असं तुम्ही फेसबुकवर मित्रला सहज सांगता का?
शिष्ट अशिष्ट
फेसबुकवर आपल्या एखाद्या पोस्टवर, फालतू शेरो शायरीवर मित्रंच्या गप्पा रंगतात. विषय भरकटतो. आणि मग कसं चाललंय काम, नवीन काय असं कुणीतरी विचारतंच.
आपण सहज सांगतो काही खास नाही, यंदाही काही मनासारखं घडलं नाही, हे असंच चाललं तर दुसरं काहीतरी बघावं लागेल.
हे सारं सहज चाललेलं असतं. आपण विसरूनही जातो.
एचआरचं आपल्याकडे लक्ष आहे हे विसरूनही जातो.
आणि मग कधीतरी आपल्याला कळतं की, एचआरसह कंपनी आपल्याला ‘लॉयल’ म्हणजेच एकनिष्ठ मानायला तयार नाही. तुम्ही सतत इकडे तिकडे जॉब शोधताय, कंपनीची माहिती, त्याविषयी आपली कलुषित मतं जाहीरपणो मांडताय असा याचा अर्थ होतो.
त्यामुळेच नवीन ऑफिस शिष्टाचाराच्या संदर्भात हे लक्षात ठेवायला हवं की, आपल्या कंपनीविषयी जाहीरपणो चांगली वाईट काहीच टिप्पणी करायची नाही.
केलीच तर ते असभ्यही मानलं जातं आणि आपल्या नोकरीच्या मुळावरही उठू शकतं.
- मृण्मयी सावंत