शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

मलिहा आणि साशा

By admin | Updated: January 18, 2017 18:44 IST

त्या दोघी. व्हाइट हाउसमध्ये वाढल्या. जगाच्या सर्वोच्च सत्ताकेंद्रात. पण तरीही कुणी त्यांना सल्ले दिले, कुणी टोमणे मारले, टीकाही केली.

 ‘शो अ लिटल क्लास!’

- असं अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या मुलींना सांगण्याची कुणी हिंमत करेल असं आपल्याला वाटेल का?पण अमेरिकेत दोन वर्षांपूर्वीच्या थॅँक्सगिव्हिंगला तेही झालं. आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मुलींना वागण्याबोलण्याची कशी रीत नाही हे सांगण्यापासून ‘ती शिका’ असे सल्ले देण्यापर्यंतची चर्चा झाली.का?तर राष्ट्राध्यक्ष भाषण देत असताना त्यांच्या मुली तंग कपडे घालून, पायांवर पाय टाकून, हाताची घडी घालून बसल्या होत्या. मोकळेपणानं हसत होत्या.साशा आणि मलिया ओबामा यांची ही गोष्ट.व्हाइट हाउस नावाच्या घरात या दोन कृष्णवर्णीय मुली गेली आठ वर्षे वाढल्या. एका कृष्णवर्णीय साध्याशा जीवनशैलीच्या पालकांपोटी त्यांचा जन्म. गोऱ्या बहुसंख्य अमेरिकेनं ओबामांना आपलं नेतृत्व म्हणून स्वीकारलं असलं, तरी कृष्णवर्णीयांप्रतीची वागणूक अमेरिकेत बदललेली नव्हती. त्यामुळे ‘कृष्णवर्णीय’ वयात येणाऱ्या मुलींना जे सोसावं लागतं, त्याला या मुली तरी कशा अपवाद ठरणार होत्या?गेल्या सप्टेंबरची गोष्ट. आपलं शाळकरी शिक्षण संपवून हार्वर्डमध्ये प्रवेश मिळवलेली, वर्गात पहिली आलेली मलिया. हुशार मुलगी. सेलिब्रेशन म्हणून पार्टी होती. त्यात सिगरेट पिताना, ड्रिंक करताना, नाचतानाचे तिचे फोटो व्हायरल झाले. त्यावर भयंकर टीका झाली. खरंतर अमेरिकेत टीनएज मुलामुलींनी हे सारं करण्यात काही (आपल्याकडे असतात तशी) बंधनं नाहीत. किंवा त्यावर कुणी सांस्कृतिक आक्षेप घेत नाही. पण मलियाच्या बाबतीत हे झालं. भयंकर टीका. एकदम बॅड रोल मॉडेल वगैरेच ठरवून टाकलं माध्यमांसह लोकांनी तिला. का? तर कृष्णवर्णीय. राष्ट्राध्यक्षांच्या मुली असल्या म्हणून काय झालं, त्यांनी ‘मर्यादा’ सांभाळायला हवी असंच एक गृहीतक. ते अमेरिकेत कृष्णवर्णीय मुलींच्या वाट्याला आजही येतं. वयात येता येता त्यांच्याकडे ‘तसल्या’ नजरांनी पाहिलं जातंच, पण रंगावरून झिडकारत, त्या सुंदर नसल्याचंही ठसवलं जातं.सत्ताकेंद्री असूनही म्हणून मलिया आणि साशाची वाट सोपी नव्हती. उलट तुलनेनं इतरांपेक्षा अवघडच होती. वडील राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाइट हाउसमध्ये त्यांना घेऊन राहायला आले. तेव्हा छोटुशा होत्या या मुली. ८-९ वर्षांच्या. आता आठ वर्षांनंतर त्या मुली तरुण होत आहेत. आयुष्याची अत्यंत महत्त्वाची वर्षे त्यांनी व्हाइट हाउसमध्ये जगली आहेत. आणि त्यांचे आईबाबा म्हणतात तशा ‘स्ट्रॉँग’, प्रेमळ आणि विचारी मुली म्हणून त्या जगणं शिकतही आहेत. पण सोपं नव्हतंच हे. कुणी त्यांना ‘क्लास’ शिकवला, कुणी कपडे कसे घाला याचे फुकट सल्ले दिले. वडिलांवर टीका झाली. आईच्या दिसण्यावर, रंगावर टीका झाली. टोमणे मारले गेले.एकीकडे जगात टोकाचं कौतुक, तर एकीकडे टीका. अशा भयानक विरोधाभासी वातावरणात या मुली शाळेत जात होत्या. शिकत होत्या. वेळात वेळ काढून वडील मुलींचा अभ्यास घेत होते.कुठल्याही मध्यमवर्गीय घरांसारखंच त्यांच्या घरात शिकण्याला काही पर्याय नव्हता. शिक्षण पहिले हाच त्या घराचा अजेण्डा. एवढंच कशाला, अलीकडेच निरोपाचं भाषण दिलं ओबामांनी शिकागोत तर त्यावेळी साशा उपस्थित नव्हती. त्यावरून केवढा गदारोळ झाला. ‘व्हेअर इज साशा ओबामा?’ असे हॅशटॅग व्टिटरवर चालवले गेले.शेवटी सरकारी खुलासा करावा लागला की, तिची दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यानं ती या कार्यक्रमाला आली नाही.मुलीच्या शाळेची परीक्षा ही राष्ट्राध्यक्ष वडिलांच्या निरोपाच्या भाषणापेक्षा मोठी वाटते, हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या निरोपाच्या भाषणातही मिशेल ओबामा वारंवार शिक्षणाचं महत्त्व सांगत होत्या. जगातल्या वंचितांच्या प्रश्नांवर शिक्षण हे उत्तर आहे, असं म्हणत होत्या.आणि ओबामा आईबाबा मुलींच्या शिक्षणाचाही गांभीर्यानं विचार करताना दिसले. गेल्या वर्षी समरमध्ये साशानं एका हॉटेलात काम केलं. त्यावर टीकाही झाली. पण रोज चार तास. सिक्रेट एजण्टच्या देखरेखीखाली ही मुलगी आठवडाभर काम करत होती. टेबलं पुसत होती. आॅर्डर घेत होती. त्यातून जे ती शिकली असेल ते तर ती आयुष्यभर विसरणार नाही.आताही हॉर्वर्डला जाण्यापूर्वी वर्षभर गॅप घेण्याचा निर्णय मलियानं जाहीर केला. त्यावर तिच्या पालकांनी संमती दिली. ती त्या वर्षभरात काय करणार आहे हे माहिती नाही. पण तरीही टिपिकल अमेरिकन टीनएजर मुलांप्रमाणं गॅप घेणं, फिरणं, आपलं आपण काही शोधणं, एकटीनं युनिव्हर्सिटीत राहायला जाणं हे सारं ही मुलगीही करते आहे. त्यात घरातून बंधन आहेतच. अलीकडेच मलियाला फेसबुक वापरण्याची परवानगी आईनं दिली. साशाला ती अजूनही नाही.घरात शिस्तीचं वातावरण, बाहेर माध्यमांचे पहारे. या वातावरणात या मुली वाढल्या. आणि आता ओबामा पायउतार झाल्यावर त्यांची खरी परीक्षा सुरूच होणार आहे.. ती सुरू होतीच म्हणा तशीही.. पण आता अधिक मोठी परीक्षा असेल..

