शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

ठाकूर, तुम बचके रहियो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:22 IST

बिग डाटा हा शब्द ऐकलाय तुम्ही? तो आपल्या अवतीभोवती घोंघावतोय. आपल्या घरात पोहचलाय.. त्याची रूपं दिसताहेत का पहा..

- डॉ. भूषण केळकरबिग डाटा. हा शब्द हल्ली तुम्ही वारंवार ऐकता. बिग डाटाबद्दल सांगण्याआधी मला गेल्या आठवड्यातील ५ ठळक घटना (ज्या तुम्हीपण वाचल्या असतील) तुमच्या समोर मांडायच्या आहेत. त्या सर्वात एआयचा अन्योन्य संबंध आहे. ज्यायोगे आपण इंडस्ट्री ४.० काय आहे हे अधोरेखित होईल.पहिली बातमी म्हणजे अमेरिकेतील ‘टॉयरस’ नावाची खेळण्यांची अग्रगण्य कंपनी बंद होणार ही झालेली घोषणा. या घोषणेचा अर्थ म्हणजे ३०,००० लोकांच्या नोकरीवर कुºहाड! कारण काय तर लोक आता आॅनलाइन शॉपिंग करतात आणि दुकानात कोणी फिरकत नाही. एआयवर आधारित कंपन्यांमुळे, आॅनलाइन खरेदीमुळे!!दुसरी बातमी स्टीफन हॉकिंग. त्यांचे निधन झाले. त्याच्या निधनानं मानवी प्रगतीमध्ये ‘कृष्णविवर’ तयार झालंय हे तर खरंच; पण ते म्हणत की, ‘‘ग्लोबल वॉर्मिंग आणि एआय यामुळे मानवाने पुढील १००-१५० वर्षात पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर वस्ती करावी, अन्यथा मानवाचं काही खरं नाही!’’तिसरी बातमी. इलॉन मस्क म्हणजे टेस्ला या एआय आधारित इलेक्ट्रिक कारचा जनक म्हणतोय की, ‘‘एआय हे तंत्रज्ञान आण्विक शस्त्रांपेक्षा अधिक भयवह आहे!’’ हाच इलॉन मस्क जणू स्टीफन हॉकिंगकडून प्रेरणा घेतल्याप्रमाणे स्पेसेसक्स या प्रकल्पाद्वारे मंगळावर मानवी वस्ती होण्यासाठी प्रयत्नशील आहे !चौथी बातमी मुंबईवर धडकलेल्या शेतकरी मोर्चाची. हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकºयांचे जे नुकसान होतंय. त्यावर एआय वापरून उपायपण करता येईल, असा आशेचा किरणही असणारी. त्याविषयी अधिक लेखमालेत पुढे स्वतंत्र बघू.पाचवी बातमी आहे ती पुण्यातल्या ‘पॉप्युलर बुक हाऊस’ व मुंबईतील ‘स्ट्रॅण्ड’ ही दोन पुस्तक विक्रीमधील मानबिंदू असणारी दुकानं बंद होण्याच्या घटनांची ! पुन्हा कारण तेच एआय व डिजिटल तंत्रज्ञानामुळे आॅनलाइनची चलती ! याचमुळे अमेरिकेतसुद्धा बॉर्डर नावाची पुस्तकांची दुकानं जवळजवळ ४०० बंद पडली आणि ११,००० लोकांच्या नोकºया गेल्या होत्या!वरील ५ बातम्या अगदी ताज्या ताज्या हेच सांगतात की, ‘‘ठाकूर तुम बचके रहियो’’.एआय आणि इंडस्ट्री ४.०ची दखल आपण वेळीच घेऊ या हे सांगणारे वरील ‘‘पाचामुखी परमेश्वर’’ मांडलं ते यासाठी!तर बिग डाटा हा या इंडस्ट्री ४.०चा नावाप्रमाणे बिग, अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे. बिग डाटा याचं साधं स्पष्टीकरण देताना ५ व्ही सांगतात. व्हॉल्यूम म्हणजे जी माहिती तयार होते आहे ती अतिप्रचंड आहे. अंदाज येण्यासाठी सांगतो की, साधारण १.५ जीबीमध्ये २ तासाचा सिनेमा मावतो. सर्वसाधारण कंपन्यांमध्ये असे १ लाख सिनेमे मावतील एवढा डाटा आहे ! प्रत्येक कंपनीमध्ये !! हेच बघ ना, आपण एवढे फोन कॉल, एसएमएस, डाउनलोड करतो मोबाइलमध्ये तो सगळा डाटा कित्येक अब्ज लोकांचा केवढा असेल!बिग डाटाचा दुसरा व्ही आहे तो वेलॉसिटी. अनेकविध उपग्रहांकडून येणारी माहिती, बँकांची माहिती आणि आपली मोबाइलची माहिती ज्या वेगाने तयार होते आणि त्या पृथक्करण करावे लागते तोही वेग!बिग डाटाचा तिसरा ‘व्ही’ आहे तो व्हरायटी. पूर्वी माहिती ही टेक्स्ट्युअल आणि न्युमरिकल होती. आज ती चित्र, फोटो, आॅडिओ, व्हिडीओ, बोटांचे ठसे, स्पर्श, डोळ्यातील बाहुली इ. सर्व प्रकारची माहिती आहे.सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे समाजमाध्यम व त्याची सर्वदूर व्याप्ती. दुसरं उदाहरण म्हणजे आधार ! आधारमध्ये तुमचे नाव, पत्ता इ. तुमचे वय, जन्मतारीख इ. आकडे एवढेच नाही तर बोटांचे ठसे, फोटो इ. असते.चौथा व्ही आहे व्हेरासिटी. म्हणजे माहितीतील अनिश्चिता म्हणजे माहितीमध्ये असणारा नॉइज आणि सापेक्षता.अलीकडेच ५वा व्ही बिग डाटामध्ये जोडला गेलाय तो म्हणजे व्हॅल्यू. माहितीतून मिळणारी ‘दृष्टी’!इंडस्ट्री ४.० चा बिग डाटा हा पंचप्राण आहे, तो असा.( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com )