शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

भरदुपारी झालं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 7:39 PM

पारोळ्याचा स्वप्निल कापुरे मुंबईत असोसिएट एडिटर म्हणून काम करतो.

- स्वप्निल कापुरेपारोळ्याचा स्वप्निल कापुरे मुंबईत असोसिएट एडिटर म्हणून काम करतो. प्रत्यक्ष कामाचा अनुभव होता; पण तरी त्यानं ठरवलं आपण सिनेमानिर्मितीचेतंत्र आणि मंत्र दोन्ही शिकायचं. मग अनुभवाची पाटी कोरी करून त्यानं एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला..जळगाव जिल्ह्यातल्या पारोळ्याचा असलो तरी वाढलो मी मुंबईतच. घरची आर्थिक स्थिती तशी खाऊनपिऊन बरी. वडील माझे शिवणकाम करायचे. मी लहान होतो तेव्हाच काकांकडे मुंबईत शिकायला गेलो. जोगेश्वरीत राहायचो. तिथल्या श्रमिक विद्यालयात शिकलो. ती शाळा हे एक भन्नाट जग होतं. अ‍ॅक्टिव्हिटीला प्रचंड वाव. नाटक, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा यासाऱ्यात भाग घ्यायचो. अर्थात तेव्हा काही आपण याजगात काम करू असं मनातही नव्हतं.एनएसडीसारखं काही असतं दिल्लीत, तिथं जाऊन नाटकाचं प्रशिक्षण घ्यावं हे सारं तर माहितीही नव्हतं. पुढं काही कारणास्तव मी मुंबई सोडली नि पारोळ्यात परत आलो. जळगावच्याच प्रताप महाविद्यालयात शिकत होतो. बी.एस्सी. करत होतो. तेही रसायनशास्त्रात. अमळनेरमध्येही होतो. पण तिथं काही तसं नाटकाचं वातावरण नव्हतं. मात्र प्रा. विनय जोशी मला तिथं भेटले. त्यांना नाटकांची ओढ होती. दरम्यान, कॉलेजमध्ये नवीन प्राचार्य आले, त्यांनी ठरवलं सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचं. त्यामुळे महाविद्यालयात वेगळंच वातावरण निर्माण झालं. आणि त्या काळात मला अनेक गोष्टी करण्याची संधी मिळाली. लोकनाट्य, पथनाट्य, असं जे करायला मिळालं ते केलं. एकीकडे बी.एस्सी.चं शिक्षण चालूच होतं.साधारण ग्रॅज्युएशन झालं की प्रश्न समोर येतोच की, पोटापाण्याचं काय? सेटल होण्याचं काय? भागणार कसं दोन वेळचं? आमचा परंपरागत व्यवसाय कपडे शिवण्याचा. वडील एम.ए. इकॉनॉमिक्स. पण काही कारणास्तव त्यांनी नोकरी केली नाही. ते शिवणकाम करत. त्यांनी आम्हालाही शिवणकाम शिकवलंच होतं. बाबा नेहमी म्हणत, तुम्ही हे काम शिका; पण करू नका.बी.एस्सी. झाल्यावरही आपण करायचं काय हे काही माझ्या मनात नव्हतं. गावाकडेच होतो. बाबांना म्हणालो, मला वेळ द्या, मी करतो काहीतरी. डोक्यात होतं, मुंबई-पुणं गाठायचं. पण जॉब करायचा, की नाटक करायचं हे काही कळत नव्हतं. विनय जोशीसरांनी सांगितलं, विद्यापीठात एक कोर्स आहे कम्युनिकेशन स्टडिज्चा, तो कर. पुण्यात माझा भाऊ होता, त्यामुळं राहण्याची सोय होती. मी प्रवेश परीक्षा दिली, त्या कोर्सला प्रवेश मिळाला. पण त्यासाठी फी भरायची तर पैसे नव्हते. पुढच्या वर्षी प्रवेश घेऊ आता जॉब करू असं मी ठरवलं होतं. पण जवळच्या नातेवाइकांनी पैसे दिले, संधी परत येत नसते म्हणाले. म्हणून पैशाची सोय झाली. प्रवेश घेतला. तिथं सगळं बस्तान बसलं. तिथं मला भेटले समर नखातेसर. ते शिकवायला लागले आणि कळलं की आपण वेगळ्याच जगात आलेलो आहोत. त्यांच्यामुळे जगण्याचा, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. नजर बदलत गेली.