शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

धावणारी स्वप्नं : आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 11:56 IST

लहानपणी धावताना ती पडली, त्यावेळी फक्त खरचटलं होतं. नंतर अ‍ॅसिडनं अंग जळालं. अपेंडिक्सचं आॅपरेशन झालं. पायाला फ्रॅक्चर झालं. बसचा पत्रा अडकून पाय फाटला, १८ टाके पडले. तिनं हार मानली नाही.

ज्या परिस्थितीचा, ज्या अडचणींचा आणि ज्या अपघातांचा सामना करीत आरती पाटील इथवर पोहोचली आहे, त्यानं अचंबित व्हावं, त्याचं दु:ख करावं की तिच्या जिद्दीला सलाम करावा असा प्रश्न आपल्याला पडतो. आरती सध्या भोसला महाविद्यालयात एसवाय बीएला शिकतेय; पण मूळची कडगाव या छोट्याशा गावची. कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंगलज तालुक्यातली. वीस वर्षांची अतिशय जिद्दी तरुणी.वडील ड्रायव्हर. जवळपास अशिक्षित. त्यात डायबेटिस. गावी अगोदर एकत्र शेती होती. एकत्र सारा कारभार चालायचा. त्यात खर्चाचा मोठा वाटा आरतीच्या वडिलांचा होता; पण कौटुंबिक भांडणातून त्यांना घराबाहेर पडावं लागलं.

चुलतभावाची धावण्याची आवड आरतीमध्येही निर्माण झाली. दहावीपर्यंत अनवणी पायांनीच धावायची. पहिली ते तिसरी ती कोल्हापूरला आपल्या आत्याकडे शिकली. पण नंतर आईला किडनी स्टोनचा त्रास झाल्यानं चौथीला परत गावी आली; पण चुलतभाऊ गडहिंगलजला शिकत असल्यानं पाचवीत मग तिनंही त्याच शाळेत अ‍ॅडमिशन घेतली. घरापासून शाळा साधारण सहा किलोमीटर. शाळेचे शिक्षकच तिला शाळेत सोडायचे आणि घेऊनही यायचे. नंतर ती बसनं शाळेत जायला लागली. पण बस वेळेवर मिळत नसल्यानं बºयाचदा प्रॅक्टिस बुडायची. आरतीचा चुलतभाऊ सायकलवर शाळेत जायचा. मग तिही त्याच्याबरोबर सायकलनं शाळेत जायला लागली. काही अंतर त्याच्या मागे डबल सिट बसून, काही अंतर पळत पळत! दोन वर्षं असे काढले.सातवीत असताना आरतीला तीन किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये सिल्व्हर मेडल मिळालं! हे तिचं पहिलं मेडल!त्यानंतर दहाच दिवसांची गोष्ट. आरती बसमधून प्रवास करत होती. गाडी गच्च भरलेली. अचानक तिची कातडी भाजायला लागली, अंगाची आग आग व्हायला लागली! एक म्हातारा बसमधून अ‍ॅसिड घेऊन जात होता. झाडं मरावीत म्हणून त्यांच्या मुळाशी टाकायला! बसच्या गर्दीत बाटली हेलपांडली आणि सारं अ‍ॅसिड आरतीच्या अंगावर!

