फेक अकाउण्ट का काढतात लोक? फेक अकाउण्टची दुनिया असते कशी? चालते कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:37 AM2020-07-23T09:37:48+5:302020-07-23T09:58:43+5:30

अमुक लोकप्रिय अकाउण्ट फेक होतं, तमुक फेक अकाउण्टने कमेण्ट करायचा, ढमुकने फेक अकाउण्ट काढून जवळच्या माणसांनाही उल्लू बनवलं, असे अनेक प्रकार हल्ली सर्रास होतात.

Why do people create fake accounts on Social media ? how to to be safe from them | फेक अकाउण्ट का काढतात लोक? फेक अकाउण्टची दुनिया असते कशी? चालते कशी?

फेक अकाउण्ट का काढतात लोक? फेक अकाउण्टची दुनिया असते कशी? चालते कशी?

Next
ठळक मुद्दे नेमकी ही फेक अकाउण्टची दुनिया असते कशी? चालते कशी?

मुक्ता चैतन्य

 फेसबुकवर स्वाती बापट प्रकरण जोरदार गाजलं होतं. देखण्या मुलीचं मुलाने चालवलेलं फेक प्रोफाइल. फेसबुकवर लोळत पडलेले अनेक स्री-पुरुष या फेक प्रोफाइलला भुलले, फसले आणि आपण एका फेक प्रोफाइल असलेल्या मुलीच्या नाही, मुलाच्या मागे लागलो आहोत हे लक्षात आल्यावर हवालदिल झाले. अनेकांची हृदयं तुटली. अनेकांना राग आला. अनेकांनी स्वाती बापट या प्रोफाइलला फॉलो करणा:यांची खिल्ली उडवली. लोकांनी एकमेकांना मूर्खात काढलं. या सगळ्यासंदर्भात त्यावेळी बहुदा सायबर पोलिसांकडे कुणी गेलं नाही; पण गेलं असतं तर अजूनही ब:याच भानगडी पुढे आल्या असत्या.
मुळात सोशल मीडियावर गेल्यानंतर फेक अकाउण्ट काढावं, असं माणसांना का वाटतं हा मोठा रंजक विषय आहे.
त्याला मनोसामाजिक, राजकीय, आर्थिक आणि गुन्हेगारी असे विविध अँगल्स आहेत. सोशल मीडियावर गेमिंग करत असताना अनेक गेम्समध्ये मित्रमैत्रिणींकडून अनेक गोष्टी गोळा करायच्या असतात. त्या करता याव्यात म्हणून अनेकजण अनेक फेक प्रोफाइल्स तयार करतात. स्वत:च स्वत:ला गेमिंगसाठी लागणा:या वस्तू भेट देतात. फंडा सिम्पल असतो, कुणाकडे मागायला नको आणि मिळत नाही म्हणून लेव्हल अडकून पडायला नको. या अशा फेक प्रोफाइल्सपासून ट्रोलिंग करायला मिळावं म्हणून ते थेट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना फॉलोअर्स विकण्यासाठी म्हणूनही फेक अकाउण्ट्स तयार केली जातात. 
जुलै महिन्यातलीच एक केस आहे. भूमी त्रिवेदी या गायिकेला तिचं फेक प्रोफाइल तयार केलेलं असल्याचं लक्षात आलं आणि ती सायबर पोलिसांकडे गेली. या तपासात अभिषेक दौडे या वीस वर्षाच्या मुलाला अटक झाली. त्यानिमित्ताने फेक अकाउण्ट्स तयार करून ती विकणारं एक मोठं रॅकेटही उघडकीस आलं. स्वत: अभिषेक दौडे याने 176 फेक प्रोफाइल्सवरून जवळपास पाच लाख फेक फॉलोअर्स तयार केले होते. भूमी त्रिवेदीचं फेक अकाउण्टही अभिषेकचं चालवत असल्याचंही तपासात समोर आलं होतं. मागच्या वर्षी 82 देशातली 1.84 मिलियन खाती फेक असल्याचं हायपर ऑडिट या स्वीडिश ई-कॉमर्स स्टार्टअप कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आलं होतं. या सगळ्या फेक अकाउण्ट्सच्या प्रकरणात एक दोन व्यक्ती नसतात तर अनेक व्यक्ती आणि फेक फॉलोअर्स विकणा:या कंपन्याही असतात. 
5क्क् इन्स्टाग्राम लाइक्सचा रेट 25क् रुपये तर 1क्क्क् ट्विटर फॉलोअर्ससाठी 1449 रु पये मोजावे लागतात, असं इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या बातमीत म्हटलं आहे. 
2019मध्ये फेसबुकने 5.4 बिलियन फेक अकाउण्ट्स काढून टाकली होती, तर इन्स्तास्कॅनर या कंपनीच्या अंदाजानुसार इन्स्टाग्रामवर 15क् मिलिअन फेक अकाउण्ट्स आहेत. 2019 मध्ये जेव्हा ट्विटरने कोटींमध्ये फेक अकाउण्ट्स बाद केले होते तेव्हा अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटीज लाखोंमध्ये फॉलोअर्स गमावले होते हे आपण बघितलेलंच आहे. त्यामुळे कोण किती फॉलोअर्स तयार करत आणि कोण किती विकत घेतं यांचा हिशेब लावणं खरं तर कठीण काम आहे. या सगळ्या बरोबरच टाइमपास म्हणून फेक अकाउण्ट्सची संख्याही पुष्कळ आहे. 

