शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

...थेट दिलीपकुमारच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:10 IST

जेमतेम १६ वर्षांचा होतो तेव्हाची गोष्ट. सिनेमाचा किडा चावलेला होता म्हणून पळालो. थेट मुंबईला आलो.

- नसिरुद्दीन शाह

जेमतेम १६ वर्षांचा होतो तेव्हाची गोष्ट. सिनेमाचा किडा चावलेला होता म्हणून पळालो. थेट मुंबईला आलो.त्याचं कारणही असं की एका मित्राच्या प्रेयसीनं मला सांगितलं की, तिचे वडील मुंबईत सिनेमात काम करतात. ते करतील मदत, आमच्याकडे राहायचीही सोय होईल, तू मुंबईला ये. म्हणून आलो. महिनाभर त्यांच्याकडे राहिलो. पण महिनाभरानं त्यांनी अगदी आदबीनं सांगितलं की, आता तू गेलास तरी चालेल.

- कुठं जाणार? रस्त्यावर आलो. खिशात पैसे नव्हतेच. एका झरीकाम करणाºया फॅक्टरीत राहिलो. विनातिकीट प्रवास करत रेल्वेनं फिरायचो. ताज हॉटेलमध्ये बेलबॉयची नोकरी मिळावी म्हणूनही धडपडत होतो. शेवटी नटराज स्टुडिओत काम मिळालं. ७.५० रुपये मानधन. त्या मुलीच्या चुलत भावाच्या मदतीनंच हे काम मिळालं. ‘अमन’ नावाचा सिनेमा होता. राजेंद्र कुमार मुख्य भूमिकेत. त्या सिनेमात राजेंद्र कुमार मरतो. आणि त्याच्या प्रेताभोवती जमून काही माणसं रडतात असा सीन होता. त्या रडणाºया चेहºयांत रडण्याचं काम मला मिळालं. मला मोठ्या पडद्यावर झळकायचंच होतं, काहीही करून. कॅमेरा रोल झाला. रडक्यांनी पोझिशन घेतली तेवढ्यात झटपट करून मी रडणाºयांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसलो. रडलो. ते माझं मोठ्या पडद्यावर दिसलेलं पहिलं काम.मात्र दोन महिने झाले मुलगा कुठं गेला म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली. माझे वडील अजमेर शरीफ दर्ग्याचे व्यवस्थापक. मुंबईत त्यांची फक्त एकाच व्यक्तीशी ओळख होती. ती म्हणजे दिलीपकुमारची बहीण. तिनं मला शोधलं, घरी घेऊन गेली. एका बंगल्याच्या तळघरात मला ठेवलं. अर्थात तरी मी घरभर फिरायचो. नंतर कळलं हे दिलीपकुमारचं घर. ड्रॉइंग रूममध्ये शेल्फवर फिल्मफेअरच्या ट्रॉफिज ठेवलेल्या. एकदा हिंमत करून मी एक हातात घेतली. एका हातात ट्रॉफी, दुसºया हातानं लोकांना अभिवादन केलं. भाषणही ठोकलं. तेवढीच प्रॅक्टिस करून घेतली. एकदा तर मी दिलीपकुमारलाही भेटलो. त्यांनी माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखंच केलं. पण ते ठिके..पुढे मी दिलीपकुमार बरोबर काम केलं; पण त्यांना काही हा किस्सा सांगितला नाही, त्यांना आठवण्याचा तर प्रश्नच नव्हता..( नसिरुद्दीन शाह यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘अ‍ॅण्ड देन वन डे’ या पुस्तकातून संबंधितांच्या सौजन्यानं साभार!)

 

टॅग्स :Naseeruddin Shahनसिरुद्दीन शाह