वाटतं जावं पळून, अशी तुमची चिडचिड झाली आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:40 PM2020-07-02T15:40:20+5:302020-07-02T15:42:52+5:30

कंटाळा आला जगण्याचा, असं वाटतं नको हे सगळं. जावं कुठं तरी पळून. हे घरात बसणं नको, ही कटकट नको, हे घरकाम नको, हे बोअर आयुष्य नको

run away feeling, try to get out of it.. now! | वाटतं जावं पळून, अशी तुमची चिडचिड झाली आहे का?

वाटतं जावं पळून, अशी तुमची चिडचिड झाली आहे का?

Next
ठळक मुद्देजायचं का पळून?

- अनन्या भारद्वाज

कंटाळा आला जगण्याचा, असं वाटतं नको हे सगळं. जावं कुठं तरी पळून. हे घरात बसणं नको, ही कटकट नको, हे घरकाम नको, हे बोअर आयुष्य नको. वाटतं जावं पळून.
- असं आताशा येतं ना तुमच्या मनात. वाटतं नको ही रूटीनची कटकट. त्यात हा कोरोना. त्याचा कहर. घरात तंगीबिंगी, घरकाम करा, घरातच बसा, काहीतरी नवीन शिक, हातात वेळ आहे तर हा घरच्यांचा डोस.
नोकरी लागेल का, परीक्षा होईल का, कुणी जॉब देईल का,  आहे ती रिलेशनशिप तरी टिकेल का?
असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतीलच.
आणि वाटत असेल जावं पळून?
पण सांगा, कुठं पळणार? कुठं जाणार पळून? हा कोरोना तर सगळीकडे आहे, जगभरात आहे. कुठं जाताही येणार नाही, अगदी जिल्हाही सोडता येणार नाही, अशी जिल्हाबंदी आहे.
मग पळून जायचं कुठं? आणि कसं?
बरं घरात असं काही म्हणावं तर घरचे म्हणणार जा, बाहेर कुणी विचारतंय का बघ, काय धमक्या देतो पळायच्या, पळायला आहेच कुठं तुला जागा?
म्हणजे थोडक्यात काय तर पळायलाही जागा नाही.
पण म्हणून आपण या भावनेचाच विचार करायला हवा की पळून जायचं म्हणजे नेमकं कुठं जायचं? कसं जायचं? कुणापासून पळायचं?
असहायता, नैराश्य, कधी समस्या, कधी माणसं, कधी मोठंच काहीतरी कमावण्याचं स्वपA, कधी अगदीच नको होणं परिस्थिती यापायी अनेकांना पळून जावंसं वाटतं. सध्याचं आयुष्य, माणसं, परिस्थिती यासा:याचा तिटकारा आला आहे असं वाटतं.
कुणाचं तोंड पाहू नये असंही वाटतं. कितीही जीव रमवला ऑनलाइन, कितीही घातलं तोंडाला कुलूप तरी वाटतं नको हे सारं. पार तिडीकच जाते डोक्यात.
पण मग उपाय शोधायलाही सुरुवात होते.


आता तर पळणंही शक्य नाही मग आपण नेटवर शोधाशोध करतो. हाऊटू हेल्प युअरसेल्फ, हाऊ टू हिल युअरसेल्फ, पॉङिाटिव्ह थिंकिंग, रिलॅक्स कसं व्हावं यासाठीच्या टिप्स काय असतात? पुस्तकं वाचा, ऑनलाइन गेम्स खेळा, असंही काहीजण करून पाहतात.
पण तरी बोअरडम काही कमी होत नाही.
वाटतं, आता आहे ते मागे सोडून आपण निघून गेलो, या गुंत्यात नाहीच अडकलं तर कदाचित आपलं जगणं बदलेल.
आता नाही जरा परिस्थिती सुधारली की पळू.
मग आपण आपल्या सोयीच्या सोयीसोयीने यशस्वी झालेल्यांच्या गोष्टी वाचतो. सिनेमे पाहतो. त्यांचा संघर्ष पाहतो, वाटतं हे एवढं तर मलाही जमेल.
त्यात आपण हे विसरतो की आज कुणी घरातून पळाला, म्हणजे लगेच उद्या त्याला यश मिळालं असं होत नाही. सगळेच बसलेले फटके कुणी सांगत नाही.
आपली मानसिक स्थिती जर लो असेल, आधीच गाडी खडकत असेल, रडतखडत चालत असेल तर आपण डायरेक्ट पळून जाऊन सुसाट कसं धावायला लागणार?
म्हणजे घरात आपण चार पाऊलं चालत नाही आणि बाहेर जाऊन आपण लगेच मॅराथॉन जिंकणार असं कसं होईल?
पण आपण असे प्रश्न स्वत:ला विचारत नाही.
उत्तम तब्येत, नीट प्लॅनिंग, उत्तम परिस्थितील आर्थिक थोडं का होईना पाठबळ किंवा आपण जमवलेले पैसे
आणि नेमकं आपण काय करणार हे ठरलेलं असताना काहीतरी वेगळं करून पाहणं वेगळं.
पण डोक्यात वारं आलं म्हणून पळत सुटणं म्हणजे आपटी खाणंच आहे.
पण मग यावर उपाय काय? परिस्थिती बदलायचा प्रयत्न करायचाच नाही का?
असंच कुजत जगायचं का?
तर अजिबात नाही.
त्यावर उपाय म्हणजे, आपल्याला न आवडणारी घरातली माणसं असली, तरी ती मायेची असतात.
त्यांना आपल्याविषयी थोडं तरी प्रेम असतं, बाहेर आपण अनोळखी लोकांनी जुळवून घ्यायला तयार आहोत तर मग आपल्याच घरातल्या माणसांशी मायेनं बोलायला, कधी जरा पडतं घेत त्यांचं म्हणणं ऐकून तरी घ्यायला काय हरकत आहे?
कधी कधी नात्यात साचलेपण येतं. एकमेकांना गृहीत धरायला लागतो आपण.
त्यापेक्षा अगदी लहान बहीण भाऊ, मोठे बहीण भाऊ, नात्यातले कुणी, आईबाबा यासा:यांशी बोलायला लागा. डायरेक्ट मनातलं नाही तर इकडचं तिकडचं, जरा गप्पा मारा.
सहजच फोन करा. जमलं तर आपलं मन मोकळं करा.  त्यांनी काही सांगितलं तर ऐकून पहा. ते करूनही पहा. 
पळून जाण्यापेक्षा आपल्या निगेटिव्ह विचारांपासून पळा. लांब व्हा.
आहे त्या परिस्थितीत टिच्चून उभा राहीन असं म्हणा, आणि कामाला तर लागा.
घरात साफसफाई करणं, भांडीच घासणं, घरात जाळी काढणं, कपडे धुणं अगदी कोणतंही काम करा. त्यानं जरा मन तर हलकंच होईल, घरही आपलं वाटेल.
त्या घरात रुजायचा प्रयत्न करा.
आणि पळू नका, स्वत:पासून पळणं कधीच जमणार नाही..
त्यापेक्षा या घरबंद काळात जरा जगून तर बघा, वेगळ्या रीतीने.

 

Web Title: run away feeling, try to get out of it.. now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.