शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

ये माया है..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 8:34 AM

राजकारणात इंडस्ट्री ४.० आलं तर केवढा गहजब झाला हे पाहिलं ना फेसबुक डाटा लीक प्रकरणात? त्यापुढं निघालोय आपण १२ डीच्या भन्नाट जगात..

- डॉ. भुषण केळकर

आपण मागील लेखात ‘बिग डाटा’बद्दल बघितलं!! आणि गेल्याच आठवड्यात ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ प्रकरण गाजलं. या ब्रिटिश कंपनीने समाजमाध्यमांची माहिती (फेसबुक वगैरे सोशल मीडिया) वापरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार मोहीम सांभाळली होती. एवढेच नव्हे तर ब्रेक्झिटचा अनपेक्षित निकाल (युरोपियन समुदायातून ब्रिटनचं बाहेर पडणं) हा सुद्धा अशाच सोशल मीडियाच्या माहिती आधारे सांभाळला गेल्याचं सांगतात. एवढंच काय तर काही अन्य युरोपीय देशांतील लहान निवडणुका आणि अगदी आफ्रिकेतील निवडणुकीतही अशा माहितीचा वापर झाल्याचे नमुद आहे.

हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे आता चर्चेत आलेली फेसबुक आणि भारतीय राजकारणाचा, प्रचाराचा संबंध असल्याची चर्चा! ही सोशल मीडियाची माहिती ‘बिग डाटा’ प्रकारात मोडते. ‘बिग डाटा’ हा इंडस्ट्री ४.० चा महत्त्वाचा भाग अगदी राजकारणापर्यंत कसा पोहोचलाय ते बघा!

अलेक्झांडर कोगान नावाच्या मानशास्त्रज्ञाने ‘धीस इज यूवर डिजिटललाइफ’ नावाच्या अ‍ॅपद्वारे उघडपणे आणि फेसबुकच्या माहितीद्वारे छुप्या पद्धतीने ५ कोटी यूझर्सचे मनोवैज्ञानिक आरखेन अर्थात प्रोफाइलिंग केलं आणि ट्रम्प यांनी कोणत्या राज्यात, कोणत्या शहरात काय मुद्द्यांवर बोलावं, कोणते शब्द वापरावेत, सभांमध्ये कोणत्या आश्वासनांवर भर द्यावा याचा आराखडाच तयार केला!

आपण हे जाणतोच की बव्हंशी निवडणुकांमध्ये जर दुरंगी लढत असेल तर अगदी कट्टर समर्थक असणारा वर्ग दोन्ही पक्षांचा सोडला तर बराच मतदारवर्ग हा तळ्यात-मळ्यात असतो. या मोठ्या वर्गाला ज्याला स्विंग व्होटर्स म्हणतात. त्यांना त्या काळात ‘नेमकं काय ऐकायला आवडेल’ याचा अत्यंत अचूक अंदाज हा सोशल मीडियाच्या माहितीच्या पृथक्करणातून मिळाल्यावर तेच शब्द, तीच आश्वासनं जर एका राजकीय पक्षाने दिली तर हा निर्णायक मतदारवर्ग त्या राजकीय पक्षाला प्रचंड यश देतो ही बिग डाटाची - पर्यायानं इंडस्ट्री ४.० ची ताकद अधोरेखित करते!

इंडस्ट्री ४.० मधील अजून एक महत्त्वाचा भाग आहे तो आॅग्युमेण्टेड रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी. हे दोन्ही आपण या लेखात समजावून घेऊ आणि त्याची उदाहरणे बघू.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी वास्तव, हे कॉम्प्युुटर ग्राफिक्स किंवा अन्य माध्यमातून वास्तवाचा आभास निर्माण करणं. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे हेड माउण्टेड डिस्प्ले. एचएमडी. म्हणजे डोक्यावर हेल्मेट घातलेल्या उपकरणांच्या सहाय्याने आपल्या डोळ्यांना / कानांना आभासी प्रतिमा निर्माण करणे. उदाहरणार्थ- असे एचएमडी घालून आपल्याला दिसू लागते की आपण उंच कड्यावरून पडतो आहोत वा आपण अत्यंत वेगळ्या कारमध्ये बसलो आहोत.

आॅग्युमेण्टेड रिअ‍ॅलिटीचा अर्थ असा आहे की, यात काही प्रमाणात का होईना, पण काही गोष्टी सत्य असतात आणि त्याला कॉम्प्युटर वा अन्य आभासी माध्यमातून जोड दिलेली असते. उदाहरण म्हणजे कङएअ या प्रख्यात स्वीडिश फर्निचरच्या दुकानात तुम्ही असं टेबल (खरखुरं) घेऊ शकतात की ज्यावर तुम्ही ठेवलेले कच्चे पदार्थ (उदा. भाज्या, फळे इ.) की जे खरे असतात. त्यावरून तुम्हाला काही आभासी पाकक्रिया दाखवल्या जातात. म्हणजे या टेबलवर पीठ, पाणी, फ्लॉवर, बटाटा असे ठेवले तर तुम्हाला आभासी माध्यमातून फ्लॉवर बटाट्याचा रस्सा आणि गरम फुलका दिसायला लागेल! ते सर्व आभासी असेल तरी तोंडाला खरे पाणी सुटेल ही गोष्ट अलहिदा!अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स हे पण आपण ऐकलेले असते. ते बरेचदा एआरमध्ये मोडते. रा-वन, रोबोट किंवा ‘बाहुबली’मुळे आपण हे सर्व अनुभवलेले असेल. यात सध्या थ्रीडी सिनेमाच्या पुढे एआरशी संलग्न असे फोरडी पासून ९ डीपर्यंत (१२ डी सुद्धा ऐकिवात आहे) सिनेमे आहेत. थ्रीडी-फोरडी मध्ये सिनेमा पाहतानाची खुर्ची हलणे, ५ डी मध्ये सिनेमात फुलं असतील तर वास येणं, सिक्स डी, सेव्हन डी मध्ये होलोग्राफिक असणं. तुम्ही स्वत: सिनेमाचा भाग होणं हे सारे भाग येतात. इंडस्ट्री ४.० ची ही मयसभेची माया आणि मायेची मयसभा, किती भिंतींमध्ये उलगडणार आहे कोण जाणे!

लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.bhooshankelkar@hotmail.com