शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

से NO टू Ragging- इण्टर्न डॉक्टर्सच्या जगात रॅगिंगच्या जीवघेण्या वेदना  नक्की काय आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 06:30 IST

तोंड दाबून बुक्क्यांचा मार अनेकजण खातात, कुणाचा जीव जातो तेव्हा फक्त यासार्‍याची चर्चा होते. एरव्ही मात्र फ्रेण्डली रॅगिंगच्या नावाखाली सर्रास ज्युनिअर्सना धारेवर धरलं जातं, हे थांबायला हवं. म्हणून आजच्या अंकात ही रॅगिंगविरोधी चर्चा..

ठळक मुद्देशारीरिक मानिसक किंवा कुठल्याही प्रकारची रॅगिंग झालं तर रॅगिंग विरोधी समितीकडे तक्रार करा.

- ऑक्सिजन टीम

मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये डॉ. पायल तडवीनं  सिनिअर्सच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली.या बातमीनं वैद्यकीय जग ढवळून निघालं आणि रॅगिंगंची झाकपाक करून दडपून ठेवलेली जखम परत भळभळूनवाहत जगासमोर आली. इण्टर्न डॉक्टर्सच्या जगात रॅगिंगच्या जीवघेण्या वेदना  नक्की काय आहेत? काय घडतं त्या जगात?हाच प्रश्न ‘ऑक्सिजन’ने राज्यभरातल्या तरुण मुलामुलींसमोर ठेवला. त्यांना आवाहन केलं की, तुम्ही असं रॅगिंग अनुभवलं असेल,सोसलं किंवा केलं असेल, त्यावर मात केली असेल तर आम्हाला लिहून कळवा,रॅगिंगविषयी बोला, आपलं कुणी ऐकतच नाही, आपण एकटे आहोत असं वाटून न घेता मोकळेपणानं बोला,नावानिशी आपला अनुभव प्रसिद्ध होऊ नये असं वाटत असेल तर तसं कळवा; पण रॅ¨गंग होतं असेल तर ते दडवू नका..

आणिअनेक इण्टर्न, जेआरवन, जेआरटू आणि डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करत असलेल्या तरुण मुलामुलींनीही आपले अनुभव लिहून पाठवले. काहींनी फोन करकरून आपल्या कथा सांगितल्या.काहींनी आपल्या पत्रात चारचारदा अण्डरलाइन आणि बोल्ड करत सांगितलं की, माझं नाव प्रसिद्ध करू नका. पण मी सध्या काय अनुभवातून जातोय ते वाचा.

कसली इतकी दहशत?

दहशत हा शब्द वाचताना बरा वाटत नसला तरी या पत्रांमध्ये दिसली ती सिनिअर्सविषयी फक्त दहशत. अनेक मुलामुलींनी लिहिलं आहे, की आम्ही सिनिअर्सच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही, त्यांच्याकडे मान वर करून पाहू शकत नाही, त्यांना स्माइल देऊ शकत नाही. आम्ही कॅम्प्समध्येही मान खाली घालूनच चालतो. पहाटे 5 किंवा रात्री 2 सिनिअर म्हणतील तेव्हा त्यांच्या कामाला हजर होतो. त्यांच्या चहा-नास्त्यापासून सगळी कामं सांगितली तशी करतो.आणि हे नाही केलं तर आमची काही खैर नाही !लगेच सगळे सिनिअर एक होतात अािण आमचं लाइन अप घेतात. म्हणजे काय तर एका रांगेत उभं राहून खाली मान घालण्याची शिक्षा, तीही तासंतास. किंवा अन्य काही.रात्रीबेरात्री सिनिअर्सला गाणी म्हणून दाखवणं, आपल्या बॅचच्या मुलांची नावं-गावं पाठ करून म्हणून दाखवणं इथपासून अनेक गोष्टींच्या कहाण्या या पत्रांत आहेत. त्यातली निवडक पत्रं पान 4 वर प्रसिद्ध करत आहोत. ज्यात ही मुलं स्वच्छ सांगतात की, इण्टर्न माणूस नसतो तो गुलाम असतो, त्याच्याशी कसंही वागलं तर चालतं.

कायदा आहे तरीही.

