शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एका पायावरही चंद्रखणी पासच्या टोकावर पोहचता येतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:16 IST

हिमालयात ट्रेकला जायचं स्वप्न होतं. पण? एका हातानं आणि पायानं अधू असताना हे कसं साधायचं हा प्रश्न माझी वाट अडवत होता. शेवटी तो प्रश्नच बाजूला सारला आणि निघालो..

ठळक मुद्देअपंग असल्यानं  हा खडतर ट्रेक जमेल का असं मनात यायचंही. अनेकांच्या डोळ्यातही तो प्रश्न दिसला. परंतु केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी पोहचलो.

- दत्तात्रय खेडेकर

हिमालय. या शब्दातच एक ओढ आहे. बर्‍याच वर्षापासून हिमालयात जाण्याची इच्छा माझीही होती. यावेळी युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे  (वायएचएआय) ही संधी चालून आली. दिनेश पाटील यांची 17 जणांची टीम ‘चंद्रखणी पास’च्या ट्रेकिंग मोहिमेवर जाणार असल्याची माहिती कळली. माझीही उत्सुकता वाढली. ही संधी सोडायची नाही असं मनानं पक्कं केलं. मात्र मनात एक शंका होतीच, मी एका हातानं आणि पायानं पोलिओग्रस्त. हा एवढय़ा उंचीवरचा ट्रेक आपल्याला जमेल तरी का, अशी मनात शंका आली. नाही म्हणायला सह्याद्रीतील पदभ्रमण, राजस्थानात ट्रेकिंगचा अनुभव मला होता. मन ऐकत नव्हतं. दिनेश पाटीलसर स्वतर्‍ एका हातानं दिव्यांग असूनही हिमालयातील त्यांनी केलेल्या 20पेक्षा अधिक मोहिमा केल्या आहेत. मी या ट्रेकला जायचं ठरवलं.मुंबई, चंदीगड, मनाली असा प्रवास करून 4 जून 2018 रोजी मनालीजवळ ‘15 माइल्स’ या बेस कॅम्पवर आम्ही दाखल झालो. 1 मे ते 15 जून 2018 या दरम्यान 50 ते 60 जणांची बॅच दररोज चढाईसाठी जात असे. आमची 35 वी बॅच होती. बेस कॅपवर रिपोर्टिग केल्यापासून पहिले तीन दिवस बेस कॅम्पवरच आमचा मुक्काम होता. प्रशिक्षण/ वातावरणाशी समरस होण्यासाठी हे आवश्यक होते. पुढील दोन दिवस हलका व्यायाम व पहिल्या दिवशी अ‍ॅक्लमटाइझ होण्यासाठी 5 किलोमीटरचा वॉक, दुसर्‍या दिवशी 10 किमीचा वॉक, पर्वतावर सराव ट्रेक झाला. आपली क्षमता कळत होती. हायर कॅम्पसाठी कमीत कमी सामान कॅरी करण्याच्या सूचना बेस कॅम्प लीडरकडून वारंवार देण्यात येत होत्या. त्यानुसार अतिमहत्त्वाचं सामान रॅकमध्ये भरून अतिरिक्त सामान बेस कॅम्पवर जमा करण्यात आले.चौथा दिवस या दिवशी खर्‍या अर्थाने ट्रेकिंगला सुरुवात झाली. आमची 60 जणांची बॅच पाठीवर रॉक लावून सज्ज झाली. चार रांगेत शिस्तबद्ध उभे राहिल्यावर, कॅम्प लीडरने दिवसभराच्या ट्रेक रुटबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.  राष्ट्रगीत झाल्यावर एका मागे एक असे हायर कॅम्पसाठी स. 8 वा. निघालो. युथ हॉस्टेल्सच्या प्रथेनुसार आमच्या नंतर रवाना होणार्‍या बॅचचे सदस्य दुतर्फा उभे राहून व विशिष्ट पद्धतीने टाळ्यांच्या गजरात आम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत होते.ट्रेकला सुरुवात झाली. मनात अपार ताकद दाटली होती, शरीराची परीक्षा होती. उंच पर्वतावर, थंड हवामानात ऊर्जा मिळावी असा हेल्दी आहार मिळत होता. त्यात बटाटय़ाचा अधिक वापर. सोबत दलिया, सूप, खीर, डाळ-भात, रोटी इ. पोषक आहार होताच. सततच्या चार दिवसांच चढाईमुळे आमची दमछाक झाली होती. पाचवा दिवस फार महत्त्वाचा होता. दोरानाला (उंची 10,692 फूट). या हाय कॅम्पवरून चढाई करत ‘चंद्रखणी पास ’ (उंची 12,190 फूट) हे या ट्रेकचं सर्वात उंच ठिकाण गाठायचं होतं. तेथून पुढील कॅम्प साइट ‘नया टप्रू (उंची 9970 फूट) येथे पोहचायचं होतं. हे अंतर 14 किलोमीटरचं होतं. अतिशय खडतर व अनेक चढ-उतार. लांब पल्ल्याचा मार्ग संपता संपत नव्हता. त्यातील अंतिम बराच मोठा मार्ग अतिशय निमुळता होता, जेमतेम एक व्यक्ती जाऊ शकेल असा मार्ग. त्यात डाव्या बाजूला पर्वत तर उजव्या बाजूला नजर पोहचणार नाही एवढी खोल दरी. पाय घसरला तर जिवंत राहणं असंभव.

