शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

थिन फॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:36 IST

ज्यांचं वजन कमी, वजन वाढतच नाही त्यांना लुकडे, बारकुडे म्हणून बाकीचे चिडवतात. पण कुणी काहीही म्हणो, वजन वाढवण्याचा अट्टहास न करता फिट रहा. नाहीतर..

-डॉ. यशपाल गोगटे

आधुनिक तंत्रज्ञानात यंत्राचा आकार जितका छोटा तितकी त्यातली टेक्नॉलॉजी भारी ! तसेच काहीसे मानवी शरीरातही घडत असते. आपल्या आजूबाजूस काही अतिशय बारीक व्यक्ती असतात; परंतु त्या अधिक काटक असतात. त्यांना बरेच वेळा बारक्या, लुकड्या म्हणून हिणवले जाते. आईवडिलांच्या मनात तर अशा मुलांना जबरदस्तीने खायला घालून त्यांचं वजन वाढवण्याचा एकमेव विचार असतो. अशा तºहेचा कमी वजनाचा न्यूनगंड न बाळगता या मुलांना कसे बारीक ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे. अशा मुला-मुलींनी बारीकच का राहावं या बद्दलची माहिती जाणून घेऊ.बाळसं की सूज?गरोदरपणात कुपोषित मातांची अर्भके कमी वजनाची असली तरीही काटक असतात. गरोदरपणात कुपोषणामुळे बाळाच्या शरीराला कमी कॅलरिजमध्ये शरीराचे व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळता येते. जन्मानंतर मात्र या कमी वजनाच्या बाळांना बाळसेदार - गुबगुबीत करण्याच्या हव्यासापायी त्यांना अधिक प्रमाणात (आवश्यकता नसताना मागे लागून) खायला दिलं जातं. कमी कॅलरिजवर निभावणाऱ्या त्यांच्या शरीरावर या अतिरिक्त खाण्याचा भार येतो. ही मुलं बाळसेदार तर होतात; परंतु हे बाळसं त्यांच्या पुढील वयात लठ्ठपणामुळे होणाºया आजारांना निमंत्रण देतं. खासकरून वयात येण्याच्या काळात या मुला-मुलींचं वजन झपाट्यानं वाढतं. म्हणूनच जन्मत: कमी वजनाच्या (२.५ किलोच्या आतील) बाळांचं वजन वाढवण्याचा अट्टाहास टाळावा. या उलट त्यांना सुदृढ राहण्यावर भर द्यावा. शक्यतो या मुलांना बारक्या, किडकिडीत असं म्हणून हिणवू नये.प्रतिकूल परिस्थितीत, कुपोषित आईच्या पोटात वाढलेल्या अर्भकाच्या शरीराचं कार्य कमी कॅलेरिजमध्येदेखील उत्तम चालतं. त्याला अनुकूल परिस्थिती मिळाल्यास तो लठ्ठपणाकडे वळतो व चयापयाच्या आजारांना बळी पडतो.थीन फॅट इंडियन१८-२० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असतं ते आपल्या शरीराला सहजपणे पेलवते. सामान्यत: एक समज आहे की वयाबरोबर वाढणारं वजन हे शरीराला सहजपणे पेलवता येतं. तुमच्या १८-२० वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचं वजन पाच किलोपेक्षा अधिक असेल, आणि जरीही ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरुवात ठरू शकते. ही गोष्ट खासकरून भारतीय समाजात खरी ठरते.बºयाचशा भारतीयांचं वजन जन्मत: कमीच असते व ते १८-२०व्या वर्षांपर्यंत कमीच राहतं. आपल्या वजनप्रेमी मानसिकतेमुळे या लोकांना जाड केलं जातं. यामुळे आज भारतामध्ये चयापचयाचे आजार साथीच्या रोगाप्रमाणे पसरत आहेत. भारतीयांमध्ये आढळणाºया अशा लोकांना थिन फॅट असे म्हटले जाते. ही लोकं दिसायला जरी बारीक असली तरीही त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण अधिक असतं व ते नुकसानकारक ठरतं. त्यामुळे तुलनात्मक रीतीने ते लठ्ठ किंवा जाड याच वर्गात मोडतात. अशा लोकांनी फक्त दिसण्याचा विचार न करता थीन फॅट न राहाता थिन फिट राहण्याचा प्रयत्न करावा.

(लेखक एण्डोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत. dryashpal@findrightdoctor.com)