शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
4
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
5
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
6
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
7
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
8
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
9
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
10
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
11
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
12
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
13
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
14
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
15
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
16
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
17
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
18
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
19
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
20
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश

भाईंदर-वसईची ही पोरं, वस्तीत राहणार्‍या पोरांनी कसा जिंकला अमेरिकेतला डान्स शो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 18:12 IST

अंगात डान्सचं पॅशन, मनात आग आणि जिद्द त्यांनी म्हणता म्हणता अमेरिका गॉट टॅलण्ट द चॅम्पियन्स सीझन 2 या रिअ‍ॅलिटी शोर्पयत बाजी मारली आणि जगभरातून आलेल्या 40 डान्स ग्रुपला मागे टाकत हा शो जिंकला. कोण ही मुलं? कुठून आली? आणि कसं भिनलं नृत्य त्यांच्या जगण्यात त्याची ही त्यांच्या नृत्याइतकीच थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट.

ठळक मुद्देजगणं आणि डान्स असं सोबत होतं आमच्या, त्यात या मुलांची जिद्द, मेहनत आणि सराव यांचं हे फळ आहे.

 -धीरज परब 

उत्तर प्रदेशवरून रोजीरोटीच्या शोधात आलेले ओमप्रकाश चौहान. भाईंदर पश्चिमेच्या एका झोपडपट्टीत त्यांना भेटला विकास गुप्ता. 2012ची ही गोष्ट. त्या दोघांनी मिळून भाईंदरच्याच 20 मुलांना घेऊन एक ग्रुप सुरू केला. अनबिटेबल. ही सगळी मुलं डान्सवेडी. त्यांना घेऊन ओमप्रकाश आणि विकास भन्नाट कोरिओग्राफी करू लागले. भाईंदरच्याच जय अंबेनगर, गणेश देवल नगर, भोला नगर या झोपडपट्टय़ांसह शहरात अन्यत्र राहणारी ही मुलं. भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क खाडी किनारी रोज सायंकाळी हा ग्रुप जमायचा. आणि मध्यरात्रीर्पयत सराव चालायचा. सकाळ झाली की त्यातली काही मुलं शाळा-कॉलेजात जायची, तर काही पडेल ते काम करणारी. दिवस सरला की सायंकाळी परत आपला सगळा थकवा विसरून ही मुलं डान्सच्या सरावाला येत. डान्स करता यावा म्हणून बाकी काही सुविधा असण्याची शक्यता नव्हतीच. मात्र त्याचीही त्यांना फिकीर नव्हती, खाडीकिनारी उद्यानात, मोकळ्या मैदानात ते डान्स प्रॅक्टिस करत.हे सगळं कशासाठी तर त्याकाळी टीव्हीवर गाजत असलेल्या अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये जाण्याची, आपली कला लोकांना दाखवण्याची संधी मिळावी म्हणून! त्यांचा डान्सही त्यांच्यासारखाच बेधडक, बेदरकार, जोशीला आणि वेगवान. डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये जाण्याचं स्वपA विकाससह या सगळ्याच डान्सर मुलांच्या अंगात भिनायला लागलं होतं.