शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यांवर घुबड...अ‍ॅनिमल प्रिण्टचा नवीन ट्रेण्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 01:00 IST

अ‍ॅनिमल प्रिण्टचा नवीन ट्रेण्ड. पोपट, मोर, चिमण्या, उंट, हत्ती सगळे मस्त बागडाहेत कपड्यांवर!

भक्ती सोमण

लेटेस्ट इन काय?ट्रेण्डी उत्तर मिळतं, माहिती नाही का अ‍ॅनिमल प्रिण्ट?गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या कपड्यांवर प्राणी-पक्ष्यांच्या प्रिंटची चलती आहे. त्यालाच म्हणतात अ‍ॅनिमल प्रिण्ट.पैठणीवरचा मोर तर किती प्रसिद्ध.पण काळ बदलला आता कॉटन, लिनन, बनारसी, कांजीवरम अशा प्रकारच्या साड्यांवर विविध प्रकारचे प्राणी-पक्षी, काही गणिती आकृत्या दिलखुलास बागडू लागल्यात.त्यातही चलती आहे ती घुबडाची.घुबड आपल्याकडे अशुभ मानलं जातं; पण फॅशनच्या दुनियेत आणि सध्या घुबड हे आकर्षण आहे. घुबड अर्थात ओल. तर या ओलचे कुर्ते, टॉप्स हे हमखास बघायला मिळतात. त्यात गळ्यातले, कानातलेही घुबड पेडण्टचे दिसतात. आणि अनेकजणी त्यांना सन्मानाने गळ्यात मिरवताना दिसतात.साड्यांवर मात्र घुबडापेक्षा पोपट, बेबी हत्ती, बेबी उंट, जिराफ, हरीण असे प्राणी बघायला मिळतात. पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा काही रंगांच्या साड्यांवर हे प्रिंट फारच उठून दिसतात. ते काम हाताने केलेले असल्याने त्याच्या किमतीही जास्त असतात. मात्र स्टाइल स्टेटमेंट म्हणून या प्रिण्टच्या साड्या नेसण्याकडे मुलींचा कल दिसतो.प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ताचे बहुतांश कलेक्शन याच धर्तीवर आधारलेले आहे. आणि त्याची बरीच चर्चाही फॅशन जगात होताना दिसते.

साड्याच नाही तर कुर्ते, जिन्सवरचे टॉप यांवर आता हत्ती, चिमण्या, घोडे, घुबड, कलिंगड असे प्रिण्ट हमखास बघायला मिळतात. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या सिरिअलमधील नायिका वापरते तसे जॉमेट्रिकल प्रिण्टचे कुर्तेही ट्रेण्डी होताना दिसत आहेत.

अ‍ॅनिमल प्रिण्टच्या ट्रेण्डबाबत क्वीन आॅफ हर्ट्सच्या दीपा मेहता सांगतात, पूर्वीपासूनच आपल्याकडे अशा प्रकारच्या कपड्यांचे प्रिण्ट आहेतच. लोकांना दैनंदिन आयुष्यात निसर्गाच्या जवळ जायला आवडतं. त्यामुळे असे पॅटर्नही त्यांना आपलेसे वाटतात. म्हणून तर पानं, फुलं, प्राणी अशा प्रकारचे प्रिण्ट लोकप्रिय होतात.

(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)