शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:21 IST

अमोल देशमुखची ही शॉर्टफिल्म. तो स्वत: केमिस्ट. फिल्ममेकिंग शिकला आणि त्यातून त्यानं ग्राहक आणि मेडिकलवाल्याच्या नात्याची गोष्ट सांगितली. त्या फिल्मला २०१५चा राष्टÑीय पुरस्कारही मिळाला.

मेडिकलमध्ये गेल्यानंतर काय घडतं?ग्राहक डॉक्टरांनी दिलेलं प्री-स्क्रिप्शन केमिस्टला दाखवतो. तो ते पाहतो, त्यानुसार औषध काढून देतो. बिल बनवतो आणि पैसे घेतो. हे चित्र सर्वत्र सारखंच. वर वर पाहता किती कोरडा व्यवहार. पण केमिस्ट आणि औषध घेणारा ग्राहक यांचं नातं त्या काउण्टरपुरतंच मर्यादित नसतं. मग ते नातं असतं कसं या प्रश्नाचं उत्तर अमोल देशमुख यांची ‘औषध’ ही शॉर्टफिल्म देते.स्थळ सातारा जिल्ह्यातला फलटण तालुका. वेळ सकाळची. जमुना चव्हाण नावाची म्हातारी औषधाचा कागद मेडिकलवाल्याला देते. मेडिकलवाला आपल्या मेडिकलमधील कामगाराला औषधं काढून देण्यास सांगतो. तो ते काढून त्या म्हातारीला देतो. म्हातारी औषध घेऊन निघून जाते. तीन-चार तासांनी मेडिकलवाला संगणकावर बसून बिलं चेक करत असतो. ते चेक करताना त्याला एक मोठा घोळ झाल्याचं लक्षात येतं. जमुना चव्हाणच्या बिलात तिला बीपीची गोळी दिल्याचं लक्षात येतं. पेनकिलर घ्यायला आलेल्या म्हातारीला औषधांच्या नावातल्या थोड्या साम्यामुळे चुकीचं औषधं दिल्याचं लक्षात आल्यानंतर मेडिकलवाल्याची पायाखालची जमीन सरकते. तो तडक जमुना चव्हाण ज्या क्लिनिकमधून आलेली असते तिथे जातो. पण पेशण्टचं सर्व रेकॉर्ड ठेवणारी व्यक्ती जागेवर नसते. इकडे मेडिकलवाल्याची तगमग आणि धास्ती वाढते.दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिकलवाल्याला पत्ता म्हणून म्हातारीच्या गावाचं फक्त नावंच मिळतं. मेडिकलवाला केवळ गावाच्या नावावर म्हातारीला शोधत निघतो. गाव तीस-पस्तीस किलोमीटर दूर असतं. बाहेर मे महिन्यातलं रणरणतं ऊन असतं. मेडिकलवाला सोबत कामगार आणि म्हातारीची पेनकिलरची गोळी घेऊन आपल्या दुचाकीवर निघतो. दगडमातीचा कच्चा रस्ता तुडवत दुचाकी चालत असते. पण थोड्या अंतरावर ती पंक्चर होते. मेडिकलवाला आणि त्याचा कामगार कशीबशी गाडी ढकलत पंक्चरच्या दुकानापर्यंत आणतात. पंक्चर काढून झाल्यावर मनातल्या धाकधुकीसोबत दोघं म्हातारीच्या गावाकडे निघतात. गावात पोहोचल्या पोहोचल्याच एका घरासमोर माणसांची गर्दी. आतून आयाबायांचे रडण्याचे आवाज. थोडी चौकशी केल्यानंतर कळतं की, जमुना चव्हाण नावाच्या बाईचा मृत्यू झाला आहे. मेडिकलवाला आणि त्याचा कामगार गलितगात्र होतात. आपल्या मनातली भीती मनात कोंबत मेडिकलवाला म्हातारी कशी मेली? याची चौकशी करतो. औषध पिऊन मेली हे कळल्यानंतर मेडिकलवाला अजूनच घाबरतो. पण ती म्हातारी कीटकनाशक पिऊन मेली हे कळल्यावर मेडिकलवाल्याच्या जिवात जीव येतो. जी मेली ती चाळीस-पंचेचाळिशीची बाई. पण साताºयाकडच्या गावातले या वयातल्या बाईलाही म्हातारीच म्हणतात. हे