शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

खेड्यापाड्यातल्या शेतकर्‍यांच्या मुली इण्टरनॅशनल स्टार कशा झाल्या?; हिमा, द्युती, विस्मयाच्या यशाचा सुपरफास्ट प्रवास

By meghana.dhoke | Published: July 19, 2019 7:00 AM

स्वतःच्या जगण्याची सूत्रं स्वतःच्याच हातात घेऊन नवीन वाट चालणार्‍या आणि आपल्या जगण्याचं आपणच नेतृत्व करत इतरांसाठी पायवाट तयार करणार्‍या कर्तबगार महिलांचा सन्मान.

ठळक मुद्देयेत्या मंगळवारी 23 जुलै 2018 रोजी पुण्यात ही परिषद संपन्न होते आहे. तिचं सूत्रच आहे, लिव्ह टू लीड. त्यानिमित्तानं भारतीय तरुण खेळाडूंच्या जिद्दीला हा सलाम ! या तरुण मुली खेळाच्या मैदानातून समाजात परिवर्तनाची पायाभरणी करत आहेत, त्याची ही नोंद.

आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत निघालेल्या या भारताच्या लेकी. त्यांच्या जिद्दीचं आणि गुणवत्तेचं  कौतुक आज सारं जग करतंय. त्यांनी भिरकावून दिलंय जगण्यातलं कोमटपण आणि ठरवलं आपण जिंकायचंच. हिमा, विनेश, द्युती, विस्मयासह भारतीय महिला फुटबॉल संघातल्या मुलींना भेटा, त्या सांगताहेत खेळाची नवीच गोष्ट.

