शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आधी डोकं वाचवा.

By admin | Updated: December 5, 2014 11:55 IST

तुम्ही ताशी फक्त १७ किलोमीटर वेगानं गाडी चालवता? की त्यापेक्षा जास्त वेगानं एक्सलेटर पिळता? जास्तच ना? आणि तेही डोक्यावर हेल्मेट नसताना?

 - डॉ. महेश करंदीकर,  सुप्रसिद्ध मेंदू शल्यचिकित्सक 

हेल्मेट? कशाला? वैताग नस्ता?

- असं अनेक तरुण मुलांना वाटतंच वाटतं. काहीजण तर रस्त्यावर हवालदार पकडेल आणि पावती फाडेल, उगीच डोक्याला ताप नको म्हणून हेल्मेट विकत घेतात. गाडीच्या कॅरिअरला मागे लावूनही ठेवतात. दिसलाच पोलीस तर तेवढय़ापुरतं ठेवतात डोक्यावर आणि सटकतात.
तुम्ही पोलिसांना गुंगारा देऊ शकता, अपघाताला आणि त्या अपघातातून होणार्‍या मेंदूच्या दुखापतीला असं फसवून निसटता नाही येत ! आमचा अनेक वर्षांचा अभ्यास असं सांगतो की, दुचाकीवरून जाणार्‍या दोन तरुणांचा एकसारखाच अपघात होतो. कुणी समोरच्याला धडक देतो, समोरचा यांना येऊन धडक देतो, कधी कधी गाडीवरचा कण्ट्रोल सुटतो आणि थेट डिव्हायडरवर जाऊन ते आदळतात.
मात्र ज्यानं हेल्मेट घातलेलं असतं त्याला तुलनेनं कमी दुखापत होते. डोकं वाचतं, मेंदूला गंभीर इजा होत नाही. आणि दुर्दैवानं ज्यानं हेल्मेट घातलेलं नसतं, त्याला मात्र ब्रेन हॅमरेज होतं, कुणी जागीच दगावतं, काहींना पॅरालिसिस होतं, मेंदूला मोठी इजा होते, डोळा जातो, एक ना अनेक गोष्टी.
एका हेल्मेटमुळे आपण हे टाळू शकतो. मुळात आपण हेल्मेट हे आपलं डोकं वाचवण्यासाठीच वापरायचं असतं. आणि सर सलामत तो सबकुछ हो सकता है ! मात्र डोक्यातले गैरसमज आणि कशाला झंझट ही मनोवृत्ती अनेकांना हेल्मेट वापरू देत नाही आणि दरवर्षी रस्ता अपघातात जखमी झालेल्या, मेंदूला प्रचंड दुखापत झालेल्या अनेक रुग्णांवर  उपचार करण्याची आमच्यावर वेळ येते. 
हेल्मेटविषयी असलेले गैरसमज वेळीच दूर केले, तर आपण स्वत:चा आणि इतरांचाही जीव वाचवू शकू. मुख्य म्हणजे आपलं ‘डोकं वाचवू’ शकू.
आणि ते वाचवायचे तर आपल्या डोक्यात हेल्मेटविषयी असलेले काही गैरसमज आधी घासूनपुसून टाकावे लागतील.
मी तर काय ‘स्लो’ आणि ‘सेफ’च चालवतो, घर ते कॉलेज, मला कशाला हवंय हेल्मेट?
आपण काही रॅश ड्रायव्हर नाही, आपण काही बायकर नाही, हायवेलासुद्धा जात नाही. सेफ आणि स्लोच चालवतो असा अनेक जणांचा दावा असतो. पण तुम्ही वाहनावर बसता आणि त्याला वेग देता याचा अर्थ तुम्ही स्वत:ची काळजी घ्यायलाच हवी. ताशी १७ किलोमीटर वेगानं जरी तुम्ही गाडी चालवली तरी अपघाताची आणि मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. ताशी १७ किलोमीटर याचा अर्थ बाईक आणि नॉन गिअर दुचाक्याच काय सायकल चालवणार्‍यानंसुद्धा हेल्मेट वापरलं पाहिजे. आणि ते तुम्ही नाकारता याचा अर्थ तुम्ही स्वत:च स्वत:ला संकटात टाकण्याचा धोका पत्करता !
हेल्मेटचा स्ट्रॅप गळ्यात बांधला की रुततो, गुदगुल्या होतात, कसंसंच होतं.?
अपघातानंतर अनेक मुलांना विचारलं की, हेल्मेट का नव्हता वापरत, तर अनेकजण हेच कारण पुढे करतात. गळ्यात काहीतरी बांधल्यासारखं होतं.  गुदगुल्या होतात. कसंतरी होतं, अनइझीच वाटतं. फनीच दिसतं. त्यावर एक साधा प्रश्न एवढाच की, तुमचं डोकं फुटलं तर परवडेल की हेल्मेटची सवय  होईपर्यंत गळ्याशी गुदगुल्या झाल्या तर चालतील? 
 
