शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कायद्यावर बोट ठेवणारा पर्यावरणाचा वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 3:58 PM

पर्यावरणासाठी नुसता कळवळा असून उपयोग नाही. त्यासाठी नियम माहिती हवेत, कायद्यानं भांडता यायला हवं. तेच करणारा एक दोस्त.

- ओंकार करंबेळकर    

आपल्या आजूबाजूला होणारं प्रदूषण, आपल्याला जाणवतंही. ध्वनिप्रदूषण किंवा एखाद्या नदीमध्ये सोडल्या जाणार्‍या दूषित पाण्याबद्दल न्यायालयात खटला चालू असल्याचंही वाचतो. कधीकधी न्यायालयानं प्रदूषण करणार्‍या व्यक्तींना, उद्योगांना दंड ठोठावल्याचं आपण वाचतो. पर्यावरणाच्या र्‍हासावर आणि बदलांवर समाजातील काही सजग लोकांचे आणि पर्यावरणप्रिय वकिलांचे घारीसारखे लक्ष असते. या लोकांच्या धडपडीमुळेच न्यायालयार्पयत ही प्रकरणे जातात, दोषींना शिक्षाही होत असते.    पुण्याच्या हर्षद गरूडचं कामही काहीसं अशाच स्वरूपाचं आहे. निसर्ग, झाडं, फुलपाखरं यांची ओळख त्याला अगदी लहानपणापासूनच होती. थोडं मोठं झाल्यावर सेव्ह टायगर मोहिमेची आणि आपल्या देशात झालेल्या वाघांच्या दयनीय स्थितीची माहिती समजली. आपल्या देशात वाघ अत्यंत धोक्यात आहेत हे त्याच्यासाठी एकदम अस्वस्थ करणारं होतं. वाघांबरोबर पर्यायानं इतर प्राणीही तितक्याच संकटात असल्याचंही त्याला पुस्तकांमधून, टीव्हीवरच्या कार्यक्रमांतून समजू लागलं. त्यामुळे प्राणी, पक्षी, फूलपाखरू यांच्यामधील त्याची रुची अधिकच वाढली. पुढे कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर पर्यावरण कायदे या विषयात काम करणार्‍या लोकांची संख्या कमी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यानं वकील झाल्यानंतर पर्यावरणाचे विषय हाताळायचे असं ठरवून टाकलं. कायद्याचं शिक्षण घेतानाच त्यानं भारतात गाजलेल्या महत्त्वाच्या पर्यावरण प्रकरणांचा अभ्यास सुरू केला, त्यातील विविध मुद्दय़ांबद्दलच्या शंकांचं निरसन करून वाचन सुरू ठेवलं. 

    वकील झाल्यानंतर त्याला पहिलाच खटला दोन हत्तींसाठी लढायला मिळाला. हा खटला चालविण्यासाठी कोणीच नसल्यामुळे 2008 साली त्यासंदर्भातील सर्व काम थंडावलं होतं. त्यामुळे तो पुन्हा गतिमान करण्यासाठी प्रयत्न करायचं हर्षदनं ठरवलं. प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांच्याबरोबर सुरुवातीचा काळ हा खटला चालवल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी हर्षदने घेतली. या दोन हत्तींचा वापर भीक मागण्यासाठी केला जात होता. या हत्तींमधील एक हत्ती कजर्तजवळील एका स्टुडिओमध्ये बेकायदेशीररीत्या चित्रीकरणासाठी वापरला जात असल्याचंही समजलं. दोन्ही हत्तींची तब्येत अत्यंत खालावली होती. त्यात एका हत्तीचा मृत्यू झाला. दुसर्‍या हत्तीचा जीव वाचवण्यात मात्र हर्षद आणि इतर सहकार्‍यांना यश आलं. या जिवंत राहिलेल्या हत्तीला मथुरेच्या वाइल्ड लाइफ रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. हर्षद म्हणतो, या खटल्यानं पर्यावरणीय खटल्यांचा चांगला अनुभव मिळाला, हुरूपही वाढला. कायदेशीर प्रयत्नांमुळे पर्यावरणाला मदत होऊ शकते ही कल्पना सुखावणारी होती. या दोन हत्तींप्रमाणे सोलापूरमध्ये नान्नज येथे माळढोक आणि इतर प्राण्यांना  एका फटाक्याच्या कारखान्यामुळे धोका निर्माण झाला होता. या खटल्यात राष्ट्रीय हरित लवादाने हा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. अशा अनेक खटल्यांमध्ये काम करण्याची संधी हर्षदला मिळाली.    पर्यावरणाच्या संदर्भातील खटल्यांच्या बाबतीत, यामुळे विकासकामांना खीळ बसते असा आरोप केला जातो. हर्षद म्हणतो, भारतासारख्या विकसनशील देशांसाठी विकास नक्कीच गरजेचा आहे. मात्र त्यासाठी पर्यावरण आणि परिसंस्थेचा नाश करण्याची गरज नाही. मेट्रो ट्रेन, मोनोरेल सारखे प्रकल्प वृक्षतोड किंवा इतर प्रदूषणांच्या मार्गानी पर्यावरणाचं नुकसान करत असतील तर  थोडा विचार करण्याची गरज आहे. पर्यावरणाला पूरक अशी नीती ठरवून हे प्रकल्प तडीस नेले पाहिजेत. पर्यावरण साक्षरता शालेय शिक्षणातूनच आल्यास या प्रदूषणाला कमी करता येईल. कायद्याचा वापर करून आपण निसर्ग वाचवू शकतो, नियमावर बोट ठेवणं उत्तम.