हिमा दास - 11 दिवस, तीन सुवर्णपदकं

एक ना दोन थेट तीन सुवर्णपदकं ती जिंकली. तेही फक्त 11 दिवसांत.हिमा दास.आसामची नवीन आयडॉल. आधीच तिचं यश आसामी माणसाला भूषणावह  होतंच, आता तर तिने एकाच आठवडय़ात तीन सुवर्णपदकं जिंकण्याची कमाल करत सार्‍या पूर्वाचलालाच आनंदाची भेट दिली आहे.आणि तो आनंदही किती असावा.हिमाला तिसरं सुवर्णपदक मिळाल्यावर तिच्या वडिलांशी संपर्क केला. ते तिकडे दूर आसामच्या नागाव जिल्ह्यातल्या धिंग गावात. सध्या सारा आसामच पुरात बुडालेला आहे. धिंग गावातही पूर आलेला आहेच. जगणं मुश्कील. मोबाइलला रेंज मिळणंही कठीणच. फोन लागला तर हिमाचे वडील रोंजीत दास खूश होते. म्हणाले, ‘गर्व तो है ! अच्छा खेलता है!’साधं वाक्य मात्र त्यात लेकीविषयी अभिमान ओतप्रोत भरलेला आहे. आसामी माणसाच्या साध्या, नम्र, कष्टप्रद जगण्यात त्यांच्या लेकीचं यशही ते अत्यंत नम्र आणि मृदू आवाजात स्वीकारतात. शांत असतात.तेच हिमाचे प्रशिक्षक निपॉन दास यांचंही. ते आता गुवाहाडीत आहेत. निपॉनदा आणि निबाजीत मालकर हे तिचे दोन स्थानिक प्रशिक्षक होते. त्यांनी साथ दिली, प्रशिक्षण दिलं म्हणून हिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली. निपॉनदांच्या शब्दांत प्रचंड अभिमान असतो. हिमाची गुणवत्ता आणि टॅलण्ट जे त्यांना एकेकाळी दिसलं होतं ते तिनं जगाला सिद्ध केलं याचा अभिमान बोलण्यात असतोच. मात्र तेही सांगतात, ‘उसको सिर्फ टायमिंग समझ में आता है, वो सिर्फ टायमिंग के पिछे भागता है, किसी और के रेस में नहीं भागता!’आजच नाही तर अगदी नवीन होती, तेव्हाही हिमाला फक्त फिनिशिंग लाइनच दिसायची. निपॉनदा सांगतात, ‘उसको बस फिनिशिंग लाइन दिखता है,  वो बोलता है सर आप सिर्फ टायमिंग बोलो, मै वो टायमिंग लाके दिखाता.’आता एकाहून एक टायमिंग देत, ती सुवर्णपदकं जिंकत सुटली आहे. पोरगी तशी एकदम बेधडकच. टॉम बॉय. बोलायला कुणाला ऐकणार नाही.  घरात सहा भावंडं. ही धाकटी.  पायात वेग असा की गावातली पोरं हिला फुटबॉल खेळायला घेत नसत.  तिथं भांडून खेळावं लागे. शाळेत रनिंग रेस व्हायच्या, त्यात हिनं भाग घ्यावा म्हणून त्याचा लकडा लागायचा. पण हिला पळण्यापेक्षा फुटबॉलमध्ये जास्त रस.  तिला इंडिया जर्सीचं मोठं अप्रूप. ती बरोबरीच्या पोरांना कायम सांगायची, इंडियाचा टीशर्ट मिळायला पाहिजे, असं काहीतरी करायचंय. आणि ते तिनं करूनही दाखवलं.निपॉनदांचं म्हणणं आहे, की या मुलीत गुणवत्ता तर आहेच; पण तिला बाहेरुन कुणी प्रेरणा देण्याची, रेटण्याची गरज नाही. ती बिनधास्त असते. पळते तेव्हा वार्‍यासारखी पळते. तिला कशाची भीती वाटत नाही, कुणाला ती बिचकत नाही. जेव्हा पांढर्‍या रेषेपलीकडे असते तेव्हा तिच्या डोक्यात एकच असतं, सगळ्यात पुढे जायचं. पळायचं. वेगानं पळायचं. रेसच्या वेळी ती अत्यंत गंभीर असते. स्वतर्‍त हरवल्यासारखी. एरव्ही मात्र नुस्तं भिरभिरं. हसत-मजेत जगते. कशाचं म्हणून टेंशन घेत नाही.  केवळ दीड वर्षाच्या प्रशिक्षणानं ही मुलगी एकेक रेस जिंकत पुढे निघाली. 100, 200, 400 मीटर स्पर्धेत तिनं अनेक मेडल्स जिंकली.  आणि आता फक्त 11 दिवसांत म्हणजेच गेल्या 2 आणि 8 जुलै ला 200 मिटरचं पोलंडमध्ये तिनं सुवर्णपदक जिंकलं, तर शनिवारी झेक रिपब्लिकमध्ये ती 200 मिटरचं सुवर्णपदक जिंकली. गळ्यात आसामी गमछा आणि पाठीवर तिरंगा घेऊन पळणारी हिमा, आसामचीच नाही तर देशाची शान आहे. कारण आज तरी तिच्या वेगावर फक्त तीच स्वार होऊ शकते!***द्युती चंद - 100 मीटर धावणे-सुवर्णपदक