डान्स रिअ‍ॅलिटी शो जिंकायचा आणि आपल्या आईवडिलांना सन्मानानं स्टेजवर बोलवायचं हे तर विकासचं स्वपAच होतं. 2015 साली त्यांना एका रियालीटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. ग्रुपमधले सगळेच जीव तोडून सराव करत होते. मात्र सराव करताना एका स्टण्टच्या वेळी विकास पडला. गंभीर जखमी झाला. सुमारे महिना भर जगण्यामरण्याची झुंज चालली; पण विकास वाचला नाही. या घटनेचा ग्रुपमधल्या सगळ्याच मुलांनी धसका घेतला. ओमप्रकाशला तर विकास आपल्यामुळे गेला असा अपराधीभाव वाटू लागला. विकासचा असा अपघाती मृत्यू सर्वाच्याच जिवाला चटका लावून गेला. त्यानंतर ग्रुपचा सरावही बंद पडला. मुलंही पांगली. डान्सच्या जिवावर पाहिलेलं बेहतर जगण्याचं स्वपAंही तुटलं.काही काळानं ओमप्रकाश विकासच्या वडिलांना जाऊन भेटला. म्हणाला, जातो मुंबई सोडून. पण विकासच्या वडिलांनी त्याला अडवलं. म्हणाले, निराशा सोड. पुन्हा ग्रुप जमवा. रिअ‍ॅलिटी शोमध्ये नाव कमवायचं हे विकासचं स्वपA होतं. आज तो नाही; पण ते स्वपA तर आहे मग तुम्ही ग्रुप पुन्हा बनवा. सराव सुरू करा. विकासच्या वडिलांनीच उमेद दिल्यानं ओमप्रकाश आणि इतर डान्सर मुलांनी पुन्हा उभारी धरली. पांगलेली मुलं पुन्हा जमवली. जेसल पार्कचा खाडी किनारा पुन्हा अनबिटेबल ग्रुपच्या थरारक नृत्य प्रकाराने थिरकू लागला. विकासच्या आठवणी कायम राहाव्यात म्हणून ग्रुपचं नावदेखील विकास म्हणजेच व्ही अनबिटेबल असं बदलण्यात आलं.ओमप्रकाश आणि डान्सर मुलांनी मोठय़ा जोशात सराव सुरू केला. पण क्षुल्लक अशा कारणांनी त्यांची रिअ‍ॅलिटी शोमध्ये संधी हुकत होती. ओमप्रकाशची भेट त्याचकाळात थरारक नृत्याविष्कार करणार्‍या नायगावच्या जुचंद्र गावातील ओसम डान्स ग्रुपच्या स्वप्निल भोईर या तरुणाशी झाली. स्वप्निलचापण हा एक लहानसा ग्रुप होता. ओमप्रकाशने एकूणच व्ही अनबिटेबलची कहाणी त्याला सांगितली आणि तूपण आमच्या ग्रुपमध्ये ये अशी गळ घातली. त्यानंही या मुलांच्या स्वपAात आपलं स्वपA गुंफत ग्रुपमध्ये आपला ग्रुप अ‍ॅड केला.  स्वपिAलने जुचंद्रच्या पुढे चंद्रपाडा इथल्या चंडिका देवी ट्रस्टच्या हरिहर पाटील यांना विनंती केली की, तुमच्या इथला रंगमंच आम्हाला सरावासाठी  द्या. या मुलांची जिद्द पाहून पाटील यांनीही त्यांना रंगमंच विनामूल्य वापरण्यास दिला. त्याच सुमारास रिअ‍ॅलिटी शोमध्येच स्वतर्‍ला सिद्ध करण्याचं स्वपA पाहणारा उत्तम डान्सर, कोरिओग्राफर रोहित जाधव व्ही अनबिटेबल ग्रुपशी जोडला गेला. आणि मग सुरू झाला एक भन्नाट प्रवास. साधारण गेली अडीच वर्षे सायंकाळपासून रात्री उशिरार्पयत ही मुलं जमतात. वय वर्षे 13 ते 22.  भाईंदर - नायगाव, वसई - विरार भागातील हे मुलंमुली. कुणाचे आईवडील कामगार, कुणी फळांचा, कुणी भाजीचा गाडा लावतं. कष्टकरी वर्गातली ही मुलं. नायगाव रेल्वेस्थानकापासून चंडिका देवी मंदिरार्पयत जायला त्यांच्या खिशात रिक्षापुरतेही पैसे नसत, मग चालत ही मुलं झपाझप मंदिरात जायची. नृत्याची ओढच अशी की बाकी सगळे कष्ट त्यांना काही वाटेनासे झाले.