काय असतात त्यांची कारण?
1. काही जण निखळ मनोरंजनासाठी फेक अकाउण्ट्स तयार करतात. त्यात कुणाचीही फसवणूक करण्याचा, कुणालाही ट्रोल करून त्रस देण्याचा हेतू नसतो. पण अशी प्रोफाइल्स अगदीच बोटावर मोजण्याइतपत असतात. इतका निखळ हेतू बाळगून फार कमी लोकं पडद्याआडून वावरतात. 
2. काहीवेळा राजकीय लेखन करायचं असतं, जे त्या व्यक्तीला स्पष्टपणो आणि परखडपणो करण्याची इच्छा असते. अशावेळी फेक प्रोफाइल ही मोठी सोय असते. अर्थात इथेही आयपी अॅड्रेसवरून त्या व्यक्तीला शोधून अटक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. राजकीय संदर्भातच ट्रोलिंगसाठी मोठय़ा प्रमाणावर फेक खाती उघडली जातात. कुठल्या तरी एक विचार धारेला मानणा:यांचा हा गट असतो किंवा अनेकदा ही फेक खाती चालवणारे पगारी असतात. एक व्यक्ती किती फेक खाती चालवतो त्यावर त्यांचे पैसे ठरलेले असतात.
3. काही माणसे उपजत खोटारडी असतात. पॅथॉलॉजिकल लायर्स. अशा लोकांसाठी फेक प्रोफाइल्स ही मोठी सोय असते.
4. फेसबुक आणि इन्स्टावर व्हच्र्युअल रिलेशन्स आणि सेक्सटिंगसाठीही अनेक लोकं फेक प्रोफाइल्स तयार करतात. कंटाळा आला की फेक प्रोफाइल्स डिलीट करून नवीन फेक प्रोफाइल्स तयार करतात आणि नव्या शिकारीच्या मागे लागतात. 
5. काही वेळा व्यावसायिक स्पर्धेतून, जेलसीमधून आपल्या सहका:यांची बदनामी करण्यासाठी फेक प्रोफाइल्स वापरली जातात. गॉसिप करायचं; पण इमेज खराब होऊ नये हा त्यामागचा अगदीच स्पष्ट हेतू असतो. 
6. आर्थिक लूट करण्यासाठीही अनेकदा फेक प्रोफाइल्स तयार केली जातात. ज्यांना हनी ट्रॅप म्हटलं जातं. 2क्19 मध्ये अशा 15क् फेक प्रोफाइल्सबद्दल लष्करी अधिका:यांना अलर्ट करण्यात आलं होतं.
7. अनेकदा सेक्स ट्रॅफिकिंगसाठी फेक प्रोफाइल्स वापरली जातात. मुलामुलींना, तरु ण-तरु णींना गुंतवून, भुलवून घरातून पळून जायला भाग पाडलं जात आणि मग सेक्स स्लेव्हच्या बाजारात विकलं जातं. 
8. फेक प्रोफाइल्सची दुनिया आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप मोठी आहे.  निव्वळ स्वत:च्या आणि इतरांच्या मनोरंजनासाठी किंवा चांगला कन्टेन्टपण निनावी राहून तयार करण्याच्या हेतूने फारच कमी लोकं फेक अकाउण्ट्स तयार करतात. बहुतेक फेक अकाउण्ट्सची इंडस्ट्री चालते ती गुन्हेगारी हेतूंसाठीच. 

1  .    स्पॅमबॉट्स : काही प्रोफाइल्स ही फक्त स्पॅमबॉट्सचा मारा करण्यासाठी तयार केलेली असतात.   

2 .    लाइक बॉट्स : ही प्रोफाइल्स फक्त लाइक्स  देण्यासाठी जन्माला  घातलेली असतात. निरनिराळी पेजेस, विशिष्ट व्यक्तीच्या पोस्ट्स अशा सगळ्यांना सतत लाइक्स देणं इतकंच यांचं  काम असतं.  
3  .    स्टॉकर्स : हा प्रकार सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतो. फेक प्रोफाइल बनवून जोडीदारावर, मित्रमैत्रिणींवर, आवडणा:या, क्र श असलेल्या व्यक्तींवर किंवा न आवडणा:या व्यक्तींवरही लक्ष ठेवण्याचं काम ही प्रोफाइल्स करत असतात. 

4  .   टोपणनाव : काहीवेळा टोपण नावाने अकाउण्ट्स चालवतात. 
ही प्रोफाइल्स अनेकदा  हार्मलेस असतात. त्यातही वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी अनेकदा टोपणनाव घेऊन प्रोफाइल्स तयार केली जातात.   
5     ट्रोल्स : ट्रोल्सबद्दल आपल्याला माहीतही आहे. अनेकांना अनुभवही असेल. एखाद्या व्यक्तीला त्रस देणं हा 
एकच अजेंडा घेऊन  ट्रोल्सची फेक प्रोफाइल्स  तयार होतात.  


6     तोतया : कुणाच्या तरी नावाने प्रोफाइल्स तयार करून त्यावरून भलत्यासलत्या गोष्टी करणं हा एकच उद्योग या तोतया खात्यांचा असतो. अनेकदा अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर पसरवण्यापासून आर्थिक फसवणुकीर्पयत अनेक हेतूही दिसून येतात. 

(लेखिका मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: Why do people create fake accounts on Social media ? how to to be safe from them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.