द्युती चंद हे नाव अलीकडच्या काळात खूप गाजलं. बहुतेकांना झेपलंच नाही, तिचं वागणं. काहीजण तर अगदी सोशल मीडियात म्हटले की, करायचं ते कर ना गुपचूप, उगीच काय जगजाहीर सांगत बसायचं.पण ती मात्र सच्चाईनं, जे जसं आहे तसं स्वीकारायला आणि चारचौघांत सांगायला कचरली नाही. भारताची आघाडीची धावपटू. ओडिशातल्या चका गोपालपूर नावाच्या अगदी लहान खेडय़ातली ही तरुणी. तिनं माध्यमात मुलाखत देऊन सांगितलं की, माझी गावाकडे एक मैत्रीण आहे, मी तिला जोडीदार म्हणून निवडलं आहे. अर्थातच मोठा स्फोट झाला, भारताची एक मोठी खेळाडू आपण बायसेक्शुअल असल्याचं जाहीर करते हे लोकांनाच काय तिच्या घरच्यांना, बहिणीलाही झेपलं नाही. तेही चिडले. तिला बेदखल करू म्हणाले. मात्र त्या सार्‍या तणावातही द्युती सराव करत होती आणि थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेला रवाना झाली. गेल्याच आठवडय़ात इटलीत झालेल्या वर्ल्ड युव्हिसाइज स्पर्धेत तिनं 100 मीटर धावत सुवर्णपदक पटकावलं. हे सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू. तिचं स्वतर्‍चंही हे पहिलंच आंतरराष्ट्रीय पदक आहे. विशेष म्हणजे संतापलेल्या तिच्या कुटुंबानेही लेकीचं हे यश आता साजरं केलं आहे. मात्र पदक जिंकल्यानंतर द्युतीनं केलेलं ट्विट फार महत्त्वाचं आहे. ती म्हणते, ‘पूल मी डाउन, आय विल कम बॅक स्ट्रॉँगर!’ ही गोष्ट काही ती कुणा एकादोघांना, घरच्यांना नाही तर सार्‍या समाजाला सांगते आहे. ज्यांनी तिची हेटाळणी केली. लैंगिक कल समजल्यावर कमी लेखलं. अलीकडेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, ‘ माझं मेडल हेच माझं उत्तर आहे. माझ्या टीकाकारांना मी हेच सांगीन की, माझं पर्सनल लाइफ, माझं करिअर, मी स्वेच्छेनं निवडलेला जोडीदार हे सगळं मी उत्तम मॅनेज करू शकते. मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. मी माझे निर्णय घ्यायला समर्थ आहे. माझ्याविषयी गरळ ओकणारे आता तर गप्प बसतील. कारण नकारात्मकेनं माझं काहीच बिघडत नाही, त्यानं मला ताकदच मिळते हे लक्षात ठेवा!’आपलं जगणं जसं आहे तसं स्वतर्‍शी आणि जगाशी मान्य करणारी देशातली ही पहिलीच खेळाडू आहे. आता तर 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत तिनं सिद्ध केलं आहे की, तिचा तिच्या क्षमतांवर विश्वासही आहे आणि जिंकून दाखविण्याची हिंमतही !**विनेश फोगाट र्‍ कुस्ती -53 किलो गट-2 सुवर्णपदक

दंगल सिनेमा तर आपण सगळ्यांनीच पाहिला. त्यातल्या धाकड मुली आणि म्हारी छोरींया बेटोंसे कम है के म्हणणारे महावीरसिंग फोगाटही सार्‍या देशाच्या ओळखीचे आहेत. त्यांना पुन्हा तोच डायलॉग अधिक ताठ मानेनं म्हणण्याची संधी त्यांच्या अजून एका लेकीनं दिली आहे.विनेश फोगाट तिचं नाव.यासर डोगू इंटरनॅशनल या इस्तांबूल येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत विनेशने 53 किलो गटात गेल्याच आठवडय़ात सुवर्णपदक जिंकलं. हेच एक पदक नव्हे तर त्यापूर्वी गेल्याच आठवडय़ात स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेतही तिनं सुवर्णपदक जिंकलं आहे.विनेश ही महावीरसिंग फोगाट यांच्या भावाची राजपालची मुलगी. प्रियांका आणि विनेश या दोन बहिणी. त्यांच्या वडिलांच्या पश्चात महावीरसिंगांनीच या मुलींचा सांभाळ केला. त्यांनाही कुस्तीचा हुन्नर शिकवला. विनेशने कुस्तीत अप्रतिम कौशल्य कमावलं आणि भल्याभल्यांना चीतपट केलं. भारतासाठी राष्ट्रकुल आणि एशियाडमध्ये कुस्तीचं सुवर्णपदक जिंकणारी ती एकमेव खेळाडू आहे. तिचं कुस्तीचं करिअर असं झोकात असतानाच तिनं लग्नाचाही निर्णय घेतला. तेव्हा अनेकांना काळजी वाटली होती की संपलं या मुलीचं आता घरगृहस्थित करिअर. 13 डिसेंबर 2018 रोजी तिनं सोमवीर राठीशी प्रेमविवाह केला. तो स्वतर्‍ही कुस्तीगीर आहे. राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आहे. दोघांचं कुस्तीप्रेम मोठं. त्यामुळेच लग्न झालं की करिअर संपलं या गैरसमजुतीलाही विनेशने तडा दिला आणि उत्तम सराव करत सहाच महिन्यात दोन आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकं जिंकून दाखविली. एवढंच नव्हे तर टोक्यो येथे होणार्‍या ऑलिम्पिकसाठीही पात्रता फेरीतून पुढं सरकत ती आता ऑलिम्पिकच्या तयारीलाही लागली आहे.फोगटांची ही धाकड लेक.. जिंकत निघाली आहे. पुढे. आणखी पुढे!**व्ही.के. विस्मया -200 मीटर धावणे- रजतपदक

