शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन वे तिकीट : काबिल बनण्याची कोशिश, घरदार सोडून मोठ्या शहरात स्वप्नांच्या मागे धावणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 13:20 IST

वडिलांचा औजारं बनवण्याचा व्यवसाय. पण त्यांनी मला इंजिनिअरिंग करायला शहरात पाठवलं. आयटीत प्रवेश मिळाला; पण मी ठरवलं मेकॅनिकलच करायचं..

-भूषण राजेंद्र सूर्यवंशीसायगाव (बगळी). गिरणा व मन्याड नद्यांच्या काठावर वसलेलं हे गाव. उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठी दत्ताची यात्रा भरणारं आणि पहिलवानांचं गाव. आता तर ‘महाराष्ट्र केसरीचं गाव’ म्हणून राज्यात माझ्या गावाची ओळख आहे. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे गावातच झालं. आम्ही दोन भावंडं आणि एक लहान बहीण. माझे वडील शेती औजारं बनवतात. पंचक्रोशीत त्यांची राजू बाबा म्हणून ओळख आहे. मी घरात मोठा, अभ्यासात हुशार. त्याला शिक्षणासाठी माझ्याकडे पाठवा असं माझ्या मामांनी सुचवलं. वडिलांचं स्वप्न होतं की, मुलाला इंजिनिअरिंगला पाठवावं आणि त्यांनी मला नाशिक ब्रह्मा व्हॅलीला प्रवेश घेऊन दिला. २००९ मध्ये पहिल्यांदा घर सोडलं. राहायची सोय मामांकडेच झाली. आता आपण घर सोडून नवीन शहरात आलो हे जाणवलं. घरच्यांच्या आठवणीनं जीव व्याकूळ व्हायचा; पण मी स्वत:ला सावरायचो. इंजिनिअरिंगच्या दुसºया वर्षाला मी थ्री इडियट्स चित्रपट बघितला. आणि तो पाहून मी ब्रँच बदलायचा निर्णय घेतला. आयटीमधून मेकॅनिकला बदली करून घेतलं. आमचा व्यवसाय वेल्डिंग वर्कशॉपचा असल्यानं मेकॅनिकलची आवड होती. पण आयटी मिळालं म्हणून घेतलं होतं. पण थ्री इडियट्स सिनेमा पाहून मला एक शिकायला मिळालं की, आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे, तेच करावं. ‘कामयाब नही काबिल बनो’.जे ठरवलं ते केलं. मी मेकॅनिकल इंजिनिअर झालो. आणि थोडे दिवस क्वालिटी इंजिनिअर म्हणून कंपनीत जॉब केला; पण तेथेही मन लागेना. एक दिवस जॉब सोडला आणि मनाशी खूणगाठ बांधली की, आता नोकरी करू तर सरकारी, नाहीतर आपला शेती अवजारांचा बिझनेस वाढवू.नाशिकमध्ये बरेच मित्र मिळाले व नवजीवन गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्ञानाबरोबर जीवनमान व मामासोबत राहून दुनियादारी समजली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कमी वयात समाजकारणाची आवड निर्माण झाली. माझे मामा करत त्या कामात मी सहभागी होत होतो. समाज पाहत होतो. मामाच्या मार्गदर्शनाने व मित्रपरिवाराच्या सहकार्याने गावात गुरुकुल इंग्लिश स्कूल सुरू केलं. संस्थेला आईवडिलांचं नाव दिलं. गावात विविध उपक्रम सुरू केले. ग्रामीण भागात डिजिटल पद्धतीनं मुलांना शिक्षण देणं हा आनंद काही वेगळाच मिळाला.मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्या कौशल्याचाही उपयोग करतोय. छोटे ट्रॅक्टर बनवायचा प्रयत्न करतो आहे. २०१६ ला भंगारमधून एम-८० गाडी घेतली आणि तिची चारचाकी गाडी बनवली, इंग्रज काळातील मॉडेल सारखी. पूर्ण गाव जमायचा गाडी बघायला. काहीतरी नवीन दिसायचं म्हणून खूपच मजा यायची. असेच काही उपक्रम डोक्यात आहे. एक नक्की, बाहेरगावी गेलो, नवीन जग दिसलं. शिक्षणामुळे नवीन संकल्पना सुचवायला लागल्या. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता प्रशासनात जाऊन काम करायचं आहे. म्हणून राज्य सेवा परीक्षेची तयारी पण करतोय.काबिल बनण्याचा प्रयत्न सुरूच आहे..