सुपर डॅन - बॅडमिंटनमधला सुपरहिरो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:37 PM2020-07-09T17:37:56+5:302020-07-09T17:41:18+5:30

त्याचं खेळण्याचं पॅशन अजब आणि जिंकण्याचंही. वादग्रस्त तर तो होताच; पण तरीही खास होता.

Lin Dan - Superhero in badminton. supen dan | सुपर डॅन - बॅडमिंटनमधला सुपरहिरो.

सुपर डॅन - बॅडमिंटनमधला सुपरहिरो.

googlenewsNext
ठळक मुद्देत्याचं बॅडमिंटनप्रति वेड, जिंकण्याची तहान ही सरस ठरली होती. ती तशीच सोबत घेऊन त्यानं निवृत्ती जाहीर केली.

- सारिका पूरकर -गुजराथी

न डॅन अर्थात सुपर डॅन.
बॅडमिंटनच्या जगाला त्याचं नाव नवं नाही. एकेकाळी बॅड बॉय ऑफ बॅडमिंटन म्हणूनच त्याला ओळखलं जायचं. हातावर गोंदवून घेतलेले भरपूर टॅटूज (या टॅटूजमुळेही तो अनेकवेळा वादाच्या भोव:यात सापडायचा) , चिडका स्वभाव. मॅच संपल्यावर कधी स्वत:चे बूटच प्रेक्षकांत भिरकावून द्यायचा तर कधी ट्रेनिंग सेशनमध्ये गोंधळ घालायचा. कधी अम्पायरशीच हुज्जत घालायचा, तर रागाच्या भरात कधी रॅकेटच भिरकावून द्यायचा नेटवर, कधी शर्ट काढून डान्स करायला लागायचा. कोचेसला धक्काबुक्की करण्याइतपत त्याची मजल जायची.
पण वयाच्या 37व्या वर्षी त्यानं नुकतीच निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या करिअरची आकडेवारी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली. तेव्हा अनेकांना वाटलं असेल की रिटायर होताना अशी कमाई असावी सोबत. नाहीतर काय करिअर केलं म्हणायचं!
66 सिंगल्स टायटल्स. दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता, दोनदा वल्र्ड कप सुवर्णपदक विजेता, पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेता, सहा वेळा ऑल इंग्लंड विजेतेपद. हे काहीसं वानगीसाखल सांगितलं. ही आहे सुपर डॅनची करामत.  प्रतिस्पध्र्याला चिरडून टाकण्यासाठीच तो प्रसिद्ध होता. जिंकण्याचा भलताच जज्बा घेऊन तो जगला. त्याची ही गोष्ट. लिन लहान होता तेव्हा त्याच्या आईवडिलांना वाटायचं की, त्याने पियानो शिकावा. पण वयाच्या पाचव्या वर्षीच लिनने पियानो ऐवजी बॅडमिंटन रॅकेट निवडली. त्याच्यातल्या याच आक्र मकतेने त्याची जगात बेस्ट बनण्याची भूक वाढवली आणि तीच त्याच्या यशाची पायरीही बनवली. कोर्टवरही त्यानं तेच केलं. मी कोर्टवर मारलेली प्रत्येक जम्प ही जिंकण्याच्या उद्देशानेच मारलेली असायची हे लिनचे शब्दच त्याची पॅशन सांगतात. माङयाकडून जे शक्य होतं ते सर्व मी या खेळाला दिलं हे त्याचे निरोपाचे शब्द म्हणून अगदी खरेच आहेत. 
सुपर  डॅनची स्टाइल, स्ट्रोक्स हे काही एका रात्नीत त्याच्या नावावर जमा झालेले नाहीत. त्यामागे त्याची कठोर मेहनत होती. लहानपणापासूनच एका ठिकाणी फार वेळ शांत न बसू शकणारा धडपडय़ा लिन स्वत:ला सतत पुश करीत राहिला. वयाच्या सातव्या वर्षी लिन फुजियाच्या बॅडमिंटन स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाला. त्याची उंची खूप कमी होती म्हणून त्याला प्रवेश नाकारला जात होता; पण लिनने हट्टाने प्रवेश मिळवला. या स्कूलमध्ये विद्याथ्र्याना पुरेसे जेवणही काही वेळेस मिळत नव्हते. फुजिया प्रचंड उष्ण शहर, इतके की रात्नीही तुम्ही झोपू शकत नाही. ही परिस्थिती व हाल पाहून लिनच्या आईने लिनला घरी परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, परंतु लिन ठाम राहिला, मला चॅम्पियन बनायचेय, मी येथेच राहणार म्हणत तो एक दशक त्या स्कूलमध्ये राहिला. प्रत्येक अपयशातून तो शिकत गेला, स्वत:ला बदलवत गेला. आता-आता त्याचे जे फूटवर्क, स्ट्रोक्स दिसायचे ते त्याच्या वयाच्या विशीत दिसत नसत. आक्र मकतेबरोबरच लिनने नेहमीच त्याचा गेम बदलला, त्यात शिस्त आणली. स्वत:च्या खेळात नवनवीन प्रयोग करण्यासाठी धाडस लागते,  ते त्याने दाखवले. म्हणूनच तो स्पेशल ठरला. सहसा सामना  खेळण्यापूर्वी खेळाडू जिममध्ये घाम न गाळता स्वत:ला फ्रेश ठेवतात; परंतु लिन मात्न सामन्यांपूर्वीदेखील जिममध्ये सापडायचा. जिममधला थकवा त्याच्या खेळात कधीच जाणवायचा नाही. हा टफनेस त्याने कमावला होता. रॅलीज, हे त्याने त्याच्या खेळाचं प्रमुख अस्र बनवून टाकलं होतं. प्रतिस्पर्धीना प्रदीर्घ रॅलीजद्वारे तो जेरीस आणायचा; पण तो स्वत: मात्न अत्यंत निर्णायक क्षणीदेखील कूल राहून सामना फिरवायचा. त्याचे क्र ॉस कोर्ट स्मॅश तर चाहते निव्वळ अफलातून. रिकी पॉटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती अशी अफवा पूर्वी पसरली होती; पण सुपर डॅनच्या शरीरातच कुठेतरी स्प्रिंग आहे की काय असं त्याचा कोर्टवरील चपळ वावर पाहून भासत असे. 


लिन हळूहळू स्टायलिश, ग्लॅमरस, यूथ आयकॉन बनला होता. पण स्टाइल आणि ग्लॅमर नेहमीच विजय मिळवून देऊ शकत नाहीत. लिनने या दोन गोष्टींबरोबर नेहमीच त्याची जिंकण्याची भूक शाबूत ठेवली होती, वाढतीच ठेवली होती. त्याच्या बिनधास्त स्वभावामुळे अनेक जणांनी नॅशनल टीममध्ये तो नको म्हणूनही मत व्यक्त केले होते. पण लिन या सा:यांना पुरून उरला, कारण त्याचं बॅडमिंटनप्रति वेड, जिंकण्याची तहान ही सरस ठरली होती. ती तशीच सोबत घेऊन त्यानं निवृत्ती जाहीर केली.


(सारिका मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: Lin Dan - Superhero in badminton. supen dan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.