शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 5:07 PM

इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणींचे सांगाडे आहेत. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच रुजता येत नाही. ही तुझी अडचण आहे.

ठळक मुद्देदिवाळीचे चार दिवस गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले असा छळणारा प्रश्न सांगणारं एक स्वगत.

- अरु ण तीनगोटे

गाव बदलत नाही.  गाव पुढं सरकत नाही.  गाव धूळभरल्या रस्त्यांची साथ सोडत नाही.  माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं कुणाची वाट पाहतात समजत नाही.. दारातला प्राजक्त आता बहरत नाही. गावात आता पूर्वीची रया नाही. नुसता फुफाटा आणि धुराळा आहे. गावातल्या म्हातार्‍या दिवसेंदिवस अधिक जख्ख म्हातार्‍या होत जात आहेत. भुवयांचे आणि पापण्यांचे केस पांढरे झालेल्या म्हातार्‍या आपल्या चेहर्‍याकडे निरखून पाहतात; पण तरी ताळमेळ लागत नाही. आपण आपली ओळख करून दिली तरी ती त्यांना पटतेच असं नाही. म्हातारी चेहर्‍याकडे असं पाहते जणू ती तिचाच तरुण भूतकाळ आपल्यात शोधते आहे. कुबडय़ा घेऊन चालत राहणार्‍या आजीला सांग की,   तू आमक्याचा तमका आहेस. तुमच्या शेजारी राहायचो. तिच्या पाया पड. ती तुला आशीर्वाद देईन. तिला विचार, तू कशी आहेस? अजून तरी बरी आहे, असं ती म्हणेन.   त्याचा अर्थ लावू नको. त्याचा अर्थ शोधू नको. तिला काही देऊ नको. तिच्याकडे काही मागू नको. तुझा भूतकाळ शोधू नको. नवं नातं बांधू नको. गाव तुला तसंच दिसत असलं तरी आतल्या उलथापालथी तुला समजतीलच असं नाही. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच जाता येत नाही. ही तुझी अडचण आहे. आणि  गावात किंवा शहरात असलेल्या कुठल्याही अडचणीपेक्षा ही मोठी अडचण आहे. गाव वाढत चाललं आहे. सर्वत्न जंगी घरं बांधली जात आहे. गावच्या मातीचा वास सीमेंटच्या वासात हरवून जात आहे. तुझं जुनं घर इथं शोधू नकोस. इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणीचे सांगाडे आहेत. आणि तसंही तुझं मन अधांतरीच होतं आणि आहे. पोपडे आलेल्या भिंतींना पोतेरं मारणार्‍या आईचं थकलेलं शरीर, संध्याकाळी घरी येणार्‍या बापाचा आराम शोधणारा देह, दारातलं मोठं गुलमोहराचं झाड, त्याच्या वाळलेल्या शेंगा, त्याला उन्हाळ्यात  येणारी लालबुंद फुलं किंवा त्याची नाजूक हिरवी पानं, त्या गुलमोहरावर फक्त कावळ्यांचीच वस्ती का असायची.? शेजारच्या घरातील मांजरीचं  पिल्लू, बकरीच्या दुधात गुळाचा चहा बनवणारी शेजारची मावशी, त्यांनी झाडावर पाळलेलं माकड, संध्याकाळी थकून आल्यांनतर गणित  शिकवण्याचा प्रयत्न करणारा बाप.. ही अशी वाढत जाणारी रांग थांबणार नाही. पण तू थांब. परत मागे फिर. शहराकडे चालायला लाग. हे गाव तुला पुन्हा कुशीत घेणार नाही आणि तू मेला तरी शहराचा होणार नाहीस. तुझी मुळं शोधणं कठीण आहे..