शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

पळा पळा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 18:37 IST

एकदा का अशी पळायला सुरु वात केली की थांबावंसंच वाटत नाही! ही या बागेची जादू आहे की पळण्यातली?

- प्रसाद सांडभोरएकदा का अशी पळायला सुरुवात केली की थांबावंसंच वाटत नाही!ही या बागेची जादू आहे की पळण्यातली?गेटमधून आत आल्यावर वॉर्म अप म्हणून हळूहळू, एक एक पाय उचलून टाकत ब्रिस्क वॉक सुरू करायचं.या अशोकाच्या झाडापर्यंत पोहोचेपर्यंत वेग पकडायचा.डावा पाय मग उजवा पाय - पुन्हा डावा मग उजवा. पायांना सुसंगत अशी आपोआप होणारी हातांची हालचाल.या दोन सुरु च्या झाडांमधून पुढे गेलं की या चार पायºया. डावीकडे हिरवळ आणि फुलांची बाग. पायºयांचा उतार मिळून हात-पाय अशी मस्त लय पकडतात ना की बस्स! थांबायलाच नको!अजून जोरात! अजून जोरात! - मन म्हणतं.हृदयाची धडधड वाढत जाते.अगदी हाता-पायात-कानांत ऐकू येऊ लागते.स्पीड लिमिट क्र ॉस्ड! आता यापुढे वेग वाढवता येणार नाही.अशा वेळी वाटतं, ‘यार कुठेतरी बाटलीत वगैरे काढून ठेवूयात का या हृदयबुवांना आत्तापुरतं? मन भरून पळून झालं की पुन्हा आत टाकू!’ पण ते जमत नाही.ही बाग अगदीच घराजवळ असल्यानं कधी कोणती काळ-वेळ बघावी लागत नाही इथे यायला. रनिंग शॉर्ट्स आणि शूज घातले की झालं! कधी अगदीच रिकामं डोकं घेऊन येतो मी इथे सोबत पळवायला! इथले रंग-ऋतू पाहून आपोआप सुचत जातं काही ना काही. कधी खूप कामं एकाचवेळी करायचं टेन्शन असेल तर बागेतलं पळणं ‘टू डू लिस्ट’ बनवायला मदत करतं. कधी स्वत:चबद्दल, कधी काही स्वप्नांबद्दल खोल-सखोल विचार करायला लावतं. काही नको असलेले - भुणभुणणारे विचार पळता पळता सहज विरघळतात. घामावाटे झिरपून शरीरातून निघून जातात. अगदीच हलकं हलकं वाटतं मग. अजून जोरात पळता येतं. अजून जोरात!मन मग मेंदूला खुराक पुरवू लागतं. कशापासून दूर पळतोयस? कशाच्या दिशेने पळतोयस? की काही नेमकं ठरवलेलं असं नाहीयेस अजून?नुसतंच पळतोयस?नुसतेच प्रश्न.पुन्हा आलं अशोकाचं झाड.म्हणजे अजून एक राउंड पूर्ण.प्रत्येक राउंड म्हणजे एक आवर्तन.एक परिवर्तनआज किती बरं राउंड्स करावेत?