शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
2
महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
3
Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
4
केंद्र सरकारचा 'X' ला शेवटचा इशारा! 'Grok AI' मधील अश्लील मजकूर हटवण्यासाठी दिली डेडलाइन
5
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
6
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
7
Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
8
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
9
भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
10
एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
11
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
12
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
13
युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी
14
साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
15
"मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण..."; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा
16
बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
17
फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा...
18
Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
19
काहीही केलं तरी वजन कमीच होईना... 'रताळं' ठरेल सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत
20
"आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जग गेलं खडय़ात असं का म्हणतंय हे पुस्तक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:20 IST

‘अ सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक’ असं अजब नाव असलेलं हे पुस्तक, आहे भन्नाट!

ठळक मुद्देतुम्हाला खरंच काय आवडतं ते ओळखायला शिका, बाकी सगळं गेलं खड्डय़ात! असं सांगणारं पुस्तक सध्या जगभरात बेस्टसेलर का आहे?

- प्रज्ञा शिदोरे  

सेल्फ हेल्प बुक्स. म्हणजे स्व मदत पुस्तक. हे करा की ते होईल, यशाचे पन्नास मंत्र वगैरे सांगणारी ही पुस्तकं. या पुस्तकांपासून मी तशी चार हात लांबच असते. पण या पुस्तकाचं नावच इतकं दचकवणारं आणि भलतंच की वाटलं काय हे पुस्तक. ‘अ सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक’ हे असं नाव. हे काय पुस्तकाचं नाव असावं का? एकदम फारच ‘वान्नबी’ टाइप्स. पण नाव असं अजब असलं तरी जगात हे बेस्टसेलर ठरलंय. असेल उगाच काहीतरी रँडम फिलॉसॉफी झाडणारं पुस्तक असं वाटलं मला. पण काही दिवसांपूर्वी त्याचा मराठी अनुवाद पाहिला आणि सहज वाचायला घेतलं.मार्क मेन्सन हा या पुस्तकाचा लेखक. त्याचं हे पुस्तक म्हणजे ‘सकारात्मकता विकणार्‍या सेल्फ हेल्प इंडस्ट्री’ला दिलेलं सणसणीत उत्तरच आहे. त्याच्या मते, लोक उगाचच खोटं खोटं सांगत असतात. पॉझेटिव्हिटी वगैरे! ते सगळं ऐकून, वाचून आपण सत्यापासून लांब जातो. स्वतर्‍ला नीट ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आपली गोची होते. जरा तिखट आहे मत; पण आहे विचार करायला लावणारं!या पुस्तकाचा गाभा असा की तुम्हाला खरंच काय आवडतं ते ओळखायला शिका, बाकी सगळं गेलं खड्डय़ात! मार्क म्हणतो, जेव्हा आपण स्वतर्‍शी खरं बोलायला लागू, स्वतर्‍ला खरं सांगू तेव्हा  आपल्यात असलेली कमतरता मोडून काढण्याचं बळही आपल्याला मिळेल. आपण प्रत्येकवेळा ‘माझं आयुष्य प्रॉब्लेम फ्री कसं असेल’ याच विचारात असतो. आयुष्य असं नसतं. कोणीच कधीच प्रॉब्लेम्स शिवाय जगत नाही.  तेव्हा समस्यांपासून दूर पळण्यापेक्षा कोणती समस्या सोडवायला आवडेल अशा समस्यांची नीट निवड करा आणि त्याला भिडा!हे पुस्तक वाचून झाल्यावर तुमच्या डोक्याला अजिबात शॉट लागणार नाही, पण तुम्हाला जगण्याचा नवीन दृष्टिकोन मिळेल एवढं नक्की. मार्कमेन्सन या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या फिलॉसॉफीबद्दल काय बोलतो हे सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि ऐका .‘घंटा फरक न पडून घेण्याची बेमालूम कला’ हे या पुस्तकाचं मराठी नाव आहे, तेही वाचता येईल!