आपल्या देशात अ‍ॅण्टी रॅगिंगविरोधी कायदा आहे, रॅगिंग म्हणजे फक्त शारीरिक इजा, मारझोड नव्हे तर मानसिक छळालाही हा कायदा रॅगिंग मानतो. तरीही देशभरात सर्रास रॅगिंगच्या घटना घडतात कारण तरुण मुलंमुली गप्प राहतात. आपण का वाइटपणा घ्या, हे चालतंच, कॉलेजात असं घडतंच म्हणून घाबरून गप्प बसतात.आणि अगदी मोजके तक्रार करतात.मात्र त्या मोजक्यांची संख्या जरी पाहिली तरी न केलेल्या तक्रारींचा अंदाज येईल.अ‍ॅण्टी रॅगिंग डॉट इन या रॅगिंग विरोधात काम करणार्‍या साइटवर जाऊन आकडेवारी पाहिली तर 18 एप्रिल 2012 ते 17 जून 2019 या काळात त्यांच्याकडे 4715 रॅगिंगच्या तक्रारी आल्या, त्यापैकी 4650 त्यांनी निकाली काढल्या, बाकीच्यांची चौकशी सुरू आहे.रॅगिंगच्या चार हजारांहून अधिक तक्रारी जर अजूनही होत असतील तर रॅगिंगचं प्रमाण किती मोठं आहे, हे आपण समजू शकतो.तोंड दाबून बुक्क्याचा मार अनेकजण खातात, कुणाचा जीवच जातो तेव्हा फक्त यासार्‍याची चर्चा होते.एरव्ही मात्र फ्रेण्डली रॅगिंगच्या नावाखाली सर्रास ज्युनिअर्सना धारेवर धरलं जातं, हे थांबायला हवं.म्हणून ही ‘ऑक्सिजन’ची आजच्या अंकात रॅगिंगविरोधी चर्चा.बोला, पुढे व्हा, तक्रार करा..रॅ¨गंग गुन्हा आहे, त्या दहशतीला घाबरू नका.****************

रॅगिंगविरोधी कायदा काय म्हणतो?

रॅगिंग हा कायद्यानं गुन्हा आहे.अँटी रॅगिंग कायद्यानुसार विद्याथ्र्याचा शारीरिकच नाही तर मानसिक छळ केला गेला तर त्याला रॅगिंग असंच म्हणतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या उद्देशानं पूर्वीपासून सिनिअर्स रॅगिंग करतात, मात्र कशाही प्रकारच्या रॅगिंगचं समर्थन कायदा करत नाही. रॅ¨गग हा कायद्यानं गुन्हाच आहे.मात्र असा कायदा असूनही अमन कचरू या विद्याथ्र्याचा रॅगिंगमुळे मृत्यू झाला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आदेश 2009, त्यात असं नमूद करण्यात आलं आहे की कायदा अस्तित्वात असूनही या घटना थांबवता येत नाहीत. त्याकरता कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी व अधिकारी याबद्दल संवेदनशील असला पाहिजे. 

रॅगिंगमध्ये दोषी आढळल्यास काय शिक्षा?* रॅगिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या विद्याथ्र्याना परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारणं इथपासून तर पुढील शैक्षणिक प्रवेश रोखं अशी अशी शिक्षेची तरतूद आहे.* कॉलेज प्रमुख जर गुन्ह्याची दखल घेण्यास अकार्यक्षम ठरत असेल तर त्याच्यावरही कारवाईची आणि शिक्षेची तरतूद आहे. * रॅगिंग होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाद्वारा मान्य राघवन समितीच्या या शिफारसी प्रत्येक कॉलेजने लागू करणं गरजेचं आहे.अ) कॉलेज सुरू झाल्यानंतर एक ते दोन आठवडय़ांमध्ये वरिष्ठ व नवीन विद्याथ्र्याचं संस्थाप्रमुख तसेच वॉर्ड यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन करणं. ओळख परिचय सर्वाचा एकमेकास होईल असे कार्यक्रम घेणं. आ) आत्मविश्वास वाढवण्याकरता विविध उपाययोजना करणं, जसं समुपदेशकाची नेमणूक करणं, एकत्रित संवेदना जागृती कार्यक्र मांचं आयोजन करून मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणं.इ) प्रत्येक शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला प्रत्येक विद्याथ्र्याला एक विवरण पुस्तिका किंवा छोटे पुस्तक वितरित करावं ज्यामध्ये रॅगिंग करणार नाही किंवा त्यात सामील होणार नाही असं लिहून घेणं. त्यामध्ये रॅगिंगला अटकाव आणि निवारणाच्या पद्धती याची रूपरेषा असावी. 

***************************

रॅगिंग मानिसक दुबळेपणाचं लक्षण आहे. शारीरिक मानिसक किंवा कुठल्याही प्रकारची रॅगिंग झालं तर कॉलेजातल्या रॅगिंग विरोधी समितीकडे तक्रार करा.

किंवा

http://www.antiragging.in/

या वेबसाइटवर तक्रार नोंदवता येईल.

किंवाNational Anti-Ragging Helpline Phone No :- 18001805522 

या टोल फ्री नंबरवरही संपर्क करुन तक्रार नोंदवता येते.

किंवा

अँटी रॅगिंग मोबाइल अ‍ॅपही आहे. तिथं रॅगिंगसंदर्भात प्रतिज्ञापत्र व तक्र ार करण्याची सोय आहे.

किंवा*  काही स्वयंसेवी संस्था या प्रश्नावर काम करतात. amanmovement, no2ragging , Society Against Violence in Education (SAVE) .त्यांच्याशीही संपर्क करता येईल.