शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पायजमा लूक, आउट ऑफ द बेड लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 09:41 IST

झोपेतून उठल्यासारखं पायजमा घालून कुणी अवॉर्ड फंक्शनला जाईल का? प्रियांका गेली.. ते का?

- श्रुती साठे

बरोबर वाचताय तुम्ही. झोपेतून उठल्यावरचा अवतार असंच त्याचं मराठीत भाषांतर होऊ शकतं. सध्या हाच एक मोठा ट्रेण्ड आहे असं सांगितलं तर खोटं वाटेल ना? पण हे अगदी खरंय! आपला आवडता लूज फिट, हवेशीर, अतिशय कम्फर्टेबल पायजमा सध्या ट्रेण्डमध्ये आहे. येत्या उन्हाळ्यात टाइट लेगिंग्स, जीन्स यापासून स्वत:च्या पायांची सुटका करा आणि वॉर्डरोब छान रंगेबिरंगी पायजम्यांनी भरून टाका!पायजमा घालून का कॉलेजात आणि ऑफिसात जायचं असं मनात आलं असेलच; पण जरा थांबा.

प्रियांका चोप्रा थेट ग्रॅमी अवॉर्डला जर पायजमा घालून जाऊ शकते तर आपण कॉलेजात किंवा ऑफिसला का जाऊ शकत नाही?प्रियांका चोप्राने नेहमीच्या इव्हनिंग ड्रेस, गाउन्सला सुट्टी देत चक्क पायजमा लूकला पसंती दिली ! तिचा सिल्कचा रोब आणि पायजमा एक अनपेक्षित हटके लूक देऊन गेला. अ‍ॅक्शन गर्ल समजली जाणारी तापसी पन्नूसुद्धा स्ट्राइप पायजमा आणि जॅकेटमध्ये एकदम ट्रेण्डी दिसली. त्याच्या जोडीला वापरलेले मोकासीन प्रकारातले शूज उठून दिसले. हे शूज आपल्या नेहमीच्या वापरासाठी सुटसुटीत असतात. दीपिका पदुकोणने फ्युजन लूक निवडत सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल्या पायजमा आणि टॉपमध्ये सुरेख दिसली. वेलवेटवर केलेले विंटेज फ्लोरल प्रिंट आणि त्याला शोभणारे मॅट गोल्ड फ्रीन्जेस मस्त लूक देऊन गेले.

एकंदरीतच कम्फर्टेबल फॅशन करण्याचा ट्रेण्ड चालू झालाय. रुंदीला मोठ्या असलेल्या या पॅण्ट्स उन्हाळ्यासाठी अतिशय योग्य ठरतात. त्यावर मग आवडीनुसार लॉँग, शॉर्ट टॉप वापरता येतो. प्लेन, प्रिंटेड, वेलवेट, एम्ब्रॉयडरी केलेल्या या वाइड-लेग पॅण्ट्स ट्रेण्डी दिसतात.