या अभ्यासक्रमात मी व्हिडीओ प्रॉडक्शन शिकलो. ‘बारक्या’ नावाची फिल्मही मी या काळात केली. शिक्षण संपल्यावर मुंबईत काम सुरू केलं. गजेंद्र अहिरेंसोबत काम करत होतो. एबीसीएलच्या चांद फिर निकलावर काम करत होतो. तिथं काम करताना सिनेमा मेकिंगची नेमकी प्रोसेस मला कळली.पण मुंबई सिनेमाची दुनिया म्हणजे स्ट्रगल आला. कधी पैसे मिळायचे, कधी नसायचे. मुंबईत सर्व्हाइव्ह करणं अवघड असतं. मात्र मी मिळेल ते काम केलं नाही. ठरवत होतो, कामाच्या बाबतीत चुझी रहायचो. भले दोन पैसे कमी पडतील; पण सगळं काम पैशासाठी करायचं असं नाही. मात्र काम करताना सारखं वाटायचं आपण अजून सिनेमाचं तंत्र शिकायची गरज आहे.मात्र आर्थिक रेटा होता. काम सोडून शिकणं शक्य नव्हतं. थोडं आर्थिक स्थैर्य आलं की शिकू असं ठरवत होतो. दरम्यान मी काही चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करत होतो. त्यातलेच एक सतीश मन्वर. माझं काम पाहून शशांक शेंडे यांनी त्यांना माझं नाव सुचवलं. रवि राय, किरण यज्ञोपावित यांच्यासोबतही काम केलं. मात्र मन्वर यांच्यासोबत काम करायचं तर मला पुण्यात येणं भाग होतं. तेव्हा मी मुंबईत काम करत होतो. पण मी मन्वर यांचा फॅन असल्यानं पुण्यात जायचं ठरवलं. मुंबईत तसं काम बरं चाललं होतं मी असिस्टण्ट एडिटर म्हणून काम करत होतो. मुंबई सोडली तेव्हा असोसिएट डिरेक्टर म्हणून बाहेर पडलो.पुण्याला आलो. पण तो प्रोजेक्ट पुढे झाला नाही. पण त्यांच्याकडे काम शिकलो. सलाम नावाचा सिनेमा होता. त्यासाठीही मी पूर्णवेळ असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. दरम्यान काही वेगळी कामं, डॉक्युमेण्टरी, कार्पोरेट प्रोजेक्टसाठीही काम करत होतो. मात्र यासाºयात मनात एक विचार होता, एफटीआयमध्ये जायचं.मात्र ठरवलं नि गेलो असं झालं नाही. पहिला अटेम्प्ट केला, निवड झाली; पण हाताशी पैसे नव्हते. दुसºया अटेम्प्टलाही काही अडचणी आल्या प्रवेश घेऊच शकलो नाही. तिस-या अटेम्प्टला मात्र प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.मनात एकच होतं, सिनेमानिर्मितीचं काम कसं चालतं हे आपल्याला माहिती आहे. मात्र त्याची प्रोसेस, त्यातलं उत्तम तंत्र माहिती होणं, शिकणं गरजेचं आहे. मी चांगल्या लोकांबरोबर चांगलं काम करत होतो; पण ते काम त्यांचं होतं, ती अभिव्यक्ती त्यांची होती. मला स्वत:ला एक्स्प्रेस होता येत नव्हतं. त्यात मला असं वाटत होतं की, आपल्याला वाटतंय की आपल्याला काम येतं; पण किती येतं नेमकं, हे एकदा नीट पाहण्याची, स्वत:ला फेस करण्याचीही गरज होती. आपल्याला जमतंय का, किती जमतंय हे पाहण्यासाठी खोेलात जाण्याची गरज आहे. म्हणून एफटीआयला गेलो. कोरी पाटी करून गेलो. स्वत:लाच सांगत होतो की आपल्याला काहीच येत नाही असं समजून हे तंत्र नव्यानं शिकायचं. समजून घ्यायचं.