गाडी चालवताना व्हीजन ब्लॉक होते, ऐकूच येत नाहीत हॉर्न.
अनेक तरुण मुलांचं हे हमखास कारण. त्यांना वाटतं की, नजर तिरकी केली की एरवी साईडचं दिसतं; मात्र हेल्मेट घातलं की पूर्ण मान वळवून डावी-उजवीकडे पाहावं लागतं. त्यामुळे त्रास होतो, व्हीजन ब्लॉक होते. या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. हेल्मेटमुळे पाच टक्के व्हिजन ब्लॉक होतेही; मात्र गाडी चालवताना जी १0 ते १२ ओक्लॉक व्हीजन महत्त्वाची असते ती महत्त्वाची दृष्टी ब्लॉक होत नाही. हेल्मेट वापरण्याचा आणि व्हिजन ब्लॉक होण्याचा काहीच संबंध नाही. मुळात तुम्ही चष्मा लावून गाडी चालवता, फॅशन म्हणून गॉगल लावून गाडी चालवता तेव्हा जितकी व्हिजन ब्लॉक होते, त्या तुलनेत हेल्मेट घातल्यानं तर फारच कमी दृष्टी अडते. जे दिसण्याचं तेच ऐकण्याचं. अनेकजण म्हणतात की, आम्ही हेल्मेट घातलं की, आम्हाला गाड्यांचे हॉर्नच ऐकू येत नाहीत. तुमचं हेल्मेट चांगल्या क्वालिटीचं असेल तर ऐकू येत नाही किंवा कमी येतं, हे प्रश्नच उपस्थित होणार नाहीत. तुम्ही रस्त्यावर शंभर-दोनशे रुपयांत हेल्मेटसारखं काहीतरी घेतलं, तर कदाचित हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
 
हेल्मेट घातलं की केस गळतात, डोक्याला टक्कल पडतं?
हा पुन्हा एक अत्यंत चुकीचा, सांगोवांगी पसरलेला अपसमज. हेल्मेट घालण्याचा आणि केस गळण्याचा काय संबंध? काही टक्कल पडत नाही. तुमच्या हेल्मेटची क्वालिटी चांगली असेल, त्यातले व्हेण्टिलेटिंग पोर्ट्स उत्तम असतील, फार घाम येत नसेल, डोक्याला पुरेशी हवा लागत असेल तर केस गळणारच नाहीत. त्यामुळे मुलं टक्कल पडण्याचं आणि मुली केस गळण्याचं जे कारण सांगतात, तो निव्वळ एक गैरसमज आहे. त्यामुळे हे गैरसमज बाजूला ठेवा आणि तुमचं डोकं वाचवण्यासाठी एक उत्तम हेल्मेट विकत घ्याच !
 
