शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

इतिहासाच्या पाऊलखुणांना मायेची साद

By admin | Updated: February 4, 2016 20:52 IST

ऐतिहासिक वारसास्थळं एका देशात असली तरी ती जगभरातल्या मानवी वाटचालीचा ऐवज आहेत. तो जपायला हवा म्हणून सुरू झालेली एक ‘तरुण’ चळवळ. वर्ल्ड हेरिटेज युथ फोरम.

कंबोडिया नावाच्या देशात नुकतीच एक आगळीवेगळी परिषद पार पडली.
वर्ल्ड हेरिटेज युथ फोरम असं या परिषदेचं नाव. आशिया-पॅसिफिक खंडातल्या जवळपास 2क् देशातले 20 ते 31 वयोगटातली तरुण मुलंमुली या युथ फोरमच्या माध्यमातून एकत्र आली होती.
कशाला?
आपापल्या देशात, प्रांतात जी काही जागतिक वारसास्थळं आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आणि जतनासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी ही तरुण मुलं एकत्र जमली होती. ही ऐतिहासिक ठिकाणं आपल्या देशात असली तरी ती जागतिक वारसा आहे, मानवी जगण्याचा आजवरचा ऐवज आणि त्याच्या खुणा आहेत यावर या सगळ्या मुलांचं एकमत झालं होतं.   
आपण नवीन वर्षाचे (पूर्ण न होणारे) संकल्प सोडत होतो त्याच काळात कंबोडियात ही मुलं मात्र आपल्या देशाच्या उरल्या सुरल्या ऐतिहासिक पाऊलखुणा कशा वाचवायच्या, जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे तिचं संवर्धन कसं करायचं यावर डोकं लढवत होती. तज्ज्ञांशी चर्चा करत होती. 
या चर्चेतनं काय बरं समोर आलं असावं? 
बाकी लोकांसह तरुण मुलामुलींचीही या विषयातली अनास्था. आपल्या इतिहासाची साक्ष ठरलेल्या वास्तूंचं जतन करण्याबाबतची उदासीनता आणि निरुत्साह. हे काम काही आपलं नाही, त्यासाठी सरकार आहे ना, आपण काय करणार, ही अशी कामं तर प्रशासनच करू शकतं, असं म्हणून फारतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे तरुण मुलं काहीही करत नाहीत. 
जागतिक वारसा जाऊद्या, पण निदान आपल्या गावात, शहरात ज्या काही छोटय़ामोठय़ा इतिहासाच्या खुणा आहेत त्यासुद्धा किती मोलाच्या आहेत, हेसुद्धा तरुण मुलांना देशप्रेमाच्या बाता मारताना जाणवत नाही, अशी काळजी युथ फोरममध्ये सहभागी झालेल्या सर्वच देशातील मुलामुलींनी व्यक्त केली. त्यामुळेच प्रत्येक देशातल्या तरुणाईपर्यंत केवळ जागतिक वारसास्थळच नाहीत, तर त्या त्या ठिकाणच्या ज्या काही वास्तू आहेत, त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी प्रत्येक विद्यापीठात युथ फोरमनं कार्यक्रम आयोजित करावेत, असं मुलांनी एकमतानं ठरवलं. शिवाय वर्ल्ड हेरिटेज डेला तरुणांसाठी विविध कार्यक्र मांचं, स्पर्धांचं आयोजन करणं, जनजागृती करणं, इतर तरुण मुलामुलींशी बोलणं आणि आपल्या जगण्यात इतिहासाला थोडी जागा मायेनं देता यावी यासाठी प्रयत्न करणं, असं या मुलामुलींनी ठरवलं!
आपापल्या देशात जाऊन आता या विषयावर तरुण मुलामुलींशी बोलायचं, आपला वारसा जपण्यासाठी प्रयत्न करायचे असं त्यांनी ठरवलं आहे.
मुळात तरुणांनी पुढाकार घेऊन ऐतिहासिक वारसास्थळं जपावीत हाच या परिषदेचा हेतू आहे.
 
