शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

धावती ट्रेन आणि दहा वर्षांचा मुलगा

By admin | Updated: June 28, 2016 12:52 IST

रविवार असला तरी मुंबईची लाईफ लाइन मात्र नेहमी प्रमाणे चालू होती. गाडीला गर्दी तशी कमीच होती.एरवी असणारा प्रवाशांचा गोंधळ, धक्काबुक्की याची सवयचं असल्यामुळे काही तरी कमी असल्याची उणीव मनाला भासत होती

रविवार असला तरी मुंबईची लाईफ लाइन मात्र नेहमी प्रमाणे चालू होती. गाडीला गर्दी तशी कमीच होती.एरवी असणारा प्रवाशांचा गोंधळ, धक्काबुक्की याची सवयचं असल्यामुळे काही तरी कमी असल्याची उणीव मनाला भासत होती. सुट्टीचा दिवस आणि त्यात डोक्यावर सूर्यदेव अतिप्रसन्न झाल्यामुळे कोणी घराबाहेर पडण्याचा विचार करत नसावं..असे विचार डोक्यात चालू असतानाच एक कोवळ्या वयाचा मुलगा डब्यात चढला. एका हातात एक कापडाचा तुकडा आणि एकात प्लास्टिक ची मोठी पिशवी.साधारणत: १० वर्षाचा असेल. इतक्या तप्त वातावरणातही त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं. थोडं थांबल्यावर त्याने त्याच्या दररोजच्या कामाला सुरवात केली. हातातल्या फडक्याने त्याने डब्यातला कचरा गोळा करायला सुरवात केली.आपण आपलं घरचं स्वच्छ करत आहोत अशा अविर्भावात तो ते करत होता.डब्याच्या एका बाजूला काही श्रीमंत मुलं बसली होती. हातात असलेल्या वेफर्स च्या पॅकेटमधून हात भरून वेफर्स काढून ते तोंडात भरत होते. खाताना अर्धे वेफर्स खाली सांडत होते. खाऊन झाल्यावर ते वेफर्सचं पॅकेट आणि कोल्ड ड्रिंकची बाटली त्यांनी सीटच्या खाली काही विचार न करता हळूच सरकवली. आणि मग तिथून उठून दरवाज्यात उभे राहिले.त्या मुलाचं काम मात्र चालूच होतं.त्या सीटच्या इथे पोचल्यावर त्याने ती कोल्ड ड्रिंकची बाटली आणि वेफर्सचं पॅकेट सुद्धा आपल्या पिशवीत टाकलं. सगळा डबा स्वच्छ करून झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं.काम संपल्यावर तो एका दरवाज्याच्या कोपऱ्यावर जाऊन बसला.हळूच त्याने ते वेफर्सचं पॅकेट बाहेर काढलं आणि त्यात काही तरी शिल्लक असेल या आशेने त्याने त्या पॅकेट मध्ये हात घालून चाचपून बघितलं. हाताला लागलेले काही वेफर्स आणि त्या कोल्डड्रिंक च्या बाटलीतले उरलेले कोल्ड ड्रिंकचे शेवटचे थेंब पिऊन त्याने आपली तहान भागवली. भर उन्हात येत असलेल्या वाऱ्याच्या थंडगार झुळुकेने त्याच्या पापण्या आपोआप मिटत होत्या. पण तरीही त्यातून तो स्वत:ला सावरत होता.पुढच्या स्टेशन वर तो उतरला.पण त्या दहा वर्षाच्या कोवळ्या मुलाने माङया मनात विचारांचं काहूर माजवलं.काय गरज होती त्याला त्या ट्रेन मधला कचरा साफ करायची. बरं, त्या बदल्यात त्याला कोणी पगारही देणार नव्हतं पण तरीही सरकार ने पगार देऊन ठेवलेले सफाई कर्मचातीसुद्धा इतकी मन लावून सफाई करणार नाही तितकी तो मुलगा करत होता. आपण इतके शिकून सुद्धा कचरा इकडेतिकडे टाकतो आणि त्या काहीही न शिकलेल्या इतक्या लहान वयाच्या मुलाने केलेल्या त्या गोष्टीचं मला अप्रूप वाटलं.आपल्याला कधी कोणाकडून काय शिकायला मिळेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अगदी काहीही न बोलता सुद्धा काही जण आपल्या कृतीतून खूप काही शिकवून जातात. आता त्या मधून काही शिकायचं कि दुर्लक्ष करायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं.- प्रतीक प्रवीण म्हात्रे