लक्षात आल्यावर मेडिकलवाला गावात आणखी कोणी जमुना चव्हाण नावाची म्हातारी आहे का हे विचारतो. गावात त्या म्हातारीचा पत्ता मिळतो. धावत पळत ती दोघं तिच्या घरापर्यंत पोहोचतात. पाहतात तर काय म्हातारी अंगणात काम करत असते. मेडिकलवाला म्हातारीला भेटतो. झालेली चूक सांगतो. तिच्या हातात योग्य औषध ठेवतो. म्हातारी परसातल्या वांगी, टोमॅटो ,मिरच्यांचा वानोळा देते. चूक सुधारली, म्हातारी सुखरूप राहिली या विचारानं मेडिकलवाला सुखावतो.अशी ही साधारण गोष्ट.ही फिल्म करणारा अमोल देशमुख हा स्वत: केमिस्ट. फलटण तालुक्यात त्याचं मेडिकल. २००३ साली थोड्या वेळासाठी अमोल मेडिकलमधून बाहेर गेला आणि दुकानातल्या कामगारानं चुकीची गोळी देण्याचा प्रताप करून ठेवला. आपला पेशण्ट बरा व्हावा ही जशी एका डॉक्टराची इच्छा असते तशीच भावना मेडिकलवाल्याच्या मनात असते. त्यामुळे ग्राहकाला कागदावर लिहिलेलं योग्य औषध काढून देणं त्याचं मुख्य काम असतं. चूक अमोलकडच्या कामगाराची असते. पण त्याची सर्व जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन अमोल त्या चुकीचं प्रायश्चितही घेतो. आपल्या या भूमिकेनं म्हातारीचे प्राण वाचले हे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं.घडलेला प्रसंग, त्यामुळे झालेली तगमग, अस्वस्थता ही कायमची अमोलच्या मनात कोरली गेली. अमोलला लहानपणापासून चित्रपट बघण्याचं वेड. असं काही आपणही करायचं हे अमोलच्या डोक्यात पक्कं होतं. मेडिकलचा व्यवसाय रूळला, लग्नानंतर आयुष्याची व्यवस्थित घडी पडली तेव्हा अमोलनं वयाच्या ३३ व्या वर्षी फिल्ममेकिंग शिकायला सुरुवात केली. पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील काही मित्रांच्या मदतीनं, उमेश कुलकर्णी यांचे फिल्ममेकिंगचे वर्कशॉप अटेण्ड करून आणि समर नखाते यांचं मार्गदर्शन घेऊन अमोलनं फिल्ममेकिंगचे प्राथमिक धडे गिरवले. मग त्याचे हात फिल्म करण्यासाठी सळसळू लागले. त्याने दोन प्रयत्न केलेही. त्यासाठी पदरचे लाख-दीड लाख खर्चही झाले. घरचे ओरडू लागले. फिल्मच्या वेडानं व्यवसाय बसवू नकोस म्हणू लागले. पण अमोलला आणखी एक शॉर्टफिल्म करायचीच होती. त्यासाठी त्यानं मनात घट्ट रुजलेल्या स्वत:च्या अनुभवावर फिल्म करायची ठरवली.अमोलला या फिल्ममधून कोणालाही उपदेशाचे डोस पाजायचे नव्हते. त्याला घडलेला प्रसंग सगळ्यांना सांगायचा होता. त्यासाठी सरळ साध्या पद्धतीनं अमोलनं फिल्म केली. कमी संवादात अमोलनं केमिस्ट आणि त्याचा ग्राहक यांच्यातलं नातं नाट्यमय पद्धतीनं फिल्ममधून मांडलं. त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नाचं कौतुक म्हणून २०१५चा बेस्ट फिक्शन शॉर्टफिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार अमोलच्या ‘औषध’ला मिळाला होता.१६ मिनिटांची औषध ही फिल्म https://www.filmfare.com/awards/short-films-2017/finalists/aushadh/553 या लिंकवर बघण्यास उपलब्ध आहे.