त्यात हिमालयातील लहरी वातावरण ! आमचं सुदैव म्हणा हा अतिशय रिस्की असा हा मार्ग पूर्ण करेर्पयत वातावरण अतिशय चांगलं होतं. आम्ही ‘चंद्रखणी पास’ (उंची 12,150 फूट) पठारावर पोहचल्यावर सर्वानी जल्लोष केला. ट्रेकिंगमधील सर्वात उंचीवर आम्ही पोहचल्याच्या आनंदात आम्ही नाचू लागलो. एकमेकांशी हस्तांदोलन करून आनंद व्यक्त केला. काहीकाळ या पठारावर काढल्यावर व सामूहिक राष्ट्रगीत झाल्यानंतर निसर्गाने आपले रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाट जणूकाही आमचे स्वागत केले. गारांच्या पावसानं सुरुवात केली. लगेच आम्ही पॉन्चू (बरसाती) परिधान करून स्वतर्‍ला डोक्यापासून पायार्पयत कव्हर केलं. गारांच्या पावसापासून बचाव करत लांब पल्ल्याच्या उतारावरून चालताना, दोन तास सातत्यानं पडणार्‍या पावसामुळे व विजांच्या-ढगांच्या आवाजानं भीतीच वाटली. चालण्याचा वेग मंदावला. दुपारी भोजनाचे ठिकाण दृष्टिपथात होतं; परंतु तेथे पोहचण्यास बराच वेळ लागत होता. अखेर दुपारी 3 च्या दरम्यान एक एक करीत आम्ही कुडकुडत भोजन कक्षात पोहचलो.निसर्ग परीक्षा पाहत होता. आम्ही चालतच होतो. शेवटच्या दिवशी फक्त 7 किलोमीटरचा प्रवास होता. सहज पार करू असं वाटलं. पण केवळ उतार, मोठे खडक. दमछाक होती. शरीराचा तोल सांभाळत चालत होतो. पायाची बोटं आता ठणकत होती. एकेक पाऊल टाकणं कठीण झालं होतं. पण तरी चाललो. मनाचं बळ सोबत करत होतं. त्यात मी फोटोग्राफर असल्याने फोटो काढण्यासाठी मी अनेकवेळा थांबत असे. तीच माझी विश्रांती. आपण अपंग असल्यानं  हा खडतर ट्रेक जमेल का असं मनात यायचंही. अनेकांच्या डोळ्यातही तो प्रश्न दिसला. परंतु केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी पुढे जाण्याचा प्रय} करत होतो. माझे सहकारी - सोबती अजय साळुंखे व विलास गारे यांनी सुरुवातीपासून अखेर्पयत माझी साथ सोडली नाही. प्रत्येक पाऊल टाकताना त्यांनी बळ दिलं. चंद्रखणी शिखर सर केलं तो आनंद शब्दांत न मांडता येण्यासारखा आहे. मी तिथं पोहचलो तेव्हा सर्वाची नजर माझ्यावर केंद्रित होती. मी सहीसलामत शिखरावर पोहचलो म्हणून सर्वानी माझं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. त्या टाळ्यांचा आवाज अजून माझ्या कानात आहे.हा चढणीचा प्रवास आयुष्यभर मला बळ देत राहील.(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत छायाचित्रकार आहेत.)