शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

एकटेपणाच्या वाटेवर सहवासाचा ‘चाफा’ फुलतो तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 1:38 PM

एकटेपणालाही एक लय असते, आपली आपल्याला सोबत असते, मात्र कधीतरी अचानक कुणीतरी येतं आणि ढवळून निघतं जगणं तेव्हा...

ठळक मुद्देसध्या  ‘चाफा’ हा लघुपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  स्तरावरच्या विविध चित्रपट महोत्सवांतून दाखवला जात आहे.

-माधुरी पेठकर

एकटय़ानं जगण्यात कसली आलीये गंमत? असं अनेकांना वाटतं. एकटे राहणारे एकाकीच असतात असं बाकीचेच ठरवून टाकतात. मात्र स्वच्छेनं किंवा परिस्थितीमुळे अनेकजण एकटं राहणं स्वीकारतात. मात्र त्यांच्या आयुष्यातही आनंदाचे, उत्कटतेचे, स्वतर्‍ला स्वतर्‍च्या प्रेमात ढकलणारे क्षण येतात. कुठल्याशा कारणानं रटाळ आयुष्याचं सुरेख गाणं होऊन जातं. भेसूर जगण्याला सुरेल लय सापडते. आणि कुठल्याशा कारणानं क्षणभर मिळालेलं सुख, आनंद नाहीसा होतो, रंग उडतात, सूर विरतात, लय हरवते. सर्व काही अस्तव्यस्त, उद्ध्वस्त आणि नकोसं होऊन जातं.एकटय़ानं जगणार्‍याच्या आयुष्यात इतके टोकाचे चढ-उतार, इतक्या उलथापालथी हे कसं शक्य आहे? ते  का? कसं? आणि कुणामुळे? असे प्रश्न कोणालाही पडतात. काय असतील याची उत्तरं. खरं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातले वास्तव आणि आभास यातच याची उत्तरं लपलेली असतात.मानसी देवधर लिखित, दिग्दर्शित  ‘चाफा’ या लघुपटात एकटा तरुण भेटतो. त्या एकटय़ाच्या आयुष्याचे रटाळ, रूटीन, उत्कट, आनंदी, सैरभैर, अस्वस्थ आणि उद्ध्वस्त असे अनेक पैलू केवळ वीस मिनिटांत अनुभवायला मिळतात.कोकणातल्या एका छोटय़ाशा गावातला हा एक तरुण ब्राrाण मुलगा. एकटा असलेला. सकाळी उठणं, सडासंमाजर्न करणं, स्नान करून घरातली देवपूजा आटोपणं, स्वयंपाक करणं, मंदिरात जाऊन पूजा करणं, संध्याकाळी घरी येणं, स्वतर्‍साठी स्वयंपाक करणं आणि पुन्हा दिवा मालवून झोपी जाणं. वर्षानुर्वष हा तरुण असं एक रूटीन आयुष्य जगतोय. त्यात उत्साह नाही; पण म्हणून ते आयुष्य उदासही नाही. ते सवयीचं झालेलं असल्यामुळे त्याच्यासाठी अगदीच मचूळ असलेलं. म्हणूनच त्याचा रोजचा दिवस विशेष काही न होता उगवतो आणि विशेष काही न होता मावळतोही.  एका सकाळी अंगणात उभं असताना त्याला एक वास येतो. तो वास त्याला सुखावतो. तो खोल श्वास घेतो. तो वास त्याला आठवणीतला, ओळखीचा वाटतो. तो खोल श्वास घेऊन आपल्या आतमध्ये असलेल्या एकटेपणात त्या वासाला भरून घेतो. तो वास असतो चाफ्याचा. तो धावत जाऊन चाफ्याची फुलं आणतो. आपल्या आई-बाबांच्या फोटोसमोरही उत्साहानं चाफ्याची फुलं ठेवतो. त्या चाफ्याच्या सुगंधानं त्याचं आयुष्यच बदलतं. रोजच्या संथ आणि एकटय़ा आयुष्याला एक सुरेख लय येते. त्या चाफ्याच्या सुगंधानं त्याच्या आयुष्यात खिडकीत उभी असलेली ती येते. मंदिरात येण्या- जाण्याच्या