शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
2
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
3
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
4
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
5
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
6
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
7
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
8
छाप्यानंतर सुरू व्हायचा 'खेळ', CGST डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारीच्या घरीच व्हायची 'ती' डील
9
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
10
मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
11
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
12
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
13
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
14
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
15
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
16
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
17
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
18
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
19
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
20
Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच तारुण्य का संतापलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 08:00 IST

फ्रान्समध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत, ते का?

-कलिम अजिम

 

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत फ्रान्सचे तरुण सध्या रस्त्यावर आहेत. हजारोंच्या संख्येने संघटित होत ते सरकारचा निषेध करत आहेत. गेल्या मंगळवारी सरकारने ‘सिक्युरिटी लॉ’ संशोधन विधेयक मंजूर केलं, त्यानुसार पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला तर आता एका वर्षाची कैद व ४५,००० युरोचा दंड भरावा लागणार आहे. सरकारचा दावा आहे की, पोलीस आणि सुरक्षाकर्मी यांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान टाळण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे. स्थानिकांनी कायद्याचा विरोध करत तो तत्काळ मागे घ्याव्या, अशी मागणी केली आहे.

विरोध प्रदर्शन करणं, सरकारवर टीका करणं, अधिकारांची मागणी करणं संविधानिक हक्क आहेत, त्याला सरकार काढून घेऊ शकत नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे.

२०१८ला फ्रान्समध्ये इंधन दरवाढीविरोधात भव्य ‘यलो वेस्ट’ आंदोलन उभं राहिलं होतं. गेल्यावर्षी पेन्शन संशोधन कायद्याविरोधात असंच मोठं आंदोलन उभं राहिलं. मॅक्रॉन सरकारच्या भांडवली धोरणाचा प्रतीकात्मक निषेध म्हणून ही दोन्ही आंदोलने आजही टप्प्याटप्याने सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून आली. त्यांनी केलेल्या अत्याचाराचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.

दोन आठवड्यांपूर्वी २१ नोव्हेंबरला असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात तीन पोलीसकर्मी एका तरुणाला मारहाण करत असल्याचं दृश्य होतं. पीडित युवकाचं नाव ‘माइकेल जेक्ल’ असून, तो कृष्णवर्णीय होता. मृत तरुण प्रसिद्ध संगीतकार होता. पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर आले. या व्हिडिओनंतर सरकारने तडकाफडकी हा कायदा आणला, असं सांगितलं जात आहे.

शनिवारी नव्या कायद्याचा विरोध करत हजारो तरुण राजधानी पॅरिसच्या रस्त्यावर एकवटले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत कायदा मागे घेण्याची मागणी केली. पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी अश्रुधूर व स्टेन ग्रेनेडचा वापर केला. मोर्चात सामील झालेल्या तरुणांवर पोलिसांनी प्रतिहल्ला केला. परिणामी संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांना लक्ष्य केलं. उग्र झालेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना व इमारतींना आग लावली. पोलिसांनी हिंसेवर ताबा मिळवण्यासाठी बळाचा वापर केला. या संघर्षात ३७ पोलीस व असंख्य आंदोलक जखमी झाले आहेत. अशाच पद्धतीने विरोध प्रदर्शनाची लाट अन्य शहरांत पहायला मिळाली.

दुसरीकडे प्रसारमाध्यमांनीदेखील या कायदाला प्रखर विरोध केला आहे. मीडियाच्या अभिव्यक्तीला कंट्रोल करण्याची मॅक्रॉन सरकाराची खेळी असल्याचं मत माध्यमसंस्थांनी व्यक्त केलं आहे.

या टीकेनंतर राष्ट्रपती एमैनुएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलं की या कायद्याचा हेतू नागरिक किंवा माध्यमांचे मूलभूत हक्क कमी करणं हा नाही, अर्थात त्यावर आंदोलकांचा विश्वास नाही.

(कलिम मुक्त पत्रकार आहे.)

kalimazim2@gmail.com