शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

एक मुलगी सायकलवर एकटी भारतभ्रमणाला निघते तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 05:10 IST

तू मुलगी आहेस, एकटी जाऊ नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस, तुला कसं जमेल, एकटीनं कशी सायकलवर फिरशील या सार्‍या वाक्यांनाच आव्हान द्यायचं तिनं ठरवलं.

ठळक मुद्देपुण्याची शाश्वती भोसले एकटीनं निघाली आहे, भारत पहायचा म्हणून वर्षभर ती सायकलवर फिरणार आहे!

- राहुल गायकवाड

एक दिवस तिच्या मनात विचार आला सायकल काढू आणि थेट भारतच फिरून येऊ. कधीतरी कुठेतरी बसून मनात आलेला हा विचार तिनं सत्यात उतरवायचं ठरवलं आणि ती थेट निघाली भारताच्या सफरीवर..एकटी. सायकलवर. अनप्लॅण्ड ट्रिपवर.पुण्याची शाश्वती भोसले.महिला सक्षमीकरणाचा संदेश देत शाश्वती सायकलवर निघाली आहे. तू मुलगी आहेस, रात्नी घरी यायला उशीर करू नकोस, एकटी जाऊ नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस , तुला कसं जमेल, एकटीनं कशी सायकलवर फिरशील या सार्‍या वाक्यांनाच खरं तर शाश्वतीनं आव्हान दिलं आहे. ठरवलं तर आपण सर्वकाही करू शकतो हा विश्वास ठेवून या मुलीनं देशप्रवासासाठी सायकलला पायडल मारलं आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातील शाश्वती. तिच्या पालकांना कधी वाटलंही नव्हतं की आपली मुलगी एकेदिवशी सायकल घेऊन थेट भारतच फिरायला निघून जाईल, तिही एकटी. शाश्वतीने बीएस्सी केल्यांनंतर नोकरी करण्यास सुरु वात केली. काही वर्षे तिने नोकरी केली; परंतु नोकरीमध्ये तिचं मन काही रमत नव्हतं. आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे असं तिला नेहमी वाटायचं. एकेदिवशी तिच्या मनात विचार आला की, का नाही आपण सायकलवर भारतच फिरायला जावं. बघायला तसा विचार धाडसी होता; परंतु तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. शाश्वती महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीस होती. एकेदिवशी तिने थेट नोकरीचा राजीनामा देत घर गाठलं. घरच्यांना मुलगी घरी परत आल्याचा आनंद झाला. शाश्वतीने घरी येताच घरच्यांना तिचा प्लॅन सांगितला. सुरुवातीला घरच्यांना तिची काळजी वाटली. परंतु त्यांनीही नंतर तिच्या धाडसाचे कौतुक केले.

6 मार्च 2019 ला शाश्वतीच्या भारतभ्रमंतीची सुरु वात झाली. खरं तर शाश्वती ही सायकलपटू नाही. तिला स्पोर्ट्सची आवड आहे असंही काही नव्हतं. तिनं पुण्यातनं सायकल खरेदी केली आणि थेट नॉर्थ ईस्ट गाठलं. सोबत टेन्ट, इतर सामान असं सगळं सोबत घेतलं. कुठे जायचं कसं जायचं काहीही ठरवलं नाही. फक्त भारत पालथा घालायचा एवढाच चंग तिने मनाशी बांधलाय. दिवसाला साधारण 140 किलोमीटरचा प्रवास शाश्वती करते. रस्त्यात येणार्‍या गावांना, शाळांना ती भेट देतीये. कधी पोलिसांच्या मदतीने तर कधी सीआरपीएफचे जवान यांच्याकडून माहिती घेऊन ती आपल्या मुक्कामाचं ठिकाण शोधते. नाहीच कुठे सोय झाली तर टेन्ट आहेच. परंतु अजूनतरी शाश्वतीला राहण्याची कुठलीही अडचण आलेली नाही. जेव्हा ती तेथील स्थानिक लोकांना सांगते की महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी ती एकटी भारतभ्रमंतीवर निघाली आहे. तेव्हा लोक तिचं आनंदाने स्वागत करतात. त्यांना तिच्या धाडसाचं कौतुक वाटतं. ईशान्य भारतात नोकरीच्या तसेच शिक्षणाच्या फारशा संधी नाहीत. मात्र निसर्गसौंदर्य अफाट. या ठिकाणचं पर्यटन वाढवून येथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यालया हव्यात असं तिला वाटतं. तिथल्या खमक्या, नेकीनं उद्योग व्यवसाय करणार्‍या स्रिया खूप आवडल्याचं शाश्वती सांगते.डिसेंबर्पयत संपूर्ण प्रवास तिला पूर्ण करायचायं. या सगळ्या प्रवासातून, आलेल्या अनुभवातून तिला पुढचं आयुष्य जगायचं आहे. सध्यातरी ती फिरतीये, भारत पाहतीये, लोकांना समजून घेतीये. या सगळ्या प्रवासातून एक माणूस म्हणून ती अधिकच समृद्ध होतीये. पुण्यात ती तिच्या प्रवासाचा शेवट करणार आहे. परत आल्यानंतर सामाजिक कार्यामध्येच पुढील आयुष्य घालवण्याचा शाश्वतीचा विचार आहे.

***शाश्वतीने आत्तार्पयत आसाम, मिझोराम, नागालॅँड या भागांना भेटी दिल्या आहेत. या ठिकाणांचा तिचा अनुभव विलक्षण आहे. या ठिकाणचं निसर्गसौंदर्य, शांतता मनमोहून टाकणारं आहे, असं ती सांगते. पाठीला तान्हुलं बाळ घेऊन काम करणार्‍या या महिलांना पाहून त्यांच्या कष्टाचं तिला अप्रूप वाटतं. आत्तार्पयतच्या प्रवासात शाश्वतीला अनेक चांगले-वाईट अनुभव आले; परंतु प्रत्येक अनुभवामधून तिला काहीतरी शिकायला मिळालं आहे.