रस्त्यातच तिचं घर असतं. तिच्यासाठी तो रोज दगडावर चाफ्याची फुलं ठेवतो. चाफा आणि नंतर ती यामुळे त्या तरुणाच्या जगण्यावर आनंदाची, उत्साहाची धुंदी चढते. स्वतर्‍कडे बघण्याची, स्वतर्‍साठी जगण्याची त्याला इच्छा होते. त्याच्या चेहर्‍यावर, त्याच्या पानातल्या जेवणाच्या पदार्थातही  हा  आनंदी बदल दिसतो. एक दिवस हिंमत करून तो तिच्या हातात ती चाफ्याची फुलं ठेवतो. चाफा, ती आणि तिच्या हाताचा हलकासा स्पर्श यामुळे हा तरुण मोरपिसासारखा हलका होतो. त्याचं संथ आयुष्य उत्कट होतं. पण एक दिवस असं काही घडतं की त्याच्या मनात, जगण्यात फुललेला चाफा कोमेजून जातो. मनावरची आल्हादाची धुंदी ओसरून जगणं निरस होतं. तो चिडतो,  बिथरतो, अस्वस्थ होतो. सैरभैर होतो. घरातल्या भांडय़ांवर, अंगणातल्या कचर्‍यावर, पाटय़ावरच्या मसाल्यावर, स्वतर्‍वर, नदीपात्रातल्या पाण्यावर, आई-बाबांच्या तसबिरीसमोरच्या चाफ्याच्या फुलांवर सगळ्यांवर राग काढतो. आपलं आयुष्य वास्तव आणि आभासाच्या पुसटशा सीमारेषेवर हिंदकळत असतं. वास्तव जगात कधी आभास प्रवेश करतात, तर आभासाचं जग कधी वास्तव होतं याचा पत्ताही लागत नाही. पण आभासामुळे वास्तव जगात उलथापालथी होतात, काही चांगली वळणं येतात, आयुष्यात चांगले बदल होतात, स्वतर्‍कडे, स्वतर्‍च्या आयुष्याकडे बघण्याचे संदर्भ बदलतात. मानसी देवधरला आपल्या ‘चाफा’ या लघुपटातून हेच सांगायचंय. वास्तव आणि आभासाचं आपल्या जगण्यातलं मैत्र आणि द्वंद्व मानसीनं आपल्या लघुपटातून एका एकटय़ा तरुणाच्या माध्यमातून मांडलं आहे. संवाद नसलेल्या या लघुपटात केवळ द्ृश्य प्रेक्षकांशी संवाद साधतात. लघुपटातलं संगीत तरुणाच्या मनातले बदलणारे भाव प्रेक्षकांच्या हृदयार्पयत पोहोचवतं. चाफा या लघुपटात चाफ्याचं फूल हे एका मुख्य पात्रासारखं आलं आहे. कोकणातल्या सावंतवाडी येथून बी.ए. पूर्ण केलेल्या मानसीला आपल्या मनातली कल्पना कथेत मांडून ती चित्रित करून पाहायची होती. त्यासाठी तिनं चाफा हा लघुपट तयार केला. बी.ए. करताना मानसी यूथ फेस्टिव्हलमध्ये भाग घ्यायची. तिथे तिनं वादविवाद स्पर्धेपासून लोकसंगीतार्पयत प्रत्येक गोष्टीत भाग घेतला. तिला अनेक बक्षिसंही मिळालीत. पण वडील थोडे चिडले. र्सवच आवडतं पण नेमकं करणार काय, असा प्रश्न तिच्यासमोर ठेवला. तेव्हा मानसीनं फोटोग्राफीत जास्त रूची दाखवली. फोटोग्राफी करताना तिला फिल्ममध्ये असलेला इंटरेस्ट कळाला. केवळ चित्र, केवळ कविता, नुसते कपडे किंवा नुसते शब्द वापरायचे असतील आणि त्याभोवती एक कथा मांडून आपल्या मनातलं पोहोचवायचं असेल तर फिल्मसारखं दुसरं माध्यम नाही याची जाणीव मानसीला झाली आणि तिनं स्वतर्‍च्या मनातली गोष्ट  सांगण्यासाठी फिल्म हे माध्यम निवडलं.सध्या  ‘चाफा’ हा लघुपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  स्तरावरच्या विविध चित्रपट महोत्सवांतून दाखवला जात आहे. लवकरच तो यू टय़ूबवरही पाहायला मिळेल.