शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

गिनिज नावाचा विक्रम...माणसाच्या जिद्दीचं, चिकाटीचं आणि आत्मविश्वासाचंच प्रतीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 07:10 IST

स्पर्धा, इतरांपेक्षा सरस असण्याची भावना तशी मूळ प्रवृत्तीच म्हणायला हवी. एखाद्या मित्रांच्या गटातही ही स्पर्धा सततच सुरू असते. याच मूळ प्रेरणेमधून धडा घेऊन ‘गिनीज बुक’ची सुरवात झाली. माणसाच्या जिद्दीचं, चिकाटीचं आणि आत्मविश्वासाचंच ते प्रतीक.

- प्रज्ञा शिदोरे

स्पर्धा ही गोष्ट माणसाच्या मूळ प्रेरणेपैकी एक आहे! सर्वांत जोरात कोण धावतो, सर्वांत लांब केस कोणाचे इथपासून ते सर्वांत जास्त वेळ सलग कोण झोपू शकतो अशा सर्वांबद्दल माणसाला मोठं कुतूहल असतं. एखादी गोष्ट कशाप्रेक्षा जास्त आहे, कोण कोणाच्या वरचढ हे समजून घेण्यामध्ये माणसाचा रस आजचा नाही. स्पर्धा, इतरांपेक्षा सरस असण्याची भावना तशी मूळ प्रवृत्तीच म्हणायला हवी. एखाद्या मित्रांच्या गटातही ही स्पर्धा सततच सुरू असते. याच मूळ प्रेरणेमधून धडा घेऊन ‘गिनीज बुक’ची सुरवात झाली. गिनीज बुक हे नाव तसं सर्व परिचित आहे. माणसाच्या जिद्दीचं, चिकाटीचं आणि आत्मविश्वासाचंच ते प्रतीक.मात्र हे गिनिज बुक नावाचं प्रकरण नेमकं कधी सुरु झालं? केव्हा सुरु झालं? कधीपासून सर्वोच्च वेगळेपणा किंवा गुणवत्ता म्हणून या बुकमध्ये नोंद व्हायला लागली, या साºयांची एक गमतीशीर कहाणी आहे.१९५१ च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सर हयुग बीव्हर, म्हणजे गिनीज ब्रुवारीजचे (गिनीज हा एका प्रकारच्या बिअरचा प्रकार आहे) मालक शिकारीसाठी बाहेर पडले. ते शिकारीच्या प्रत्येक मोसमात आयर्लंड मधील वेक्सफोर्ड कौंटी येथे स्लेनी नदीच्या काठी पक्षांची शिकार करत. गोल्डन प्लोव्हर नावाच्या पक्षावर नेम धरून त्यांनी बंदूक डागली खरी पण त्यांचा नेम काही बरोबर लागला नाही. त्यावर त्यांचा मित्र त्यांना म्हणाला की हा पक्षी सर्वांत वेगवान आहे. पण त्यांना त्याचं हे म्हणणं मान्य नव्हतं. त्यांच्यामते ग्रे गूज हा पक्षी सर्वांत वेगवान आहे. या विषयावर त्यांचा बराच वाद झाला. बरेच संदर्भग्रंथ त्यांनी पालथे घातले पण काहीकेल्या या वादाचा उलगडा करता येईना. हा अनेक दिवस चाललेला वाद, म्हणे अनेक पब्ज आणि रेस्टॉरंट्समध्ये अनेक लोकांमध्ये सुरू होता. तेव्हा या बीव्हर महाशयांना अशा एका संदर्भग्रंथाची आयडिया सुचली ज्यामध्ये अशा काही गोष्टी नमूद केलेल्या असतील.त्याची ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांच्या गिनीजमधल्या सहकार्याने नॉरीस आणि रॉस मॅक्व्हर्टर या दोन लंडनमध्ये राहणाºया व्यक्तींची नावं सुचवली. ते यापूर्वी काही वर्षे लंडनमध्ये फॅक्ट फाइंडिंग एजन्सी चालवत असत. या जुळ्या भावांना अशाप्रकारे १९५४ साली ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर्स’ हे संदर्भ पुस्तक छापण्याचं कंत्राट दिलं गेलं आणि २७ आॅगस्ट १९५५ साली हे पुस्तक पहिल्यांदा बाजारात आलं. कोण असली पुस्तकं विकत घेऊन वाचणार असं वाटत असल्यामुळे पहिल्या काही प्रति लोकांना पब्जमध्ये फुकट वाटाव्यात अशी कल्पना होती. पण काही प्रति दिल्या असताच लोकं हे पुस्तक आपणहून विकत मागू लागले. अशाप्रकारे पहिली १००० पुस्तकं अशीच हातोहात विकली गेली. डिसेंबर महिन्यापर्यंत हे पुस्तक इंग्लंडमध्ये बेस्ट सेलर बनलं. आणि पुढच्याच वर्षी अमेरिकेमध्ये प्रकाशित झाल्यावर पहिल्याच महिन्यात याच्या ७०,००० प्रति एका महिन्यातच विकल्या गेल्या. या प्रचंड यशामुळे या पुस्तकाच्या प्रति दरवर्षी नाताळाच्या आसपास प्रकाशित करायचं ठरवलं गेलं.या पुस्तकाच्या पहिल्या काही आवृत्त्यांमध्ये खासगी रेकॉर्ड जसं सर्वांत जास्त वजन उचलणं, अंडं सर्वांत उंच उडवून झेलणं इत्यादी गोष्टी होत्या. पुढे पुढे या पुस्तकांमध्ये चित्रांनी भर घातला. हे चित्र स्वरूपात असलेलं पुस्तक लहान मुलांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळवू लागले.आता हे केवळ पुस्तक रूपाने मर्यादित राहिलेलं नाही. याबद्दल अनेक टीव्ही शोज आलेले आहेत आणि त्यांची एक स्वतंत्र वेबसाइटही आहे. इथे तुम्ही आत्तापर्यंतचे रेकॉडर्स बघू शकता. तुम्हाला जर काही विक्रम करायचा असेल तर त्यासाठीची प्रक्रि याही त्या साइटवर दिलेली आहे. साधारण ३०० डॉलर्स किंवा २०,००० रुपये भरून आपण आपले नाव नोंदवून घेऊ शकतो. पण त्यांचे उत्तर यायला साधारण ५-६ आठवडे थांबण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण दरवर्षी गिनीज बुकच्या कार्यालयात ५०,००० हून अधिक अर्ज येतात. आणि त्यापैकी केवळ १००० अर्ज असे असतात की ज्यांचे विक्र म या गिनीज बुकमध्ये येऊ शकतात.त्यामुळे आपण काहीतरी भन्नाट विक्रम करू अशी आशा असेल किंवा जगभरची माणसं किती विक्रमी काम करतात हे पहायचं असेल तर या साईटला नक्की भेट द्या.गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची आॅफिशियल वेबसाइट-http://www.guinnessworldrecords.com/आणिगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यूट्युब चॅनल- न विसरता बघा!https://www.youtube.com/user/GuinnessWorldRecords