लॉकडाउन? त्यात सीमकार्ड बिघडलं तर.?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 04:03 PM2020-05-21T16:03:59+5:302020-05-21T16:04:16+5:30

सीम कार्ड एरर देतंय? मग उपाय म्हणून ते एका फोनमधून दुसऱ्या  फोनमध्ये टाकू नका. अजून बिघडेल.

Lockdown? What if Mobile SIM card breaks? | लॉकडाउन? त्यात सीमकार्ड बिघडलं तर.?

लॉकडाउन? त्यात सीमकार्ड बिघडलं तर.?

Next
ठळक मुद्देअनेक मुलं सिम बदल करकरून फोन वापरतात, ते याकाळात टाळणंच उत्तम.

-निशांत महाजन

नुसती कल्पना करून पहा.
हे लॉकडाउन सुरूच आहे आणि तुमचं सिमकार्ड खराब झालं. फोन बंद. डेटा पॅक बंद. बाहेर दुकानं बंद.
आणि आता आपला जगाशी काही संपर्कच नाही.
कल्पनेनेही घाम फुटतो आणि म्हणावंसं वाटतं की, जरा शुभ शुभ बोला. कशाला वंगाळ बोलता.
पण तरी असं झालं तर.
म्हणजे फोन तर एकदम डबाच होऊन जाईल.
कितीही महागडा असला स्मार्टफोन; पण त्यात सिमकार्ड नसेल तर खेळ खल्लासच. 
असं कुणाच्या वाटय़ाला काही येऊ नये, सगळ्यांचे फोन चालूदेत, कार्ड चालूदेत.
पण वेळ काही सांगून नाही येत, त्यामुळे समजा कार्डला काही प्रॉब्लेम झालाय, की फोनला,
की आपलं सिम खराब झालं आहे हे जरा तपासून पाहून वेळीच कामाला लागलेलं बरं.
आणि आताचं लॉकडाउन पाहता कार्डची काळजी घेतलेलेही बरी. 
सिम म्हणजे काय तर सबस्क्रायबर आयडेण्टीटी मॉडेल. ही एक पोर्टेबल मेमरी चीप असते.
ते सिमकार्ड हीच आपली ओळख. अनेक देशात तर सिमकार्ड असेल तर ते पाहून लोकांना आता लॉकडाउनच्या काळात काही सवलतीही मिळत आहेत.
त्यामुळे आपलं हे सिम महत्त्वाचं.
त्याची काळजी कशी घ्यायची हे पाहू.
1) म्हणजे आपल्या सिमकार्डची सतत काढ घाल करू नका. कधी या फोनमध्ये कधी त्या फोनमध्ये असं करू नका.
2) शक्यतो सिमकार्डला हात लावू नये, त्याचा खेळ करू नये.
3) आपल्या फोनचं एकदम अनेकदा नेटवर्क जातं आणि ‘इनसर्ट सिम’ किंवा ‘नो सिम.’ असा मेसेज येतो. तसा मेसेज आला की अनेकजण चार फोनमध्ये आपलं कार्ड टाकून तिथं तरी ते चालतंय का हे बघतात.
तसं करू नका. कार्ड काही खराब झालंय का बघा, तरीही एरर आली तर ते फोनमध्ये घालू नका.
4) काहीजण स्वत: तज्ज्ञ असतात, ते मित्रंना सांगतात अरे उन्हाळा आहे सिमने माइश्चर धरलं असेल. तर अनेकदा सिम पुसून काढलं मऊ फडक्याने तर ते काम करायला लागतं, असा अनेकांचा अनुभवही आहे. तसं करून पहायला हरकत नाही.
पण हा काही त्यावरचा उपाय नाही. मोबाइल कंपनीशी संपर्क करून नवीन सिमकार्ड मागणंच अशावेळी योग्य.  आपण आपला स्मार्टफोन रिस्टार्ट करतो आणि मोबाइल नेटवर्क पकडायला लागतो.
5) सिम आणि फोन ही जपून वापरायची गोष्ट आहे, त्याला चिकट हात न लावणो, काळजी घेणो उत्तम. याकाळात तर शक्यतो दुस:याच्या मोबाइललाही हात लावू नये, लावल्यास हात धुणं उत्तम. सिमपेक्षा जास्त काळजी स्वत:ची घ्या.
6) अनेक मुलं सिम बदल करकरून फोन वापरतात, ते याकाळात टाळणंच उत्तम.

 

Web Title: Lockdown? What if Mobile SIM card breaks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.