शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

माहितीचा अधिकार वापरा आणि खड्याचे दोषी कोण हे विचारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 4:50 PM

एका पावसात रस्त्यात खड्डे पडले, कायम हेच, कधी बदलणार? अशी नुस्ती कटकट करू नका. विचारा सरकारला की, हा खड्डा नेमका कुणाचा दोष?

- मिलिंद थत्ते 

रस्ता आताच झाला. पावसाळ्याच्या जस्ट आधी आणि खड्डे पडलेसुद्धा! काय कंत्राटदाराने पैसे खाल्ले का अभियंत्यांनी खाल्ले, काय कळंना. ते गेले त्यांची कमाई करून नि आम्हाला हितं रोज जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून जावे लागते ना बे! अपघात होतील, म्हातारे-कोतारे पडतील, मग बातम्या येतील अन मग कायसुदीक फरक नाय पडनार. पुढची 10 वर्षे तरी रस्ता तसाच सहन करावा लागतोय.

-अशी बडबड करून बोटं मोडायची किंवा बोटात लेखणी घ्यायची नि एक माहिती अधिकार ठोकायचा. बोला काय केल्यानं आपल्या आवतीभोवतीचं चित्र बदलेल?बोला, हाय का तयारी? मग असं करा - माहिती अधिकाराचा नमुना अर्ज घ्या. तसाच अर्ज हाताने लिहिला तरी चालतो. टाइप केलेला, छापलेलाच पाहिजे असं काही नाही. त्यात तुमच्या जवळच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचं नाव, पत्ता व वर जनमाहिती अधिकारी असं लिहून टाका. 1) मग अर्जदार म्हणून तुमचे नाव, पत्ता लिहा. 2) माहितीचा कालावधी - ‘तो रस्ता बांधायच्या आधीपासून ते आजच्या तारखेपर्यंत’ असा लिहा. 3) माहितीचा तपशील लिहिताना कुठून ते कुठूनचा रस्ता ते लिहा व त्या रस्त्याशी संबंधित पुढील माहिती मिळावी असे लिहा. म्हणजे, अ) सदर रस्ता बांधकामाच्या करारांची/कंत्राटाची प्रत, ब) दोषदायित्व कालावधी, क) वर्कऑर्डरची (काम सुरू करण्याचा आदेश)  प्रत. 4) माहिती अधिकाराच्या अर्जात तपशील लिहिताना उगा पसारा करू नये. 150 शब्दाच्या आत आपले लिहून झाले पाहिजे.5)  नेमके मुद्दे किंवा दस्तावेज लिहिणं महत्त्वाचं. 6) वरच्या मसुद्यात ‘दोषदायित्व कालावधी’ म्हणजेच डिफेक्ट लायबिलिटी पिरिएड असा शब्द आहे. कोणतेही बांधकाम केल्यानंतर ठरावीक काळासाठी त्या बांधकामात दोष आल्यास जबाबदारी कंत्राटदाराची असते. तुमचा रस्ता आताच झाला आणि सहा महिन्यांच्या आतच खड्डे पडले तर नक्कीच हे दोषदायित्व कालावधीत बसते. तुमच्या माहिती अधिकारात हा शब्द आला म्हणजे तुम्हाला फसवणं सोपं नाही हे यंत्रणेला कळतं.7) अर्जात माहितीचा तपशील लिहून झाला की, ‘माझा अर्ज दुस-या माहिती अधिका-याकडे वर्ग करायचा झाल्यास कलम 6(3) खाली तशी कारवाई करून मला सूचित करावे’ असं वाक्य लिहा. आता कुठलाही माहिती अधिकारी, ‘आमच्या हापिसला ही माहिती भेटत नाही दुसरीकडे जा’ असं तुम्हाला म्हणू शकत नाही. 8) तुम्ही कुठेही अर्ज दाखल केलात तरी तो अर्ज योग्य त्या ठिकाणी पाठविण्याची जबाबदारी त्या माहिती अधिकार्‍याची असते. आपण वणवण करायचं काम नाही. 9) लक्षात ठेवायचं लोकशाहीत आपण नागरिक म्हणजे खास माणसं! फक्त आपली ताकद आपण वापरली पाहिजे.

    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

 milindthatte@gmail.com