 

राहणार वॉशिंग्टनमध्येच!

कुणाला वाटेल की आता ओबामा कुटुंबीय कुठं तरी निर्जन स्थळी जाऊन राहतील. लोकांच्या नजरांपासून दूर. तर असं काही नाही. ते वॉशिंग्टनमध्येच राहणार आहेत. त्याची ‘राजकीय’ कारणं काय हा वेगळा मुद्दा. पण पालक म्हणून ओबामांनी सांगून टाकलं की, आमच्या मुली शिकताहेत. त्यांचं शिक्षण अर्धवट टाकता येणार नाही. ते महत्त्वाचं. म्हणून आम्ही इथं वॉशिंग्टनमध्येच राहणार!

ड्रायव्हिंग कसं शिकणार?

दोन वर्षांपूर्वी मलिया सोळा वर्षांची झाली. म्हणजे कार चालवण्यास पात्र. पण तिला ड्रायव्हिंग कोण शिकवणार? तिच्या वयाची अमेरिकन मुलंमुली तर बिंधास्त गाड्या चालवतात. पण या प्रश्नाचं उत्तर तिच्या आईनंच दिलं. सिक्रेट सर्व्हिसनं तिला गाडी चालवायला शिकवली. फर्स्ट फॅमिलीला सुरक्षा कारणास्तव कार चालवू दिली जात नाही. पण ओबामा आईबाबांनी मुलीला कार चालवायला शिकवलं. कारण? तिची आई सांगते, ‘गाडी चालवता येणं ही अत्यंत आत्मविश्वास देणारी गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे आपणही चारचौघांसारखेच आहोत असं तिला वाटेल. हे नॉर्मल आहोत असं वाटणं फार महत्त्वाचं.’ प्रयत्न करून ओबामांनी मुलींच्या डोक्यात सत्तेची हवा जाऊ दिली नाही.

- चिन्मय लेले, 

lelechinu@gmail.com