शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

@MumbaiPolice

By admin | Updated: February 4, 2016 20:58 IST

तरुणांशी त्यांच्याच भाषेत थेट संवाद साधत ‘कनेक्ट’ निर्माण करणा-या मुंबई पोलिसांच्या ट्विटर सेलला एक खास भेट.

पोलिसांचं ट्विटर अकाउण्ट असेल आणि त्यांनी केलेले ट्विट व्हायरल होत हजारोनी तरुण मुलं ते रीट्विट करतील, त्यावर जोक्स बनतील ते व्हायरल होतील आणि त्याच हॅण्डलचा वापर करून जणू पोलीस स्टेशन आपल्या टप्प्यात असल्यासारखं थेट अडचणी वरिष्ठांर्पयत पोहचतील हे खरंय यावर एरवी कुणी विश्वास ठेवला असता का?
पण डिसेंबर 2015 पासून मुंबई पोलिसांनी ट्विटरवर आपलं खातं उघडलं आणि आजच्या घडीला तरुण मुलांच्या जगात हीट आणि पॉप्युलर बनलंय. मुंबई पोलिसांना फॉलो करतोय सध्या, असं तरुण मुलंमुली बिंधास्त सांगतात.
तरुणांच्याच भाषेत तरुणांशी कनेक्ट होत संवाद वाढवण्याचा आणि तक्रारींची तड लावण्याच्या या प्रयत्नात मुंबई पोलिसांनी टेकसॅव्ही बेंगळुरूच्या पोलीस ट्विटर खात्यालाही मागं टाकलं आहे. अर्थात हे अकाउण्ट काही फक्त पोलीस अधिकारीच हॅण्डल करत नाहीत, तर काही तरुण सोशल मीडिया कन्सल्टण्टही या टीमचा भाग आहेत. आणि म्हणूनच रोज अत्यंत कॅची, स्मार्ट, अपिलिंग आणि तरीही उत्तम मेसेज देणारी आणि संवाद साधत तक्रारींना उत्तरं देणारी एक यंत्रणाच मुंबईत उभी राहिली आहे.
खाकीच्या रुबाबदार पण कणखर जगात हे हसरं, थोडंसं लाइट पण अत्यंत जबाबदार माध्यम आणि त्यातलं मेसेजिंग कसं रुळलं आहे हे प्रत्यक्ष तिथंच जाऊन पाहिलं! तिथल्या पोलीस ऑफिसरसह तरुण टीमशीही गप्पा मारल्या. 
त्यातून उलगडत गेली या टीमच्या कामाची रीत आणि यशाचं गमकही!
मुंबई पोलीस मुख्यालयाच्या अडगळीच्या खोलीत असलेलं एक छोटंसं वेब सेंटर. मात्र अवघ्या मुंबापुरीला त्यानं आता एका जाळ्यात ओढून ठेवलं आहे. मुंबई पोलिसांची 12 जणांची वेबटीम हे टि¦टरचं जाळं चालवते. ट्रायव्होन डिजिटल सव्र्हिसेस या मीडिया एजन्सीचे पाच सहकारी ट्विटच्या शब्दांमध्ये जीव भरण्याचं काम करतात. आणि जनजागृतीपर मेसेजनाही तरुण मुलांच्या चुरचुरीत भाषेत पेश करतात.
या हॅण्डलला उद्देशून तरुण मुलंही ट्विट करतात. अनेकजण आपल्या तक्रारी मांडतात. मुंबई पोलीस आणि पोलीस आयुक्तांच्या  टि¦टर अकाउण्टवर टि¦ट आलं  की सुरुवातीला त्याचे स्नॅप शॉट काढले जातात. टि¦ट्सचं गांभीर्य लक्षात आलं, जास्त काही गंभीर असेल तर त्याची माहिती तत्काल वेब सेंटर हेड अश्विनी कोळी यांना दिली जाते. अवघ्या 14क् कॅरेक्टरमध्ये आलेल्या या ट्विटच्या आधारे त्या व्यक्तीची सारी माहिती समजून उत्तर देणं अनेकदा शक्य नसतं. अशावेळी त्या व्यक्तीचा पर्सनल फोन क्रमांक मिळविला जातो. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची जोड करून दिली जाते. अनेकदा टि¦ट करणारे स्वत:ची माहिती देण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी त्यांच्यार्पयत वेळेत मदत पोहचवणं हेदेखील या टीमसमोरचं एक आव्हान असतं. संबंधित व्यक्तीची तक्रार समजून घेऊन संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर आलेल्या टि¦टवरही उत्तर दिलं जातं. यापैकी ब:याचशा टि¦ट्सची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली जाते. कधी आयुक्तांच्या अकाउंटवरील ट्विट्सची माहिती घेऊन, शहानिशा करून ती माहिती आयुक्तांनाही कळवली जाते. यावर ते स्वत: उत्तर देतात किंवा अनेकदा त्यांच्या आदेशाने अकाउंट हँडल करणारा रिप्लाय करतो. अनेकदा पोलीस आयुक्त स्वत: हे अकाउंट हाताळतात.