या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्याचा प्लस पॉइण्ट काय तर इथलं वातावरण. २७-२८ वर्षाच्या तरुणाला इथं नेमकं काय शिकवणार?तर इथं शिकवत नाही ते विचार करायला, व्यक्त व्हायला उद्युक्त करतात. जगभरात काय चालू आहे, लोक कसं काम करतात याची माहिती मिळते. वेगवेगळे वर्कशॉप सुरू असतात. सतत बाहेरचे तज्ज्ञ लोक येतात. खूप चांगल्या गोष्टी सतत चालू असतात. एफटीआयमध्ये रोज एका सिनेमाचं स्क्रिनिंग होतं. त्याचा अभ्यास करणं, ते समजून घेणं हेसुद्धा एक उत्तम शिक्षण आहे. रोज एक सिनेमा पाहून तो समजला तरी आपण खूप शिकलो म्हणायचो.इथं उत्तम लायब्ररी आहे. भरपूर सिनेमे पाहतात येतात. समजतात नवनव्या गोष्टी. यासाºयात मी इतका हरवून गेलो, इतका रूळलो की कोर्स कधी सुरू झाला कधी संपला हे कळलंही नाही.हा सारा प्रवास सिनेमाचं तंत्र आणि मंत्र शोधण्याचाच होता.. आता इथून पुढचा एक नवा प्रवास सुरू झाला आहे.. राष्ट्रीय पुरस्काराचं प्रोत्साहन माझ्या प्रयत्नाला लाभलं, याचं अप्रूप अर्थातच आहे...भरदुपारी भरदुपारी ही माझी फिल्म. खरं तर ती आमच्या अभ्यासक्रमाच्या प्रोजेक्टचाच एक भाग होती. मी विचार करत होतो प्रोजेक्टचा. फिल्म म्हणून काय करता येईल याचाही. या काळात मी इराणीअन सिनेमे खूप पाहिले. सेपरेशन, मेलबर्न यासारखे सिनेमेही पाहिले. वाटायचं, या सिनेमाची गोष्ट किती छोटी. खरं तर गोष्टच नाहीये, एक छोटीशी घटना आहे. मात्र त्या घटनेनंतर किंवा तिच्या अवतीभोवती काय होतं याचा सिनेमा ते किती बारीक डिटेलिंगसह करतात. माणसांची गुंतागुंत, त्यांची मनोवस्था किती बारकाईनं समोर ठेवतात. याचदरम्यान एक शब्द माझ्या मनात होता. हकनाक. तो शब्द मी माझ्या डायरीत लिहून ठेवला होता. एवढंच डोक्यात होतं. तिथून माझ्या गोष्टीची सुरुवात झाली.आणि त्यातून भरदुपारी या सिनेमाची कथा आकार घेत गेली.सिनेमाची गोष्ट अशी की, एक जोडपं आहे. सुहास आणि स्रेहा, पुण्यातलं. पाच वर्षे झाले लग्नाला, त्यांना मूलबाळ नव्हतं. मात्र त्यांच्या वाट्याला आता तो आनंद आलाय. स्रेहा सात महिन्यांची गरोदर आहे. एका रविवारी ते दोघं ठरवतात की, एक आपलं आपण डोहळेजेवण करू. दुपारी बाहेर जाऊ, सिनेमा पाहू, जेवू. ११ वाजता निघू घरातून. पण रविवार. आळसटलेपण, सुस्त, निवांतपणा. यात अकराचे साडेअकरा, बारा होतात. भरदुपारी १२ नंतर ते निघतात. सुहास पुढे होता, स्रेहा दारातून निघतच असते. तेढ्यात एक मुलगा धावत त्यांच्या घरात शिरतो, स्रेहानं डोळ्यासमोर एक खून होताना पाहिलेला असतो..तिथून भावनिक गुंतागुंत सुरू होते. त्या घटनेचा परिणाम तिच्या मनावर होतो, सुहासही आपण ठरल्यावेळी घराबाहेर का पडलो नाही म्हणून चरफडतो..आणि पुढे काय होतं हे त्या भरदुपारी ठरतं.. सुहास शिरसाठ, केतकी सराफ, मुग्धा शेंडे यांनी या सिनेमात काम केलंय. विशेष म्हणजे, प्रोजेक्टच्या नियमाप्रमाणे चार दिवसात हा सिनेमात शूट केलाय. आठ तासात एडिट केलाय नि पाच दिवसांत पूर्ण केलाय. इतकं टाइम बाउण्ड काम केलं, त्यातून पुरस्कार मिळाला याचं समाधान जास्त आहे...( शब्दांकन -आॅक्सिजन टीम)