शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोकळा हो! १८ वर्षांचा अमेय ‘आज’च्या अमेयला काय सांगेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:02 IST

खरं तर त्यानंच आजच्या अमेयला काहीतरी सांगायला हवं...

- अमेय वाघ

१८ वर्षांचा अमेय.त्याला आज मी काय सांगणार?खरं तर त्यानंच आजच्या अमेयला काहीतरी सांगायला हवं. ..आणि ‘आजच्या’ अमेयने त्या ‘१८ वर्षांच्या’ अमेयचं ऐकायला हवं आणि जमलं तर तसं वागायलाही हवं..१८ वर्षांचा अमेय काम करायचा?काहीही करायचा; पण त्यात एक इनोसन्स होता. त्या इनोसन्सनं काम करताना त्यानं रिझल्टचा विचार कधी केला नाही. वाटलं ते केलं. आपण हे का करतोय, त्यातून पैसा किती मिळणार, नाटक चालेल का असं काही डोक्यात नसायचं. ‘पुढे काय होणार’ या प्रश्नाचं काही पडलेलंच नसायचं.मुख्य म्हणजे १८ वर्षांच्या अमेयच्या रोजगाराचं साधन नव्हतं अभिनय करणं. एक कला म्हणून तो ते काम करायचा. आपण जे काम करतो ते चांगलंच व्हावं हाच एकमेव हेतू मनात होता. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती होती.व्यक्तिगत आयुष्यात नाती ओळखण्यात तो जरा चाचपडत होता. आपली जवळची माणसं कोणती आणि जवळचेच आहोत हा भास निर्माण करणारी कोणती हे त्या वयात चाचपडत का होईना हळूहळू त्याला समजलंच. त्यातूनही तो शिकला.मुळात चुका करण्यात, नवीन काहीही करून पाहताना डोक्यात काही इन्हिबिशन्स नव्हती. कसला संकोच, कसल्या शंका नव्हत्या. जे जे वाटलं ते करून पाहायचा. बिनधास्त होता तो. त्या काळात अनेक गोष्टी करून पाहताना नवीन माणसं भेटायची, नवीन जग कळायचं. जो माणूस भेटला, त्याचं आयुष्य मस्त वाटायचं. त्या माणसांवर शिक्के मारायची कसली घाई नव्हती, गरजही वाटत नसे.त्याला काहीतरी निर्माण करायचं होतं, त्यासाठी तो धडपडत होता.आणि म्हणून तो आजच्या अमेयला भेटायला हवा.या ‘मोठ्या’ झालेल्या अमेयला त्या ‘बिनधास्त’ अमेयनं काही गोष्टी सांगायला हव्यात.त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बिनधास्त हो.काम करताना ते यशस्वी होईल का, लोकांना आवडेल का हा प्रश्न जसा पूर्वी महत्त्वाचा नव्हता, त्याहून महत्त्वाचं होतं ते जे वाटलं ते करून मोकळं होणं, तसं करून बघ. जमेलच असं नाही, पण करून तर बघ !मुख्य म्हणजे माणसांविषयी, कामाविषयी जजमेण्टल होऊ नकोस.पूर्वी जगताना जशा अनेक गोष्टी करायचास, त्या करताना पैशाचा, धोक्यांचा फारसा विचार करायचा नाहीस, ते पुन्हा कर.ते तसं मोकळं, बिनधास्त आणि मस्त जग !१८ वर्षांच्या अमेयला जमलं होतं..या ही अमेयला जमेल.. जमायला हवं!

 

टॅग्स :cinemaसिनेमाentertainmentकरमणूक