असल्यास उत्तम! * एखाद दिवशी जास्त वेळ नसेल, धावपळ असेल तर बारा सूर्यनमस्कार घातले तरी चालतील.