 
हेल्मेट निवडताना काय काळजी घ्याल?
सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आयएसआय मार्क असलेलं हेल्मेट घ्यायचं. वैद्यकीय गरज, वाहतुकीचे नियम, वेग या सार्‍याचा विचार करून सरकारने ज्या प्रकारच्या हेल्मेटला मंजुरी दिलेली आहे, असे हेल्मेट म्हणजे आयएसआय मार्कवाले. मात्र असे मार्कही नकली असूच शकतात. त्यामुळे जेव्हा केव्हा हेल्मेट घ्याल तेव्हा तेव्हा विकत घेतल्याची पक्की पावती घ्यायची. म्हणजे त्यासोबत एक वर्षाची वॉरण्टी-गॅरण्टीही मिळते.
हेल्मेट जितकं लाईटवेट तितकी त्याची किंमत जास्त. चांगले पोर्ट, उत्तम फॅब्रिक, मेटलची जाळी, सुरक्षितता आणि कम्फर्ट या सार्‍याचा विचार जितका जास्त तितकं हेल्मेट महाग. त्यामुळे घ्यायचं म्हणून घ्यायचं, नगाला नग म्हणून रस्त्यावर शेदोनशे रुपयांत मिळणारे जड हेल्मेट घेऊ नका. त्याचा काहीच उपयोग होत नाही.
काहीजण हेल्मेट म्हणून फक्त डोकं झाकतात. पूर्ण चेहरा झाकला जात नाही. डोळ्याखालचा भाग उघडाच राहतो. असं हेल्मेटही धोकादायक. मानेचा पहिला मणका जिथं असतो तिथवरचा भाग हेल्मेटनं झाकला गेला पाहिजे. तो कवटीचाही सगळ्यात खालचा भाग असतो, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे. तेच डोळ्यांच्या खालच्या हाडांचं आणि खोबणीचं. अनेकांची खोबणी अपघातात फ्रॅर होते, डोळ्याला इजा होऊ शकते. त्यामुळे सुरक्षितता घ्यायची तर पूर्ण डोकं, चेहरा झाकला जाईल असं हेल्मेट घ्या.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा हेल्मेट घेतलं की झालं, वर्षानुवर्षे तेच वापरायचं असं करू नका. तुम्ही कधी पडले, हेल्मेटला डेंट आला, चिरा गेल्या तर ते हेल्मेट वापरणं तातडीनं बंद करा. त्या एका डेण्टसाठी हेल्मेटनं तुमचं डोकं वाचवलेलंच असतं हे लक्षात घ्या आणि हेल्मेट बदला. खराब झालेलं हेल्मेट अजिबात वापरू नका.
 
हेल्मेट विथ न्यू टेक्नॉलॉजी.
‘कनेक्टेड’ राहण्याच्या हट्टातून नवे वाद
हेल्मेट वापरणारे अनेकजण आपला मोबाइल ओठांजवळ ठेवून, गप्पा मारत गाडी चालवतात. मान वाकडी करून बोलणारे, कानात इअरफोन घालून फिरणारे तरी दिसतात. हेल्मेटधारी बोलताना दिसतही नाहीत. गाडी चालवताना फोनवर बोलू नये हा नियम तर अनेकजण धाब्यावर बसवतात.
पण हे झालं आपल्याकडचं चित्र. मलेशियासारख्या काही देशांत हेल्मेट कंपलसरीच करण्यात आलंय. हेल्मेट घेतल्याशिवाय लर्निंग लायसन्सही मिळत नाही असे कायदे काही देशांनी केले आहेत. 
पण हेल्मेट वापरताना त्यात आपली कनेक्टिव्हिटी तर जाऊ नयेच पण बायकिंगचा थरार वाढावा म्हणून हेल्मेटमधेच अनेक टेक्निकल बदल करत अनेक कंपन्या नवनवीन हेल्मेट आता बाजारात आणत आहेत.
अर्थात या फ्युचर वेअरेबल टेक्नॉलॉजीचं एकीकडे कौतुक होत असलं, तरी दुसरीकडे त्यावर टीकाही होत आहे. गाडी चालवताना मुळात कुठलंही डिस्ट्रॅशक्नन वाईटच. त्यामुळे नव्या टेक्नॉलॉजी अपघातात आणि चालवणार्‍यांच्या बेदरकारपणात भरच घालतील, असा काही अभ्यासकांचा आरोप आहे. 
मात्र तरीही हे फ्युचर बदल काय असतील, याची ही एक इंटरेस्टिंग झलक.
१) हेल्मेट विथ ब्लूटुथ ही तर अत्यंत कॉमन गोष्ट बनत चालली आहे. हेल्मेटमधेच ओठांजवळ, गालाला लागून ब्लूटूथ लावलेलं असतं. त्यातून गाडी चालवताना फोन आलाच तर तो घेता येतो, बोलता येतं. काही रचना तर अशा की, मोबाइलला कनेक्टेड ब्लूटूथ ऑटो रिस्पॉन्सही देऊन टाकतं, एसएमएस, ऑटो ई-मेलही पाठवल्या जातात.
२) काही हेल्मेटमधे काचेलाच असे कॅमरे लावलेले असतील की तुम्ही बाईक चालवताना तुम्हाला वाटलं की, हा फोटो काढायचा या क्षणी तर न थांबता, एक नजर वळवली, ओरल कमांड दिली की हेल्मेटमधला कॅमेराच फोटोग्राफी करेल. व्हिडीओ रेकॉर्डिंगही करेल. 
३) समजा, तुम्ही सुटीवर आहात, कुठं फिरायला गेलात, गाडी चालवताय, पण तुम्ही सेट केलेल्या नंबरवरून एखादा अर्जण्ट एसएमएस आला तर हेल्मेटच्या काचेवर तुम्हाला तो मेसेज (गाडी स्लो करून) वाचताही येईल, रिप्लायही पाठवता येईल.
४) रात्री गाडी चालवताना लाईट डोळ्यावर येण्याचा त्रास होतो, हेल्मेट असलं तरी होतोच होतो. अशा वेळी नाइट लाईट अँडजस्टेबल काचा असणारे हेल्मेटही काही दिवसांनी बाजारात येऊ शकतील.
 