पण यावेळीही त्या दुखण्यापेक्षा आणि जखमांपेक्षाही खर्चाचीच जास्त भीती! एका साध्याच दवाखान्यात उपचार केला. जवळपास दहा हजार रुपये खर्च आला. वडिलांनी कसेबसे हे पैसे उभे केले. रोज ड्रेसिंग करावं लागायचं. दीड-दोन महिन्यानंतर जरा बरं वाटायला लागलं.वडिलांनी पुन्हा उधारउसनवार केली आणि आरतीला नवी सायकल घेऊन दिली! आरती मग रोज आपल्या दादाबरोबर सायकलनं शाळेत जायला लागली.तिचा ट्रॅक पुन्हा रुळावर आला. आठवीत असताना स्कूल नॅशनलमध्ये तिनं दोन सिल्व्हर मेडल्स पटकावली.एकदा पुण्यात स्पर्धेसाठी आलेली असताना नाशिकचे ‘साई’चे कोच विजेंद्रसिंग यांनी तिला पाहिलं. विचारलं, ‘येतेस नाशिकला?’ तिला जायचं होतं; पण तिच्या कोचनं जाऊ दिलं नाही. तिच्या घरच्यांनाही सांगितलं, मुलीचं नुकसान होईल, बाहेरगावचं माहीत नाही, तिथे स्टिरॉइड्सही घेतली जातात, परफॉर्मन्स दिला नाही तर मधूनच घरी पाठवून देतील..’त्यानंतरही जेव्हा जेव्हा स्पर्धेच्या ठिकाणी भेट झाली, तेव्हा बºयाचदा विजेंद्रसिंग यांनी तिला नाशिकला येण्याविषयी सुचवलं. पण, तिला प्रशिक्षणासाठी नाशिकला येता आलं नाही.‘कुठलीही स्पर्धा असो, त्या स्पर्धेसाठी पूर्वीच्या कोचला स्वत:च्या खर्चानं घेऊन जाणं, त्यांना बक्षिसातली अर्धी रक्कम देणं, स्वखर्चानं त्यांना स्पर्धेला नेलं नाही, तर त्यावरून भांडण काढणं.. यामुळे मला किती मनस्ताप झाला, मला कसं एकटं पाडलं गेलं, त्यामुळे माझं धावणंच कसं बंद झालं, परफॉर्मन्स शून्यावर आला’, हे सांगताना आरतीच्या डोळ्यांत पाणी उभं राहतं.शेवटी आरतीनं विजेंद्रसिंग सरांना फोन केला, ‘काहीही झालं तरी मला नाशिकला यायचंच..’७ जानेवारी २०१५ ला चिपळूण येथे अ‍ॅथलेटिक्सचा कॅम्प होता. आरती त्या कॅम्पला आली होती. सिंग सरही तिथे होते. आरती पाठदुखीनं हैराण झालेली, पायाची इंज्युरी त्रास देत होती. साधं चालताही येत नव्हतं. त्यानंतर लगेचच रांचीला स्कूल नॅशनल्स होत्या. अर्थातच आरतीला तिथे काहीच परफॉर्म करता आलं नाही; पण तिथूनच सिंग सरांबरोबर ती थेट नाशिकलाच आली!पण इथे आल्यावर दोनच दिवसांत तिच्या पोटात खूप दुखायला लागलं. मैदानावर नुकतीच ओळख झालेल्या दुर्गा देवरेच्या घरी मग ती राहिली. औषधोपचार घेतले आणि गावी परत आली. पुन्हा पोट दुखायला लागलं. सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी सांगितलं, अपेंडिक्सचं आॅपरेशन करावं लागेल. पुन्हा खर्चाचा प्रश्न. कमी पैशात होईल म्हणून एप्रिल २०१५ मध्ये चिपळूणला तिनं हे आॅपरेशन केलं.तीन महिने वाया गेले. लोकं म्हणायला लागले, ‘आता कसलं रनिंग आणि कसलं काय. घरीच बसावं लागेल कायमचं!’, आरतीही खचली; पण सिंग सरांनी तिला धीर दिला.. ‘वर्षभराच्या आत तू पुन्हा मेडल घेतेस की नाही पाहा!’तसंच झालं. सहाच महिन्यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या तीन हजार मीटर ज्युनिअर नॅशनलमध्ये आरतीनं सिल्व्हर मेडल पटकावलं आणि आतापर्यंतचा तिचा बेस्ट टायमिंगही दिला!