- अर्चना राणो-बागवान
 
 
 
वल्र्ड हेरिटेज युथ फोरम 
आहे काय?
 
* वल्र्ड हेरिटेज एज्युकेशन प्रोग्रॅममार्फत वल्र्ड हेरिटेज युथ फोरम हा उपक्रम आयोजित केला जातो. पहिली वल्र्ड हेरिटेज युथ फोरम 1995 मध्ये नॉर्वेत पार पडली होती. त्यानंतर दरवर्षी विविध ठिकाणी असे युथ फोरम आयोजित केले जातात.
* युथ फोरमचं काम अधिक प्रभावी व्हावं यासाठी रिजनल युथ फोरम आयोजित करण्याचं युनेस्कोनं ठरवलं. त्यात भारतासह ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, चीन, इंडोनेशिया, जपान, लाओस, मलेशिया, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान, फिलिपाईन्स, कोरिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम हे देश सहभागी झाले होते. 
* या उपक्र मांतर्गत मुलांना, शिक्षकांना एकत्र आणून जगाच्या कानाकोप:यातली भिन्न संस्कृती, इतिहास, कलावैभव, निसर्ग, समाज याबद्दलचं शिक्षण दिलं जातं. जाणकार, तज्ज्ञ व्यक्तींकडून आपला वारसा कसा टिकवता येईल, त्यासाठी काय करायला हवं याचं मार्गदर्शन केलं जातं. सहभागी तरुणांच्या समस्यांचं निरसन केलं जातं. एकत्रित संघटित प्रयत्न कसे करता येतील, वैयक्तिक सामाजिक स्तरावर काय पावलं उचलता येतील याबद्दल चर्चा करण्यात येते. शिवाय जिथे हे फोरम पार पडतंय तिथल्या वारसास्थळाला भेट देऊन तिथल्या समस्या, तसंच त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा केली जाते. 
* कंबोडियात पार पडलेली ही आशिया खंडातली पहिलीच युवा परिषद. यादरम्यान अंगकोर या वारसास्थळाला भेट देण्यात आली होती. 
* अधिक माहितीसाठी ही वेबसाइट पहा.
http://whc.unesco.org/
 
 
 
तरुणांनी काय करायचं?
 * प्राचीन मंदिरं, गड-किल्ले, स्मारकं, ग्रंथालयं, संग्रहालयं, जंगलं यांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा संपन्न वारसा लाभलेला आहे. पण दुर्दैवाने तो टिकवण्यात आणि तो पुढच्या पिढीकडे जसाच्या तसा पोहचवण्यातही आपण कमी पडतोय. 
* या वारसास्थळांच्या संरक्षण, संवर्धनाचं काम सरकारचं असलं, तरी या देशाचे नागरिक म्हणून आपलंही ते कर्तव्यच ठरतं. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींतूनच आपण ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनात हातभार लावू शकतो. जसं या वास्तूंचा परिसर स्वच्छ ठेवणं. प्राचीन वास्तूंच्या भिंतीवर उगाच काही खरबडू नये. 
* एखाद्या वास्तूची पडझड होत असल्यास ती स्थिती स्थानिक संस्थांनी, तरुणांनी एकत्रितपणो सरकारच्या लक्षात आणून देणं. सरकारवर डागडुजी-दुरुस्तीसाठी दबाव आणणं. 
* अशा वस्तूंना लागून-खेटून कोणतंही नवं बांधकाम होणार नाही याची काळजी घेणं. 
* स्थानिकांमध्ये तसंच पर्यटनासाठी येणा:या लोकांना वारसास्थळांची माहिती देऊन त्यांच्या संरक्षण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करणं. 
 
 
महाराष्ट्रातील जागतिक वारसास्थळं
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, 
एलिफंटा केव्हज/घारापुरीची लेणी, मुंबई, 
अजिंठा लेणी,
 वेरूळ लेणी,
 पश्चिम घाट,
 कास पठार, 
कोयना वन्यजीव अभयारण्य,
 चांदोली राष्ट्रीय अभयारण्य, 
राधानगरी वन्यजीव अभयारण्य.