हेल्मेट आणि फॅशनबिशन, स्टाईलचा विचार करता येईल का?
खरंतर डॉक्टरांच्या मते, डोक्याचा आकार कसाही असतो. आयएसआय मार्क असलेले, सरकार प्रमाणित हेल्मेट कुणीही वापरू शकतं. हेल्मेटच्या आतलं स्पंज अँडजेस्टेबल असतं, ते डोक्याप्रमाणं कमी जास्त होऊन उत्तम मापात बसतं. आणि मुळात हेल्मेट ही काही फॅशन अँक्सेसरी नाही, ती महत्त्वाची गोष्ट आहे. चष्मा घेताना जसं आपण काचांच्या दर्जाशी खेळत नाही, फक्त चष्म्याच्या काड्यांचा रंग, फ्रेम चेहर्‍याला साजेशी आहे की नाही ते बघतो तसा आणि तेवढाच हेल्मेटचा विचार फार तर करता येईल.
आणि म्हणूनच त्यासाठी या काही टीप्स.
१) ट्राय आऊट.
आपण ड्रेस घेताना हा नको तो म्हणत किती ड्रेस ट्राय करतो, तसेच अनेक हेल्मेट डोक्यात घालून पाहा. कुठलं कम्फर्टेबल वाटतं हे तर कळेलच; पण कुठलं डोक्यावर शोभून दिसतं हेदेखील चटकन कळेल. मग रंग, त्यावरची डिझाईन हे सारं सहज ट्राय करत पाहता येईल.
२) हेल्मेट घातलं की त्याचा पट्टा तुमच्या हनुवटीपर्यंत ओढून पहा. ते घट्ट होतंय का, हनुवटीच्या खाली जाताना तुमच्या चेहर्‍याचा आवश्यक तो भाग झाकला जातोय का हे कळेल. काहींची डोकी छोटी आणि मोठं हेल्मेट, अगदीच बेंगरुळ दिसतं हे खरंय.
३) हेल्मेट घातलं डोक्यात, गळ्याशी बांधताना त्यात अंगठा घालून पहा.नीट जातोय, तितपत जागा शिल्लक राहतेय ना, हवा खेळतेय, मानेवर भार येत नाही ना हे तपासून पाहा.
४) हेल्मेटमधले चीक पॅड्स तुमच्या गालाला चिकटले पाहिजेत, म्हणजे गालाला लागले तर पाहिजे, पण त्यांचा भार गालावर येता कामा नये, ते तपासा.
५)  कपाळ ते कानाचा तिरका  भाग, आयब्रो यांच्यात गॅप राहता कामा नये.
६) पैसे वाचवण्यासाठी जड हेल्मेट घेऊ नका. मानेवर किती भार द्यायचा, हे तपासून मग हेल्मेट घ्या.