 

 

व्ही. के. विस्मया अर्थात विस्मया कोरोथा असं तिचं नाव. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातली ही मुलगी. वडील बांधकाम मजूर. जिथं बांधकाम साइट असेल तिथं काम, तिथं कुटुंब. परिस्थिती अत्यंत जेमतेम; पण मुलींनी शिकावं अशी वडिलांची फार इच्छा. त्यांची मोठी मुलगी विजीषा वेगात पळायची. कोथामंगलमच्या सेंट जॉर्ज स्कूलमध्ये या मुली शिकायच्या. एकदा ट्रायल होती. विजीषा सराव करत होती. आणि विस्मया केवळ तिला सोबत गेली होती. मात्र राजू पॉल नावाचे सर विस्मयाला म्हणाले, तू पळ, दे ट्रायल, पळ. बघ जमतंय का? सहज म्हणून ही मुलगी पळाली तर तिचा वेग आणि धाव पाहून ते चकीत झाले. त्यानंतर विस्मया विजयवाडाला विद्यापीठस्तरावरील स्पर्धेला गेली. तिथं तिनं पदक जिंकलं. मात्र त्यापूर्वी वर्षभर ती पळालेलीच नव्हती. स्नायू दुखावल्यानं तिचं पळणंच थांबलं होतं. दुखापतीतून सावरल्यावर वर्षभरानं ती स्पर्धेला गेली आणि जिंकली. तिथं अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या लोकांनी तिला हेरलं. आणि तिची थेट पटियालाच्या कॅम्पसाठी निवड झाली.तोर्पयत ही मुलगी एकही राष्ट्रीय स्पर्धा खेळलेली नव्हती. तसा काही अनुभवही नव्हता. पळायची तेही अनवाणीच. त्यामुळे उत्तम प्रशिक्षण किंवा टायमिंगचा सराव असं काहीच नव्हतं.पटियालाच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षक गलीना बुखरीना यांनी तिला प्रशिक्षण दिलं. फक्त चार महिन्यांचं प्रशिक्षण आणि ती थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रवाना झाली. 4 बाय 400 मीटर वुमेन्स रिलेसाठी तिची निवडही झाली. सोबत हीना दास, सरिताबेन, पुवाम्माही. सगळ्यात कच्चा लिंबू हीच. त्यावर टीकाही झाली, काहींनी आक्षेपही घेतले. मात्र विस्मयाने तिची निवड सार्थ ठरवली आणि महिला संघही रिले जिंकला.आता पोलंडला झालेल्या स्पर्धेत विस्मयाने रजतपदक पटकावलं. आणि रिलेतही उत्तम कामगिरी करत रजतपटक जिंकलं. आता व्यक्तिगत खेळात उत्तम कामगिरी करण्याचं तिचं ध्येय आहे. आणि तिला गणितात एम.एस्सी.ही पूर्ण करायचं आहे. ती सांगते, ‘मी इंजिनिअरिंग करणार होते, तेव्हाच पळणं सुरू झालं आणि शिक्षण सुटलं. आता शिक्षण तर पूर्ण करायचं आहेच; पण मला आधी स्वतर्‍चं घर घ्यायचं आहे. माझ्या कुटुंबाचं हक्काचं घर. आम्ही आजवर भाडय़ाच्याच घरात राहिलो, स्वतर्‍चं घर काय असतं हा आनंद आईबाबांना द्यायचा आहे. आणि पळत रहायचं, ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे.**भारतीय महिला फुटबॉल संघ

