शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

OTT - सिनेमा थिएटरशिवाय सिनेमा, घरबसल्या प्रीमिअर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:36 PM

सिनेमाचा फर्स्ट   डे फर्स्ट   शो आपण घरबसल्या पाहण्याची कधी कल्पना तरी केली होती का?

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा वाढता फैलाव, त्याची अनेक उद्योगधंद्यांना बसलेली झळ हा संपूर्ण जगातच चिंतेचा विषय आहे.

- प्रसाद ताम्हनकर

‘गुलाबो सिताबो’ हा अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती झळकला.चर्चा तर झालीच. कुणी विरोध केला. कुणी टीका, कुणी पसंती दर्शवली.मात्र त्यामुळे पुन्हा एकदा नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम हे ओटीटी प्लॅटफॉर्म, त्यांची व्याप्ती आणि कमाई पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले. कोरोना विषाणूचा वाढता फैलाव, त्याची अनेक उद्योगधंद्यांना बसलेली झळ हा संपूर्ण जगातच चिंतेचा विषय आहे.या कचाटय़ातून मनोरंजन उद्योगदेखील सुटलेला नाही. शूटिंगबरोबरच सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहे/ मल्टिप्लेक्सदेखील उघडत नसल्याने अधिकच चिंतेत पडलेल्या काही निर्मात्यांनी आपले चित्रपट सरळ चित्रपटगृहांच्या आधी नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमसारख्या वेब प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित करायला सुरुवात केली आहे. ’गुलाबो सिताबो’ हा त्यापैकी एक पहिला बिग बजेट आणि बिग स्टारडम असलेला चित्रपट. अमेझॉन प्राइमने ‘गुलाबो सिताबो’चे हक्क तब्बल 60 कोटी रु पयांना खरेदी केले आहेत. त्यामुळे या बदलत्या काळात, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबरोबरच भविष्यात ओटीटी प्लॅटफॉर्म थिएटरला पर्याय ठरणार की नाही अशी चर्चा रंगली आहे. जर कमाईच्या दृष्टीने विचार केला, तर तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार 2019 मध्ये बॉलिवूडने 4400 कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी, आकडेवारीनुसार, 2019  मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मने पेड मेंबर्सकडून केलेली कमाई 1200 कोटी रु पये इतकी होती. 2024 र्पयत हा कमाईचा आकडा 7400 कोटींवर ङोप घेण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन महिन्यांत लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा ओटीटी प्लॅटफॉर्मला मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनासाठी हे सर्वात मोठे माध्यम म्हणून उदयास आले आहे.लॉकडाऊनदरम्यानच्या 5 फेब्रुवारी ते 29 मार्च 2020मधील आकडेवारी पाहिल्यास, ओटीटीवर वेळ घालविणा:यांच्या संख्येत नेटफ्लिक्सच्या एकटय़ाच्या दरात 73% वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अमेझॉन प्राइम व्हिडीओ 47 % आणि हॉटस्टार 3%च्या वाढीर्पयत पोहोचले आहेत. मॅक्स प्लेअरसारख्या नवख्या ओटीटीनेदेखील 27 % वाढ करून दाखवली आहे.  फिल्म इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, देशभरात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी जवळपास 9600 स्क्रीन उपलब्ध आहेत.दुसरीकडे, जर आपण ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल विचार केला तर नेटफ्लिक्सचेच एकटय़ा भारतात 1.1 करोड वापरकर्ते आहेत, तर जगभरातील 190 पेक्षा अधिक देशांमध्ये 11.1 करोड मोजणारे वापरकर्ते आहेत. 

त्याचबरोबर अमेझॉन प्राइमनेदेखील आता 209 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली सेवा सुरू झाली असल्याचा दावा केला आहे. मुद्दा असा की, आता सिनेमा पाहण्याचं सारं गणितच बदलून जातं आहे. तो अनुभव बदलतो आहे. आगामी काळात अनेक सिनेमे ओटीटी होत आहेत.काळ किती वेगाने बदलतो आहे, सिनेमा थिएटरशिवाय सिनेमाचा फर्स्ट   डेफर्स्ट   शो घरबसल्या पहायची आपण कल्पना तरी केली होती का?

( प्रसाद विज्ञानविषयक लेखक/पत्रकार आहेत.)