शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

आता व्हॉट्सअॅप आपल्याला THANKS म्हणणार आहे... का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 6:11 PM

लॉकडाऊनच्या काळात आपण व्हॉट्सअॅपवर पडीक होतो, इट्स बिटविन यू !

ठळक मुद्देअशी काही विशेष मोहीम राबवली जाण्याची ही बहुदा भारतातील पहिलीच वेळ असावी.

सबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतलंय हे तर सर्वानाच माहिती आहे. त्यानंतर त्यात मोठय़ा प्रमाणावरती बदलही करण्यात आले. व्हॉट्सअॅप अधिक यूजर फ्रेंडली बनवणं, जास्तीत जास्त सोयी सुविधा यूजर्सर्पयत पोहोचवणं हे त्याचं उद्दिष्ट. आता या कोरोना व्हायरसमुळे आलेल्या जागतिक संकटात, जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला. आजही अनेक देशातील मोठय़ा आणि छोटय़ा शहरात, गावखेडय़ात लॉकडाऊन चालूच आहे.माणसं घरात अडकलेली आहेत. कोणी एकटी पटली आहेत, कोणाला सतत नातेवाइकांची, जवळच्या आप्तांची चिंता लागून राहिलेली आहे, कोणाला त्यांचा आवाज ऐकायचा आहे, तर कोणाला त्यांना बघायचं आहे. ते व्हॉट्सअॅपवर एरव्हीही संपर्कात आहेतच.तर आता त्यापुढे जाऊन एका खास मोहिमेद्वारे आता व्हॉट्सअॅप वापरून करोडो भारतीय कसे एकमेकांच्या संपर्कात राहिले. व्हॉट्सअॅप मेसेजिंग, व्हॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग या सुविधांमुळे लोकांच्या चिंता, एकटेपणा कसा दूर झाला हे सर्व काही या विशेष मोहिमेद्वारे दाखविण्यात येणार आहे.या मोहिमेला इट्स बिटविन यू असं नाव देण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप इट्स बिटविन यू या ब्रँड मोहिमेसाठी बॉलिवूडची दिग्दर्शक गौरी शिंदे आणि जाहिरात एजन्सी बीबीडीओ इंडियाची निवड केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कंपनी काही जाहिराती दाखवेल.भारतात व्हॉट्सअॅप सक्रिय वापरकत्र्याची संख्या 4क्क् दशलक्षाहून अधिक आहे आणि व्हॉट्सअॅप भारत एक किती महत्त्वाची मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअॅपने या आधी अशी मोहीम फक्त ब्राङिालमध्ये राबवलेली होती.या मोहिमेतल्या जाहिराती विविध चॅनल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती पुढील दहा आठवडे चालवल्या जाणार आहेत. एखाद्या सोशल प्लॅटफॉर्मतर्फे अशी काही विशेष मोहीम राबवली जाण्याची ही बहुदा भारतातील पहिलीच वेळ असावी.

शरीरात चिप? - तंत्रज्ञानाचा असाही  भलताच वापर.

 जगभरातच कोरोना आणि त्यासंदर्भातल्या बातम्या, व्हिडिओ, कोरोनाशी मुकाबला करणारे तंत्नज्ञान यांचीच सतत चर्चा होत असतानाच, तिकडे मिशिगनच्या संसदेने एक अनोखा कायदा संमत करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मिशिगनच्या संसदेने नुकताच ‘मायक्र ोचिप प्रोटेक्शन’ कायदा संमत केला, यामुळे आता तेथील कंपन्यांना आपल्या कर्मचा:यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारची मायक्र ोचिप बसवता येणार नाही. जगाच्या कोण्या भागात अशा चिप बसवणा:या कंपन्या आहेत, त्या बसवून घ्यायला मान्यता देणारे कर्मचारी आहेत आणि मुळात असं काही तंत्नज्ञान आहे हीच बातमी अनेकांसाठी नवी होती. सन 2017 मध्ये खासगी कंपन्यांनी एक नियम लागू केला होता, ज्या अंतर्गत कर्मचा:यांच्या शरीरात आरएफआयडी मायक्र ोचिप बसविण्यात आली होती. जेव्हा कर्मचारी या चिप्ससह कंपनीत प्रवेश करतात तेव्हा कंपनीचे विविध दरवाजे आपोआप उघडतात आणि कर्मचारी त्यांच्या जागी बसल्यावर त्यांच्या टेबलावरील लॉक असलेले संगणक चालू केले जातात. या व्यतिरिक्त कंपन्या या चिप्सद्वारे आपल्या कर्मचा:यांवर नजर ठेवत असत अशीदेखील जोरदार चर्चा आहे. या विशेष तंत्नज्ञानाच्या मायक्रोचिप्सचा आकार तांदळाच्या दाण्याएवढा आहे आणि त्यांची किंमत 23 हजार रु पये आहे. या चिप्स शस्रक्रि येद्वारे हाताच्या कोणत्याही भागावर लावल्या जाऊ शकतात. या चिप्सच्या मदतीने दरवाजे उघडण्यापासून ते पैशाचे व्यवहार करण्यापर्यंत अनेक कामे केली जाऊ शकतात. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कंपन्या यापुढे आपल्या कर्मचा:यांना अशा चिप लावण्यास भाग पाडू शकणार नाहीत अथवा दबाव टाकू शकणार नाहीत. अद्याप हे विधेयक पूर्णपणो कायद्यात रूपांतरित झालेले नाही, त्यासाठी ते अमेरिकन सिनेटमध्ये पास होणं आवश्यक आहे.