शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

निर्माण उत्तरं शोधणारा प्रवास

By admin | Updated: January 26, 2017 01:45 IST

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न

 निर्माण आणि आॅक्सिजन

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.

आयआयटी, आयआयएम यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकलेली/शिकत असलेली मुलं एकत्र जमतात ती समाजाबद्दल आणि आपल्या स्वत:बद्दलची आपली समज वाढावी म्हणून! वाचन, चर्चा, खेडोपाडी प्रत्यक्ष कामाचा अनुभव यातून पुढे सरकत सरकत ही मुलं एका वेगळ्या अनुभवाने संपन्न होतात.

गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ५०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे.या ‘निर्माण’शी आपल्या सगळ्यांची ‘ओळख’ व्हावी म्हणून हा एक प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू करतोय. आयडिया एकदम सोपी आहे. सर्वसंगपरित्याग किंवा सोप्या भाषेत सर्व सुखांचा त्याग वगैरे न करता, आपलं शिक्षण-आपला जॉब याला सोडचिठ्ठी न देताही ‘अर्थपूर्ण’ आयुष्य जगण्याच्या प्रयोगात हे ‘निर्माणी’ जे शिकतात, अनुभवतात ते त्यांनी आपल्याला सांगायचं. हा संवाद सोपा आणि थेट व्हावा म्हणून आपण त्यांना काही प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न : आयुष्यात सेटल होणं म्हणजे काय?आयुष्यात सेटल होणं म्हणजे काय?डोळ्यावरची पट्टी काढली तर...लहानपणापासून मी माझ्या आजूबाजूच्या लोकांची आयुष्यात सेटल होण्याची धडपड पाहत आलोय. कोणाला आपलं स्वत:चं घर हवं आहे, तर कोणाला लग्न करून संसार करायचा आहे. त्याबरोबरच कोणाला नव्या व्यवसायात जम बसवायचा आहे, तर कोणाला स्वत:साठी धुंडाळायला नव्या वाटा शोधायच्या आहेत. सर्वांची इच्छाशक्ती आणि चिंता तेवढीच. मग त्यांची स्वप्नं इतकी वेगळी कशी काय? यात माझी सेटल होण्याची कल्पना काय? - हा प्रश्न तर नेहमीच होता. चारचौघांच्या मागे जाऊन परत येऊन नव्या रस्त्यांवर भटकून आल्यावर ती कल्पना शेवटी मला सापडली. 

अटलांटा शहरातील मत्स्यालयात मी ‘व्हाइट स्पॉटेड जेलीफिश’ नावाचा एक अतिशय सुंदर असा मासा पाहिला. त्याची पाण्यातील इकडून तिकडे सतत पोहत राहण्याची कसरत मी कितीतरी वेळ पाहत होतो. काही वेळानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. या माशाला डोळे नसतात. मनसोक्त पोहत असताना त्याला हा प्रश्न पडला नसेल, की तो हे का करतोय? का तो समोर काही ध्येय नसतानाही इतकी धडपड करतोय? मग लक्षात आलं की बऱ्याचदा माझ्या आयुष्यातल्या धडपडीबद्दलही मला असा प्रश्न येऊन गेला होता!

‘माझ्या आयुष्याचं काय करायचं’ याचा गंभीरपणे विचार केला नाही, तर माझ्यासाठीही सर्व आंधळी कोशिंबीर आहे. डोळ्यावर समाजाच्या अपेक्षांची पट्टी आणि आजूबाजूच्या चारचौघांनी दिलेली आरोळी ऐकून त्या दिशेने धावायचं! मग कुठे पोहोचण्याची अपेक्षा करून तरी काय फायदा? मी मानतो की माझ्या डोळ्यावरची पट्टी एकदा निघाली, म्हणजेच मला जेव्हा डोळसपणे आणि स्वावलंबी मनाने, कोणीतरी दिलेल्या आरोळीचा मागोवा न घेता धावता येईल तेव्हा मी खऱ्या अर्थाने सेटल झालेलो असेल.

माझ्या आयुष्यात सेटल होणं म्हणजे कोणत्या मार्गावर चालताना मला ज्या रस्त्यावर भटकायला आवडेल त्या रस्त्याला लागणं. त्या रस्त्यावर चालण्यासाठी पूर्णपणे तयार होणं. एकदा का तो आत्मविश्वास माझ्यात आला, की मी समजेन मी सेटल झालो. मग यश-अपयश या माझ्यासाठी फक्त वाटा आहेत. गडचिरोलीतल्या ‘महावाडा’ नावाच्या एका गावात स्थानिक सोबत्याच्या मागे मागे जंगलात जाताना किंवा गच्च भरलेल्या मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना मला एक गोष्ट नेहमीच जाणवली. धडपड ही कोणालाही करावीच लागणार अशी अटळ गोष्ट आहे

. मग ती अशा गोष्टींवर का वाया घालवावी ज्या गोष्टींबद्दल आपल्या मनात काही भावना नाहीत? एकदा बसून शांतपणे चिंतन केलं तरी सहज कळतं, की आपल्या आजूबाजूच्या कोणत्या गोष्टींबद्दल आपल्याला कळकळ वाटतेय, कोणत्या घटना विचार करायला भाग पाडत आहेत, कोणत्या गोष्टींबद्दल काहीतरी करावं या इच्छेने अस्वस्थ वाटते. ती गोष्ट ओळखून त्यावर काम करण्याच्या रस्त्याला लागायचं असं मी ठरवलं. त्यासाठी स्वत:ला तयार करणं, म्हणजे मागे वळून पाहावं लागणार नाही, हीच माझी सेटल होण्याची व्याख्या!- विवेक पाटील, निर्माण ६(विवेकने युडीसीटी मुंबई येथून केमिकल इंजिनीअरिंग केलं असून तो सध्या अमेरिकेतील Auburn Univarcity येथे वेस्ट मॅनेजमेण्टचं पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.)आयुष्य आहे की ओझं?आयुष्यात कुणीही कधीही सेटल होत नाही, कारण जोपर्यंत आयुष्यात काही आव्हान राहत नाही आणि काही संघर्ष राहत नाही तोपर्यंत ते आयुष्य नसतं. काही लोकांना वाटतं की आयुष्यात चांगली नोकरी मिळवली, पैसा मिळवला, चांगला जोडीदार मिळाला की आपलं आयुष्य सेटल झाल. पण माझ्या मते ते आयुष्याचं सेटलमेण्ट नसतं; तो फक्त आपण स्वत:ला समजवण्यासाठी करून घेतलेला भ्रम आहे. म्हणून मला आयुष्यात सेटल होणं ही संकल्पनाच चुकीची वाटते. कारण मला तलावासारखं एकाच जागी राहायला आवडत नाही. मला नदीसारखं वाहत राहायला आवडतं. हे आयुष्य खूप छोटं आहे. आणि मला ते सगळी बंधने झुगारून जगायचं आहे. सतत नवीन नवीन कुठल्या न कुठल्या कामामध्ये स्वत:ला झोकून द्यायला आवडतं. आपण आपल्या आयुष्यात सगळं काही मिळवलं आहे आणि आपण आपल्या आयुष्यात सेटल झालो आहोत असं ज्याक्षणी मला वाटेल त्या क्षणापासून मला माझं आयुष्य ओझ वाटायला लागेल.- शुभांगिनी वानखेडे निर्माण ४(शुभांगिनी सध्या आनंदवन, वरोरा येथे तलाठी या पदावर कार्यरत आहे.)