चोवीस तास ऑनलाइन असलेले तरुण मुलंमुली सोशल मीडियाआडून होणा:या सायबर गुन्ह्यांमध्येही गुरफटत जाताना दिसतात. तरुणाईला भुलवून बळावत चाललेल्या दहशतवादी संघटनांना आवर घालणं हे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. 
त्यामुळे या दुष्कृत्यांपासून तरुण मुलामुलींना रोखण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद वाढवण्यासाठी, त्यांना त्यांच्याच भाषेत समजवण्यासाठी पोलिसही नव्या तंत्रज्ञानाचा हात धरत आहेत. अद्ययावत वेबसाइट, अत्याधुनिक नियंत्रण कक्षासोबतच नागरिकांशी थेट आणि प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुपही तयार केले आहेत. सध्या तुफान चर्चेत असलेलं हे मुंबई पोलिसांचं टि¦टर अकाउण्टही त्याच प्रयत्नांचा आणि संवादाचा एक भाग आहे. 
या ट्विटरची कीर्ती परदेशात अडकलेल्या तरुणांर्पयतही पोहचली आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडून मलेशियातील जकार्तामध्ये अडकलेल्या वर्सोवाच्या क्षितिज घाणोकर या तरुणाने टि¦टरवर आपली व्यथा मांडली. अवघ्या काही मिनिटांतच मुंबई पोलीस त्याच्याशी जोडले गेले. सूत्रं हलली आणि आज तोच तरुण घरी सुखरूप परतलाय. गेल्या महिनाभरात तब्बल 63क् तक्रारी या अकाउण्टमुळे पोलिसांसमोर आल्या आणि त्यांचं निवारणही झालं.
 टि¦टर अकाउण्टमुळे मिळणारा चटकन प्रतिसाद, आपण थेट कनेक्ट झाल्याची भावना यामुळे तरुणांचा पोलिसांशी संवाद वाढतो आहे, हे या उपक्रमाचं यश म्हणायला हवं!
 
If you overtake from the left, you can never be right. #FollowTrafficRules
 
 
Your fast can make us furious. #SafetyResolution
 
 
Words when spoken and signals when broken have consequences. Don’t jump signals!
 
If you roll, we will weed you out. #HoshMeinAao
 
If you do good, good follows. If you do bad, we follow. :) #CyberSafetyWeek
 
 
वाढत्या सायबर आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांसोबतच बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही महत्त्वाचा ठरत आहे. या प्रकारच्या संवादी माध्यमांचा वापर करून कामाचा विस्तार आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
- दत्तात्रय पडसलगीकर 
पोलीस आयुक्त, मुंबई
 
हे ट्विटर हॅण्डल सुरू झाल्यापासून 
मुंबई पोलीस आणि आयुक्त यांच्या
अकाउण्टनेही 5क् हजार फॉलोअर्सचा टप्पा पार केला. 
#mumbaipolice 
हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर तुफान चर्चेत आहे.
 
- मनीषा म्हात्रे 
(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये वार्ताहर आहे.)
manishamhatre05@gmail.com