शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

मोबाइलचं रिसायकल बिन

By admin | Updated: August 27, 2015 18:04 IST

कॉम्प्युटरवर काम करताना समजा एखादी महत्त्वाची फाईल चुकून डिलीट झाली तर ती फाईल रिसायकल बिनमधे जाते हे आपल्याला माहीत आहे

कॉम्प्युटरवर काम करताना समजा एखादी महत्त्वाची फाईल चुकून डिलीट झाली तर ती फाईल रिसायकल बिनमधे जाते हे आपल्याला माहीत आहे. रिसायकल बिनची ही सुविधा विंडोजच्या अगदी सुरुवातीच्या व्हजर्नपासून तर हल्लीच्या विंडोज-8 र्पयत उपलब्ध आहे. म्हणजेच कॉम्प्युटरवर काम करताना चुकून एखादी फाईल डिलीट झाली तरी आपण बिनधास्त असतो. कारण आपल्याला माहिती असते क ीती डिलीट झालेली फाईल आपल्याला रिसायकल बिनमधे मिळणार आहे. मात्र सध्याचे मिनी कॉम्प्युटर अर्थात स्मार्टफोनमधे अजून तरी अशी रिसायकल बिनची सुविधा अॅण्ड्रॉईडने दिलेली नाही. त्यामुळे स्मार्टफोन हाताळताना जर चुकून तुमचा एखादा महत्त्वाचा फोटो किंवा फोटोजची संपूर्ण डिरेक्टरी किंवा दुस:या कुठल्या फाईल्स डिलीट झाल्या तर मात्र त्या फाईल्स किंवा फोटोजला आपल्याला कायमचे गमवून बसावे लागते. हल्लीच्या टच स्क्रीन मोबाइलच्या जमान्यात तर अशा चुकून फाईल किंवा फोटोज डिलीट होण्याची शक्यता फार वाढली आहे. कारण टच स्क्रीन मोबाइल हाताळताना नाजूक धक्क्यानेसुद्धा फाईल डिलीट होण्याचे प्रकार बरेच वाढले आहेत. स्मार्टफोन लहान मुलंही ब:याच वेळा घेऊन बसतात. या लहान मुलांकडूनही ब:याचदा स्मार्टफोनमधील महत्त्वाचा डेटा डिलीट होण्याचा धोका असतो. अशा वेळी हताश होण्याऐवजी आपण दुसरं काहीही करू शकत नाही. 
पण आता अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये डंपस्टर या थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने आपण हा धोका टाळू शकतो.
 
कसे इंस्टॉल कराल?
डंपस्टर ईमेज अॅण्ड व्हिडीओ रिस्टोर  या नावाने हे अॅप गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे. हे अॅप स्मार्टफोनवर इन्स्टॉल करायचं. त्यावर क्लिक केलं की स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एक लायसन्स अग्रीमेंट येते. त्याला अॅक्सेप्ट केले कीइनिशिअल सेटअप स्क्रीन ओपन होतं. यामध्ये तुम्ही ठरवू शकता कीकाय काय तुम्हाला डंपस्टर  करायचे आहे. अर्थात काय काय रिसायकल बिनमधे पाठवायचे आहे. जसे क ीईमेसेजेस, व्हिडीओ, ऑडिओ, डॉक्युमेंट,अदर फाईल्स, अॅप्स आदि सेटिंग या ठिकाणी तुम्हाला कराव्या लागतील. यानंतर नेक्स्ट केल्यानंतर डंपस्टर तुमचा स्मार्टफोन चेक करेल. अर्थात याला थोडा वेळ लागेल. हे झाले की डंपस्टरचा मेन स्क्रीन ओपन होईल.
डंपस्टर कसं काम करतं?
एकदा का डंपस्टर ईमेज अॅण्ड व्हिडीओ रिस्टोअर हे अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल झाले कीते विंडोजच्या रिसायकल बिनप्रमाणो काम करायला सज्ज होते. म्हणजेच तुम्ही एखादा फोटो किंवा फाईल डिलीट केली असता तो आपोआप डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमध्ये जाऊन पडतो. तुम्ही डंपस्टर ओपन करून पाहिले असता तुम्ही डिलीट केलेला फोटो त्याच्या प्रिव्हूसह तिथे दिसतो. म्हणजेच यापुढे तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्याकडून चुकून डिलीट झालेल्या सर्व फाईल्स आता या डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमधे येऊन पडतील. आता या डिलीट झालेल्या फाईल्सचे काय करायचे हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच त्या डिलीट झालेल्या फाईल्स रिस्टोअर करायच्या क ीकायमच्या डिलीट करायच्या. डंपस्टरमध्ये या फाईल्स शेअर करायची सुविधासुद्धा आहे. म्हणजेच या डिलीट झालेल्या फाईल्स तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा ब्लूटुथवर शेअर करू शकता किंवा ईमेलसुद्धा करू शकता.
मात्र कॉम्प्युटरवर विंडोजच्या रिसायकल बिनमध्ये फक्त मुख्य हार्ड डिस्क वरील फाईलच डिलीट झाल्या की रिसायकल बिनमधे जातात. अन्य ड्राइव्ह जसे क ीनेटवर्क ड्राइव्ह, पेन ड्राइव्ह, कार्ड रीडरवरील फाईल्स डिलीट झाल्या असता त्या फाईल रिसायकल बिनमधे जात नाहीत अगदी तसेच डंपस्टरमधेसुद्धा फक्त फोन मेमरीमधील डिलीट झालेल्या फाइल्स डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमधे जातात. एसडी कार्डवरील फाईल्स डिलीट झाल्या असता त्या रिसायकल बिन अर्थात डंपस्टरमधे जात नाहीत.