भारतीय महिला फुटबॉल संघ आहे, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या उत्तम कामगिरी करतोय, हे तरी आपल्याला कुठं माहिती असतं?त्यामुळे त्या संघानं काही विलक्षण कामगिरी केली तरी त्याची बातमी सहसा ठळकपणे आपल्यार्पयत पोहोचतेच असं नाही. सध्या मात्र भारतीय महिला फुटबॉल संघ एकदम चर्चेत आहे. कारण त्यांनी घोडदौडच अशी सुरू केली आहे की, गेल्या सहा महिन्यात सामने जिंकण्याचा नुसता धडाकाच लावला आहे. जानेवारी 2019 पासून म्हणजे गेल्या साधारण सहा महिन्यात त्यांनी 18 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामने या मुली जिंकल्या आहेत, तर 1 ड्रॉ झाला, आणि फक्त 5 सामने त्यांनी गमावले आहेत.या कामगिरीच्या जोरावरच त्यांनी आंतरराष्ट्रीय फिफा रॅँकिंगमध्ये 6 स्थानानं पुढे झेप घेत 57 व्या स्थानार्पयत जाण्यात यश मिळविलं आहे. विशेष म्हणजे आशिया संघात त्यांचं रॅँकिंग 11 आहे. आता या मुलींसाठी एकमेव नजीकचं ध्येय आहे ते म्हणजे आशियातला पहिल्या 10 संघांत पोहोचायचं.हे सारं वाचूनही फार एक्साइटमेण्ट अनेकांना वाटणार नाही; कारण खेळात ज्या प्रकारचे चमत्कार प्रेक्षकांना अपेक्षित असतात, तसा चमत्कार इथं डोळे दीपवून टाकत नाही. मात्र फुटबॉल खेळणार्‍या या मुलींची धमक मात्र या चमत्कारावर किंवा कौतुकावर अवलंबून नाही. भारतीय संघात खेळणारी दालिमा चिब्बर अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगते, ‘लोक आमचं कौतुक करत नाहीत, किंवा आमची नोंद घेत नाही याचंही आम्हाला विशेष काही वाटत नाही. कारण फुटबॉल खेळणं आवडतं, आम्ही देशाचं प्रतिनिधित्व करतो हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. भारतीय महिला फुटबॉलची तसं म्हटलं तर ही सुरुवात आहे. कारण मुली फुटबॉल खेळतात, खेळू शकतात, नॅशनल टीम आहे, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळते हेच आपल्याकडे अनेकांना माहिती नाही. आपले लोक पुरुष फुटबॉल वर्ल्डकप आतुरतेनं पाहतात. मात्र आपल्या मुली या खेळात पुढे जात आहेत, हेच त्यांना माहिती नसेल किंवा कळत नसेल तर काय करणार? आम्ही मात्र आमचं एकेक ध्येय डोळ्यासमोर ठेवून खेळत राहणार आहोतच.!’दालिमा म्हणतेय ते खरं आहे, कारण भारतीय महिला संघातल्या नावांवर एक नजर टाकली तरी दिसतं की, या संघात भारतातल्या सर्वदूर राज्यातल्या मुली नाहीत. फुटबॉलने आपल्याकडे मूळच धरलेलं नाही. म्हणून मुलींचा फुटबॉलही बहुदा शालेयस्तरापासून गांभीर्याने घेतला जात नाही. तिथं या मुली खेळतात. भारतीय संघात केरळच्याच आठ मुली आहेत. केरळच्या गोकुलम क्लबकडून खेळलेल्या या मुली आहेत, तर काही तामिळनाडूतल्या सेथू फुटबॉल क्लबकडून खेळलेल्या आहेत. एक-दोन ओडिशाच्या आहेत. संघाची कप्तान आहे अदिती चौहान. आणि त्यासह माइमब देवी, सौम्या नारायणसामी, नांगबाम स्वीटी, जाबमती तुडू, आशालता देवी, लाको फुती भूतिया, दालिमा चिब्बर, मिशेल मार्गारेट, संगीत बसकोर, संजू यादव, इठदुमती काथीहेरन, रंजना चानू, सुमित्रा कामराज, मनीषा कल्याण यांचा हा संघ.  अलीकडेच हा संघ साफ वुमन्स चॅम्पियनशिपही जिंकला. आज जरी त्यांची दखल हा देश घेत नसला तरी, त्यांच्या फुटबॉल फुटप्रिंटची दखल काळ घेईल, अशी आशा करायला हरकत नाही.

टॅग्स :Hima Dasहिमा दासVinesh Phogatविनेश फोगटDutee Chandद्युती चंद