छोटासा ग्रुप एव्हाना मोठाही झाला. 35-40 र्पयत गेली संख्या. त्यातले बहुतेकजण शाळा-कॉलेजात जातात. पण हाताला कामही शोधतात. त्यातलाच एक म्हणजे भाईंदरचा सूरज सोनी. हा डान्सर असा की पाहणार्‍याच्या डोळ्याची पापणी लवू नये. मात्र रात्री उशिरार्पयत सराव करून तो रोज सकाळी घरोघर जाऊन वृत्तपत्र टाकायचं काम करतो. तीच गोष्ट वीर गोविंदन नरोत्तमची. तो बसचालक आहे. डब्ल्यू खारवार हा फळभाजी विक्रेत्याचा मुलगा तर आरिफ पठाण हा स्टील कारखान्यात काम करतो. या ग्रुपमधल्या प्रत्येकाची इथं एक गोष्ट आहे. मात्र त्यातले समान धागे दोनच. ग्रुपमधला प्रत्येक जण सर्वसामान्य कुटुंबातील वा गरीब घरातला आहे. आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या अंगात डान्सचं पॅशन आहे. आग आहे, ताल आहे. त्या जिद्दीच्या जोरावर ही मुलं एकमेकींच्या साथीनं असं काही उभी राहिली की त्यांच्या नृत्यानं सारं जग अवाक् झालं. जग बदलायला खरी सुरुवात झाली ती 2018 साली.  डान्स प्लस सीझन-4 या शोमध्ये भाग घेण्याची संधी व्ही अनबिटेबल ग्रुपला मिळाली. त्या संधीचं सोनं करत ग्रुपने विकासच्या आई- वडिलांना स्टेजवर बोलावत त्याचं एक स्वप्न पूर्ण केलं. त्याचकाळात या मुलांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. त्यांच्या नृत्यातला थरारच असा की पाहणार्‍यानं दाद द्यायलाच हवी. त्याचाच परिणाम म्हणून मार्च 2019 मध्ये त्यांना थेट अमेरिकेतून निमंत्रण आलं. अमेरिकन गॉट चॅलेंज सीझन-14 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी व्हा असं आवतण देणारा इमेलच येऊन धडकला. इमेल पोहोचला तेव्हा त्यांच्या हातात जेमतेम महिनाभराचा वेळ होता. पण मुख्य प्रश्न असा होता की, अमेरिकेला जायचं तर या बहुतांश मुलांकडे पासपोर्टच नव्हता. धावपळ करत अनेकांचे तत्कालमध्ये पासपोर्ट तयार करण्यात आले. प्रश्न व्हिसाचा होता, त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता सुरू झाली. अमेरिकेला जायचं म्हणून ओमप्रकाशने तो काम करत असलेल्या कंपनी मालकाकडून चार लाख रुपये उसने घेतले. मुलांनीपण जमेल तसे पैसे गोळा केले. पासपोर्ट आणि व्हिसाची किचकट प्रोसेस कशीबशी पार पडली आणि सगळ्यांनी अमेरिका गाठलं.शोमध्ये ही मुलं सहभागीही झाली. मात्र त्यावेळी या ग्रुपला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अर्थात तिथवर पोहोचणंही फार काही सोपं नव्हतं. जिंकणंच होतं ते या मुलांसाठी. मात्र त्यांच्या दिशेनं अजून एक संधी चालून आली. ऑक्टोबरमध्ये होणार्‍या अमेरिका गॉट टेलेंट-2 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली. यावेळी मात्र या मुलांनी ठरवलं की, आता किरकोळ चुकाही करायच्या नाहीत. जीवतोड मेहनत करायची. शंभर टक्के द्यायचंच. डान्स त्यांच्या अंगात होता, आता तो जिद्द होऊन बसला. विकासचं स्वपA पूर्ण करण्याची ही आंतरराष्ट्रीय संधी होती. ‘विकास’ असं लिहिलेले शर्ट मग त्यांनी अंगावर चढवले. पायांत वीज भरली, परस्परांवर विश्वास होताच. एकमेकांच्या मदतीनं त्यांनी या डान्स शोच्या विजेतेपदावर दावेदारी सांगायला सुरुवात केली. आणि त्यांचे एकेक नृत्याविष्कार पाहून तज्ज्ञ आणि अमेरिकन दर्शकही चकित झाले. या रिअ‍ॅलिटी शोसाठी आलेल्या जगभरातील विविध देशातल्या स्पर्धकांना मागे टाकत अखेरीस या मुलांनी आपलं स्वपA पूर्ण केलं.व्ही अनबिटेबल या भारतीय ग्रुपनं ही स्पर्धा जिंकलीच.एका वस्तीत मूळ धरलेलं एक स्वपA आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आता पुढच्या प्रवासाला निघतं आहे.

****

जिंकणं हे स्वपA होतंच, पण सहभागी होणं ही देखील मोठीच गोष्ट होती. डान्स हे आमच्या सगळ्यांचं पॅशन आहे. जगण्यातच इतकी पॅशन आहे की ती डान्समध्ये उतरते. आणि आमचं जगणंही आमच्या डान्समध्ये उतरलंच. म्हणजे आमच्यापैकी काहींचे वडील भाजीच्या-फळांच्या हातगाडय़ा लावतात, आम्ही डान्ससाठी प्रॉप म्हणून ती हातगाडी वापरली. सायकल तर जगण्याचाच भाग ती वापरली. हिंदी बॉलिवूडची गाणीच सोबत घेऊन गेलो. जगणं आणि डान्स असं सोबत होतं आमच्या, त्यात या मुलांची जिद्द, मेहनत आणि सराव यांचं हे फळ आहे.

-रोहीत जाधव कोरिओग्राफर, व्ही अनबिटेबल ग्रुप.

(लेखक लोकमतचे मिरारोड-भाईंदरचे वार्ताहर आहेत.)