पर्यावरणाच्या संदर्भातले लेर्स बोअरच होतात हे खरंय, पण इतरांनी काही सांगत बसण्यापेक्षा आपणच आपली लाइफस्टाइल बदलली तर? स्वत:हून काही पर्यावरणपूरक अर्थात नेचरफ्रेण्डली काम केलं तर? ते तुम्ही करत असाल तर नक्की लिहा? फार मोठं ना सही, पण मनापासून केलेली एखादी छोटी कृती, एखादा छोटा बदल आणि त्याचा फायदा, ग्रुपनं एकत्र येऊन केलेले काही उपक्रम, हे सारं लिहा आणि पाठवा आम्हाला. पत्ता शेजारच्या पानावर तळाशी दिलेला आहेच. पाकिटावर ‘नॅचरल दोस्ती’ असा उल्लेख करायला विसरू नका.