using wrong emoji on whats app? | माझ्या मनात  'तसलं काहीच' नव्हतं असं म्हणत व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही नक्की  काय काय धाडता?
माझ्या मनात  'तसलं काहीच' नव्हतं असं म्हणत व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही नक्की  काय काय धाडता?

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप वापरताना काही गोष्टी आपण सहज करतो आणि त्या ‘असभ्य’ असतात

निशांत महाजन 

व्हॉट्सअ‍ॅप वापरताना काही गोष्टी आपण सहज करतो आणि त्या ‘असभ्य’ असतात हे वाचून गेल्या आठवडय़ात तुम्हाला धक्का बसला असेल, तर तो पचवा.
कारण इथंच ही गोष्ट संपत नाही तर सुरु होते.
अजून अशा अनेक गोष्टी या लेखात सांगता येतील की त्या कधी वापरायच्या हे अनेकांना तासंतास व्हॉट्सअ‍ॅप वापरुनही समजत नाही. आणि त्यामुळे त्यांचं इम्प्रेशन अत्यंत वाईट होतं आणि त्यांना कुणीही गांभिर्यानं घेत नाहीत.
तर त्याची ही लिस्ट, यापैकी तुम्ही कुठं आहात तपासून पहा.

1) पूर्णविराम
शाळेत व्याकरणात शिकवतात आपल्याला, पण अनेकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करताना पूर्णविराम देणं आवश्यक असतं, हेच माहिती नाही. ते सतत लिहित सुटतात. आणि कुठलीच विरामचिन्हं वापरत नाहीत.

2) लोल
हा शब्द अनेकजण सहज वापरतात.लोल. म्हणजेच एलओएल. तो कुठं वापरावा, आपल्या बॉसने पाठवलेल्या मेसेजला उत्तर म्हणून पाठवावा का हेच माहिती नसतं. ते पाठवलं की चुकलंच.

3. के
अनेकजण भयंकर बीझी असतात. आपण फार भारी हे दाखवण्यासाठी काहीजण ओके ऐवजी नुसतं के लिहून पाठवतात. आपण हा के लिहून समोरच्याचा अपमान करतोय हे त्यांना कळतही नाही.

4. चुकीचे इमोजी
फुकट आहे म्हणून अनेकजण इमोजी वापरतात. पण त्यांचा अर्थ काय? आपण जो इमोजी वापरतोय तो कुणाला पापी देतोय की गालगुच्चे घेतोय की मिठय़ा मारतोय हेच अनेकांना कळत नाही. मग सर्रास ते असे चुकीचे सिगAल देणारे मेसेज पाठवतात. आणि मग म्हणतात माझ्या मनात तसलं काहीच नव्हतं.

5. कुल
सीओएलएल म्हणजेच कुल लिहिणं किती सोपं आहे. पण प्रत्येक गोष्टीला अनेकजण कुल असा रिप्लाय पाठवतात. विषय काय, त्याचं गांभिर्य काय हे न पाहता नुस्तं कुल लिहिलं तर आपण कुल होत नाही हे मात्र लक्षातही येत नाही.

Web Title: using wrong emoji on whats app?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.