फूड केमिस्ट
एखाद्या प्रिण्टरमधे आपण फक्त केकचं साहित्य घातलं आणि काही मिण्टात डायरेक्ट केकच बाहेर आला तर?
गंमत वाटली ना? असं होऊ शकतं!
नासा तर सध्यासुद्धा अंतराळात वापरण्यासाठी असे फूड थ्रीडी प्रिण्टर वापरते. त्यामुळे भविष्यात असे रेडिमेड जेवण आपल्याला सहज मिळू शकते. इतके की ऑफिसमधून निघताना स्मार्टफोनवरून कमांड दिली तर घरच्या स्टोअरेज वजा प्रिण्टरवर आपल्याला हवा तो पदार्थ तयार!
हे असं होऊ शकतं, मुख्य म्हणजे हे कल्पनारंजन नाही!
काम काय?
हे असं काल्पनिक वाटणारं काम शक्य करून दाखवायची कमालच हे फूड केमिस्ट करणार आहेत. प्रिण्टरमधलं काट्रिडेज कसं असेल, अन्नातले फ्लेवर कसे टिकतील, त्यातली पौष्टिकता कशी कायम राहील हे सारं सांभाळून नवी टेक्नॉलॉजी आणायचं काम हे फूड केमिस्ट करतील!
संधी कुणाला?
हे कामच अत्यंत हायप्रोफाइल आहे. फूड सायन्सची बॅचलर डिग्री ही त्यासाठीची पहिली अट. फूड टेक्नॉलॉजीचा कोर्सही करता येतो. त्यातून एकेक पाऊल पुढे टाकत या पदार्पयत पोहचता येतं.
डेण्टल हायजिनिस्ट
डेण्टल हायजिनिस्ट म्हणजे दातांचा डॉक्टर का?
तर नाही, डॉक्टर नाही. त्या आधीचं काम तो करेल!
दातांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढतेय. पण सगळ्यांना दातांच्या डॉक्टरकडे जाणं परवडत नाही. दंत आरोग्याचा डिप्लोमा केलेली ही माणसं विशेषत: अमेरिकेत सध्या आहेत. दातांच्या आरोग्याची बेसिक काळजी घेणं हे त्यांचं काम.
काम काय?
डेण्टल हायजिन सांभाळणं म्हणजे दात क्लीन करून देणं, पॉलिश करणं, एक्सरे काढणं आणि गरज असेल तर रुग्णाला दातांच्या योग्य डॉक्टरकडे पाठवणं हे काम हे डेण्टल हायजिनिस्ट करतील.
संधी कुणाला?
यासंदर्भातले थेट कोर्स आपल्याकडे उपलब्ध नाहीत. मात्र यासंदर्भातली माहिती अमेरिकन डेण्टल हायजिनिस्ट असोसिएशनच्या वेबसाइटवर पाहता येईल.
टेलिसर्जन
डॉक्टरच, सर्जनच पण काम टेक्नॉलॉजीशी जोडलेलं. हे डॉक्टर शिक्षण मात्र घेतात रिमोटली ऑपरेट करण्याचं. त्यासाठी रोबोटिक आर्म्स वापरण्याचं, मास्टर कण्ट्रोलचं अािण सेन्सरी सिस्टिमचं ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं असतं.
काम काय?
रुग्ण समोर नाही, प्रत्यक्ष नाही पण तंत्रज्ञान वापरून रिमोटनं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचं हे नवं तंत्र आहे. रोबोटिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचं तंत्रही हे डॉक्टर शिकलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णसेवा देता येत नाही, पण उपचार आणि शस्त्रक्रिया महत्त्वाची तिथं हे रिमोट सर्जन काम करू शकतील.
संधी कुणाला?
अजून आपल्याकडे हे तंत्र फार विकसित झालेलं नाही. पण कोचीच्या अमृता इन्स्टिटय़ूटमधे एक टेलिमेडिसिनची शाखा आहे. http://www.aimshospital.org/get-help/our-departments/centers/centre-for-digital-health/telemedicine/)
फ्लेवरिस्ट
या फ्लेवरिस्टना फ्रॅगनन्स केमिस्ट असंही म्हणतात. विशेषत: परफ्यूम इण्डस्ट्रीत ते मोठय़ा प्रमाणात काम करतात. मात्र स्त्री-पुरुषांचे साबण, स्वच्छतागृहात वापरात येणारे केमिकल्स, रूम फ्रेशनर आणि विविध पदार्थाचे वास या सा:याचा अभ्यास करून योग्य सुवास पुरवणं हे या केमिस्टचं काम. येत्या काळात या फ्लेवरिस्टची मागणी वाढेल.
काम काय?
विविध कंपन्या, प्रॉडक्ट, लाइफस्टाईल प्रॉडक्ट, पॅक फूड या सा:यांचे फ्लेवर निश्चित करणं हे या फ्लेवरिस्टचं काम असतं.
संधी कुणाला?
केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री या विषयात पदवी, मास्टर्स, पीएचडी करणा:या उच्चशिक्षितांना या क्षेत्रत संधी आहे.
पेट फूड टेस्टर
पेट फूड कसं लागतं, आपण कधी कुठं खाऊन पाहतो? पण अशीही काही माणसं असतात जी हे पेट फूड खाऊन पाहतात. पाळीव प्राण्यांसाठी पौष्टिक काय, त्यांना कुठली चव आवडेल याचा विचार करून तसे पॅक फूड तयार करण्याच्या रेसिपी तयार करून देतात.
काम काय?
पेट फूडच्या विविध कृती सुचवणं, त्याचा फ्लेवर निश्चित करणं, त्यातली पौष्टिकता पाहणं आणि ते बनवणा:या कंपनीला अधिक सकस अन्न तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणं हेच त्यांचं काम. कुत्री, मांजरी, पोपट ते अगदी गायी-म्हशींसाठीचं खाद्य ते तयार करतात.
संधी कुणाला?
फूड सायन्सची डिग्री आणि पाळीव प्राण्यांबद्दल अतीव प्रेम ही यासाठीची महत्त्वाची गरज.
पेपर टॉवेल स्निफर
टिश्यू पेपरचा वास कधी घेऊन पाहिलाय? असा वास घ्यायला लोक पगारी माणसं नेमतात आणि त्यासाठी पैसे मोजतात यावर विश्वास ठेवाल तुम्ही?
पण हे खरंय!
काम काय?
जगातले विअर्ड जॉब मानले जातात त्यातलं हे एक काम. कागदाचा वास घेऊन पहायचा. टिश्यू पेपर आणि पेपर टॉवेल इंडस्ट्री मोठी आहे. त्यासाठी जास्त वास येणारी माणसं नेमली जातात.
संधी कुणाला?
अजून आपल्याकडे ही इंडस्ट्री नाही, ना त्याचे कोर्स आहेत. पण आऊटसोर्स होणा:या कामात पेपर इंडस्ट्री जशी वाढेल तसं या कामासाठी मागणी वाढेल अशी शक्यता आहे.