शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

स्वभावाला औषध असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:08 IST

दिवसभर एकटी रूमवर पडून असते. खाणंपिणं नाही, अंघोळ नाही, आत्मविश्वास कमी, कशातच मन लागत नाही. सोहिनीचं नेमकं काय बिनसलेलं असेल?

ठळक मुद्दे हेल्पलाइन - कुणाशीच बोलता न येणारे विषय बोलण्याची हक्काची जागा!

- मानसी जोशी

सोहिनी दवाखान्यात आली तीच रडत रडत. गेल्या काही महिन्यांपासून तिला अतिशय निराश आणि हताश वाटत होतं. मूळची नागपूरची असलेली सोहिनी बारावीनंतर मुंबईत प्रतिष्ठित महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेत होती. पहिल्याच वर्षाला असताना तिचं अभ्यासात लक्ष कमी होऊ लागलं. ती कॉलेजला जाईनाशी झाली. दिवसभर आपल्या रूमवर एकटी पडून राहायची. खाणंपिणं नाही, अंघोळ नाही. हळूहळू तिचा आत्मविश्वास नाहीसा होत चालला होता. तिचं कोणत्याही गोष्टीत मन लागेना. कशातच रस वाटेना. शेवटी रूम पार्टनरने तिच्या घरी फोन करून तिच्या तब्येतीची खबर दिली. वडील येऊन गेले, चार दिवस राहिले. कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटले. तिला घरी घेऊन जातो म्हणाले; पण त्यालाही ती तयार नव्हती. शेवटी तिनं मानसोपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि एका मैत्रिणीला घेऊन दवाखान्यात आली. तिच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की तिला सतत धडधड, भीती वाटत होती, घराबाहेर पडणं तिनं पूर्ण बंद केलं होतं. तपशिलात शिरल्यावर असं लक्षात आलं की हे यापूर्वीसुद्धा एक-दोन वेळा होऊन गेलं होतं. तत्कालिक कारणं नेहमी वेगवेगळी असतात. या वेळचं कारण होतं ब्रेकअप. तिच्या सततच्या मूड स्विन्ग्सना कंटाळून तिच्या मित्नानं तिला पुन्हा आपण नको भेटायला असं सुनावलं आणि मॅडम कोसळल्या. एका क्षणात जानू, स्वीटू असलेला तो हरामखोर, लुच्चा आणि मतलबी बनला. तिच्या मैत्रिणीने सांगितलं की तिच्या मनासारखं झालं नाही तर ती असंच करते, जीव द्यायची धमकी देणं, ब्लेडनं हात कापून घेणं, आदळ आपट, चिडचिड करणं आणि नंतर दिवसेंदिवस नैराश्य. असं चक्र  तयार झालं होतं.सोहिनीचं सध्याचं निदान जरी नैराश्य असलं आणि त्यासाठी तिला औषधोपचारांची गरज असली तरी मूळ समस्या ही तिच्या स्वभावदोषांत आहे असं दिसतं. आक्र मक, आततायी, समाजोमुख, धीट, बोलका किंवा भित्रा , घाबरट, चिंता करणारा, विचित्न विचार करणारा, संशय घेणारा असे स्वभावाचे असंख्य कंगोरे आपल्या सगळ्यांच्या मध्येच कमी-अधिक प्रमाणात असतात; परंतु एखादी स्वभाव विकृती जेव्हा या कोणत्याही प्रकारचा अतिरेक करते तेव्हा त्याचा तिच्या सर्व नातेसंबंधांवर, कामावर आणि पर्यायानं आयुष्यावर परिणाम होत असतो. या स्वभाव विकृती कुत्र्याच्या शेपटासारख्या असतात. वाकडय़ा (कि वाकडय़ात). स्वभावाला औषध नाही म्हणतात ते काही उगीच नाही. लहानपणाच्या अनुभवांतून, सभोवतालच्या परिस्थितीतून या विकृती निर्माण होत असतात आणि त्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य हिस्सा होऊन जातात. त्यात आयुष्यात एखादा तणाव उद्भवला की या विकृती अक्राळ-विक्र ाळ स्वरूपात प्रकट होतात आणि जोडीला इतर मानसिक समस्या घेऊन येतात. तसंच सोहिनीचं झालं होतं.अशा व्यक्तींना मानसोपचारांची मदत होते. त्याचा खूपच परिणाम दिसून येतो. आयुष्य जगताना निर्माण होणार्‍या समस्या सोडवायला हे उपचार मदत करतात. आणि कालांतराने आपण हे प्रश्न आपले आपले सोडवायला शिकतो. मात्र आपलं नक्की काय होतं आहे, हे कळलं तर पाहिजे. ती अनेकदा असते का?हा प्रश्न आहे.

( मानसी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ आहे.)