थोड्याच दिवसांत फेबु्रवारी २०१६ मध्ये एशियन क्रॉस कंट्री स्पर्धा होती. त्यासाठी आरतीचं सिलेक्शन झालं. पण स्पर्धेेच्या आठ दिवस आधीही तिचा पासपोर्ट तयार झाला नव्हता. खूपच धावपळ केल्यावर ऐनवेळी व्हिसा हातात आला आणि आरती स्पर्धेसाठी बहारीनला रवाना झाली. आरतीची ही पहिलीच आंतरराष्टÑीय स्पर्धा. या स्पर्धेत ती अकरावी आली; पण भारतातल्या सर्व अ‍ॅथलिट्समध्ये टॉप ठरली!पण अडचणी अजून थांबल्या नव्हत्या. बहारीनहून परतल्यावर सराव करताना पायाला फ्रॅक्चर झालं. पुन्हा घरी! महिनाभर संपूर्ण रेस्ट. बरं वाटायला लागल्यावर परत नाशिकला येण्यासाठी निघाली. जोरदार पाऊस सुरू होता. बसमध्ये चढताना बसचा बाहेर आलेला पत्रा पायात घुसला, पायच फाटला! रक्तबंबाळ! वडिलांनी उचलूनच तिला दवाखान्यात नेलं. पायाच्या बोटांची नस तुटून आतमध्ये फ्रॅक्चर झालं होतं! तिथल्या डॉक्टरांनी फक्त ड्रेसिंग करून सोडून दिलं. दुखणं खूप वाढल्यानंतर तीन दिवसांनी आरतीला गडहिंगलजच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, ‘आत्ताच्या आत्ता आॅपरेशन करावं लागेल!’ पायावर १८ टाके पडले!आरती सांगते, ‘आजवर सगळी आव्हानं, सगळ्या अडचणींना मी धीरानं सामोरी गेले; पण हा आघात भयंकर होता. लहानपणापासून जे स्वप्न उराशी घेऊन मी धावत होते, तेच जणू संपलं होतं. आपल्याला आयुष्यात आता कधीच पळता येणार नाही या विचारानं मी रडरड रडले. माझ्यासाठी सारं काही संपलं होतं. पूर्ण निराश झाले होते, खचले होते..’आॅपरेशनसाठी चाळीस हजारांचा खर्च. डॉक्टरांना विनंती करून काही सूट मिळवली, वडिलांनी पुन्हा उधारउसनवार करून बाकीची रक्कम जमा केली.आरतीला पहिले तीन महिने तर बेडवरून खालीही उतरता आलं नाही. २०१६ हे जवळपास अख्खं वर्ष वाया गेलं. काहीच करता आलं नाही. विजेंद्रसिंग, नाशिकचे सहकारी खेळाडू, घरचे.. यांच्या प्रोत्साहनानं आरती पुन्हा नाशिकला आली. परत शून्यापासून सुरुवात. हळूहळू प्रॅक्टिस सुरू केली.मे २०१७ मध्ये झालेल्या सिनिअर नॅशनल्समध्ये चौथा, नंतर जूनमध्ये सिनिअर इंटर स्टेट नॅशनल स्पर्धेत सहावा क्रमांक! दोन्ही स्पर्धांत तिनं आपलं आतापर्यंतचं बेस्ट टायमिंग दिलं. वर्षअखेरीस दोन महत्त्वाच्या स्पर्धा झाल्या. दहा हजार मीटर ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड नॅशनल स्पर्धेत सिल्व्हर आणि ठाणे मॅरेथॉनमध्ये तर चक्क गोल्ड!आरती उत्साहानं सांगते, ‘माझा तो पूर्वीचा आत्मविश्वास आता मला परत मिळाला आहे, मी पुन्हा मैदानावर परतले आहे; पण त्यासाठी प्रत्येकवेळी जणू मला राखेतून उभं राहावं लागलं!’आज, आत्ता या क्षणी आरती पतियाळाच्या मैदानावर उभी आहे. पुढच्या महिन्यात होणाºया कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सिलेक्शनसाठी!..माझ्या डोळ्यांसमोर अजूनही दिसताहेत अ‍ॅसिडनं भाजलेल्या तिच्या हातावरच्या खुणा आणि पायाला पडलेल्या अठरा टाक्यांचे व्रण...

विशेषांक लेखन - समीर मराठे

(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)