चला, सुरू झालं पुन्हा रुटीन. पावसाळ्याच्या तोंडावर अॅडमिशन्स उरकल्या, आता कॉलेजला सुरुवात. वही पुरानी कॅम्पस कहानी.त्यात नवीन काय?
असं ज्यांना वाटतं ना, ते वयानं तरुण असले तरी मनानं म्हातारेच असतात, तो जस्ट लिव्ह देम.
आपण आपल्याविषयी बोलू.गेले काही महिने तुम्ही सातत्यानं ऑक्सिजनचे ‘विशेषांक’च वाचले. आधी निवडणुका, मग मे महिन्यातली आपली करिअर स्पेशल सिरीज.अजून फोन येताहेत त्या ‘उद्योजक होता येईल’ असं सांगणा:या अंकाविषयी,आणि अजूनही अनेक जण तक्रार करतच आहेत की, अमुक विषयावरचा करिअर विशेषांक का केला नाही.काहींचा मात्र अनेकदा भलताच डिसमूड, यार माङया इंटरेस्टचा नव्हता ना अंक, त्या काळात ऑक्सिजनच्या फेसबुकवर तरी वेगळे विषय पोस्ट करा. जुने लेख टाकले तरी चालतील.हजारो ख्वाईशे ऐसी की, हर ख्वाईश पे दम निकले.
कॉलेज सुरू होता होता, या वर्षाच्या उत्तरार्धातली ही नव्यानं सुरुवात.बरंच काही नवीन, वेगवेगळं आहेच.पण या अंकापासून एक खास पेशकश.खास फॅशनच्या दुनियेत घेऊन जाणारी
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर प्राची आपल्याला फॅशनच्या दुनियेकडे, आपल्या कपडय़ांकडे आणि स्टायलिंगकडे पहायची एक वेगळी दृष्टी देण्याचा प्रय} करणार आहे.
कारण आपल्यापैकी बहुतेक जण दोनच टोकांवर असतात. काहींना वाटतं फॅशन म्हणून जे जे इतर लोकं करतात ते आपण करायलाच हवं, काहींना वाटतं, फॅशन म्हणजे बिनडोक लोकांचं काम, आपला काय संबंध?या दोन्हीच्या मधे आहे, नव्या दुनियेत प्रेङोंटेबल आणि स्मार्ट दिसण्याचं सूत्र.
खरं तर आजच्या काळातली एक कलाच.ती कशी शिकायची, हेच तर प्राची सांगतेय. आणि हो,
उद्या गुरुपौर्णिमा.त्यानिमित्तानं अभिजात कलांच्या एका वेगळ्याच जगात तुम्हाला घेऊन जातोय.
त्या जगात आपल्यालाही बरंच काही सापडावं.सो, लेट्स स्टार्ट.!