कलीम अजीम
रशियात मतदानावेळी संगीत व वाद्य वाजवण्याची परंपरा आहे, असं म्हणतात. पण गेल्या आठवडय़ात कुठलाही गाजावाजा न करता एक मोठं मतदान पार पडलं. अतिशय गुप्त पण तेवढय़ाच जाहीरपणो झालेल्या या मतदानात रशियन जनतेने घटनादुरु स्तीला मान्यता दिली. नव्या जनमत चाचणीतून विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा कार्यकाळ शून्य होणार आहे. म्हणजे काय होणार? त्याचे थोडक्यात उत्तर असे की 67 वर्षीय व्लादिमीर पुतीन हे 2024 नंतर पुन्हा नव्याने फ्रेश उमेदवार म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत उभे राहू शकतील. रिपोर्ट सांगतात की, त्याआधी त्यांनी सत्तेची उपभोगलेली 4 टर्म शून्य होतील व ते पुन्हा 6+6 अशी दोन टर्मसाठी पात्न ठरतील.1993 साली झालेल्या घटनादुरुस्तीत एक उमेदवार पंतप्रधान व राष्ट्रपतिपद केवळ दोन वेळा उपभोगू शकत होता. तसेच पदाचा कार्यकाळ 4 वर्षाचा होता. 2क्क्8 नंतर झालेल्या घटनादुरुस्तीने तो 6 वर्षाचा झाला. काय बदलेल?* राष्ट्रपतीचे अधिकार कमी होतील. तसेच पुतीन यांच्यासारखे अधिक काळ कोणीही सत्तेवर राहू शकणार नाही. * आता राष्ट्रपती डय़ूमा म्हणजे संसदेला बरखास्त करू शकणार नाही. * पूर्वी राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करीत. आता संसद पंतप्रधान निवडून देईन व तो आपली कॅबिनेट बनवेल.* राष्ट्रपती या उमेदवाराला रिजेक्ट करू शकणार नाही. त्याला संसदेचे अधिकार मान्य करावे लागतील.* स्टेट कौन्सिलचे अधिकार वाढून त्याला सरकारी एजन्सीच्या रूपाने मान्यता मिळले. आतार्पयत स्टेट कौन्सिल एक सल्लागार म्हणून काम करत असे. रिपोर्ट म्हणतात की, स्टेट कौन्सिल एक न्यायाधीश म्हणून काम करू शकेल.* जर कुठला वाद झाला तर स्टेट कौन्सिलचा निर्णय अखेरचा असेल. चर्चा अशीही आहे की पुतीन नवे स्टेट कौन्सिल प्रमुख होऊ शकतात. म्हणजे सर्व कंट्रोल पुन्हा पुतीन यांच्या हाती येतील. पुतीन यांनी याआधी पार्लमेंटमध्ये घटनादुरु स्तीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. आता त्यांनी त्यावर जनमताची मोहोर लावली आहे. थोडक्यात काय तर पुतीन हे रशियाचे जोसेफ स्टालिनपेक्षा अधिक काळ सत्तेत राहणारे राष्ट्रप्रमुख ठरू शकतील. म्हणजे पुतीन हुकूमशाह म्हणून पुढची 12 वर्षे तरी सत्तेची अधिकार सूत्ने आपल्याकडे ठेवतील.विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रशियात जोरदार राजकीय हालचाली पहायला मिळाल्यात. ज्यात पंतप्रधान दिमित्नी मेदवेदेव यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. चर्चा आहे की, पुतीन आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतील. ज्याचा उद्देश आगामी काळात सत्तासंकट उभे राहू नये हा असावा.जगभरातील प्रसारमाध्यमे जनमताला ‘पुतनिशाही’ म्हणत आहेत. या निमित्ताने पुतीन यांचे व्यक्तिमत्त्व व हिरोगिरीच्या चर्चा माध्यमात पुन्हा रंगल्या आहेत. सोव्हिएट रशियात गुप्तेहर म्हणून काम करणा:या पुतीन यांची कथा एका मसाला बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नाही. 1999 मध्ये पंतप्रधान म्हणून सूत्नं स्वीकारताना कोणाला कल्पनाही आली नसेल की काहीच काळात हा माणूस जगभरात चर्चेचा विषय ठरेल. बेरोजगारी व आर्थिक अस्थिरतेच्या पाश्र्वभूमीवर 1993 साली सोव्हिएट रशियाचे तुकडे होऊन जगातील सर्वात मोठी साम्यवादी सत्ता विखुरली. त्यातून लहानसहान असे 25 देश जन्माला आले. पुढची चार-पाच वर्षे कम्युनिस्ट कुठे चुकले, या चर्चेतच गेली. अशात 1999 साली पुतीन पंतप्रधान झाले. संधी पाहून त्यांनी प्रक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न चालवला. एखादी गुप्त डील केल्यासारखी त्यांनी सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्यांनी मागच्या सरकारला दोष न देता हातोहात बदल स्वीकारले. त्यांनी देशात ब:याच आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. थोडय़ाच कालावधीत ते अतिश्रीमंत व मध्यमवर्गाचे लोकप्रिय नेते म्हणून पुढे येऊ लागले. हळूहळू त्यांनी आपले कौशल्य दाखवत इतर पाश्चात्य देशांवरही प्रभाव पाडायला सुरुवात केली. वेगवेगळ्या बदलांवर स्वार होऊन त्यांनी आपल्या निरंकुश सत्तेची प्रस्थापना केली. सत्तेत हस्तक्षेप करण्यापासून देशातील गर्भश्रीमंत वर्गाला त्यांनी रोखले. ज्याचा एकहाती सत्ता चालवण्यासाठी त्यांना बराचसा फायदा झाला.
(कलीम मुक्त पत्रकार आहे.)