शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

सुटीत काय करू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 20:24 IST

सुटीत करायचं काय? या घ्या काही मस्त आयडिया, बोअर तर होणार नाहीतच, पुन्हा पैसे कमवण्याची संधीही

- निकिता महाजनउन्हाळा सुरू झाला. सुट्याही लागल्या. आता भटकणं, गप्पा, रिझल्टची वाट पाहणं, करिअरची काळजी, आंब्यांवर ताव असं सारं सालाबादाप्रमाणे सुरू होईलच. त्यात लग्नसराई. म्हणजे मिरवणंही आलंच. पण उन्हाळा इतका की भरजरी कपड्यांत जीव उकडून जावा. त्यात लोक उन्हाळा असा सुसह्य करा वगैरे सांगतात, मेसेज फिरवतात. असा उन्हाळा सुसह्य वगैरे झाला असता तर त्याला उन्हाळा का म्हटलं असतं?पण करतात बिचारे लोक प्रयत्न. त्यात आपणही काही प्रयत्न केले तर आपल्यालाही उन्हात काही भन्नाट रंग सापडू शकतील. त्यासाठी फॅशन ट्रेण्ड वगैरे पहायला नको. जरा डोकं चालवलं ना तरी अनेक गोष्टी सुचतील.१) गो लोकलआताशा फेसबुक-इन्स्टावर फोटो टाकून लाइक्स मिळवणं कुणाला आवडत नाही. त्यातलाच एक भाग म्हणून जरा मस्त वाळवणांचा हात धरा. काय त्यातले रंग, गंध, आणि वाळवणांचे एकसेएक फोटो. बटाट्याचा किस ते पळीपापड्या ते कुरडाया ते मसाले कुटण्यापर्यंत जरा मस्त काम करून पहा. भरपूर कलर्स सापडतील. खाता खाता हे फोटो सोशल मीडियातही कौतुक मिळवून देतील.हे सगळं कशासाठी? सुटीचा टाइमपास व्हावा म्हणून.. नाहीतर बोअर व्हायचंच..२) मेसेज टी-शर्टपैसे कमावण्याची ही फुकट आयडिया आहे. यंदाच्या उन्हाळ्यात फन मेसेज लिहिलेल्या टी-शर्टचा भरपूर मोठा ट्रेण्ड आहे. आपणच आपल्यासाठी मस्त टी शर्ट रंगवावेत आणि घालून मिरवावेत. ते जमलंच तर चार मित्रांनाही करून विकावेत. एकदम उद्योग सुरू केल्याचा अनुभव येईल.३) गो ग्रीनबाकी फॅशन वगैरे आवडत असेल तर सध्या हिरव्या रंगाच्या विविध वस्तूंची फॅशन आहे. म्हणजे काय तर क्रोशाचे हिरव्या रंगाचे कानातले, ब्रेसलेट, दोऱ्यांचे, क्विलिंगचे दागिने असं सारं बनवता येईल. घालता येईल, विकता येईल. ट्राय करून पहा.४) नो टू सोडायंदाच्या उन्हाळ्यातली ही अजून एक संधी. म्हणजे काय तर आता पुन्हा सारे कोकम नि लिंबू सरबताकडे नि ताकाकडे वळताहेत. नो टू सोडा असा एक ट्रेण्ड आहे. सरबतांच्या झटकेपट पावडरी बनवून विकणे किंवा सरबतांचे सिरप करून विकणे हेपण भारी काम आहे. पुन्हा भरपूर सरबत पिण्याची संधी.५) डेनिम डिझाईनम्हणजे काय तर आता जीन्स, जॅकेटवर एम्ब्रॉयडरी करण्याची फॅशन आहे. मग काय आपल्याला येत असेल असं काही भरतकाम, एम्ब्रॉयडरी तरी आपल्यासाठी मस्त काम आहे.