शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘जीडी’तले दिवे..

By admin | Updated: April 27, 2017 15:56 IST

- तरच होईल तुमचंनोकरीसाठी सिलेक्शन

 - विनोद बिडवाईक  

 
कुठल्याही नोकरीसाठी सध्या ग्रुप डिस्कशन  (जीडी) अनिवार्य आहे. त्यात तुम्ही किती छाप पाडता, तुमचे कोणते गुण तिथे उठून दिसतात, त्यावर तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे ठरतं.
 
पण नेमकं काय होतं ग्रुप डिस्कशनमध्ये?
 
ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही गप्पच बसता? किंवा उठून दिसायचं म्हणून खूप बोलता, दुसर्यांना संधी न देता आपलेच विचार रेटायला लागता? 
 
मग अवघड आहे, तुमचं सिलेक्शन होणं.  
 
‘‘नोकरीच्या निवड प्रक्रि येमध्ये गटचर्चा एवढी महत्त्वाची का मानली जाते? विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात. गटचर्चेमध्ये एखादा मुलगा नाही चांगला बोलला तर काय फरक पडतो? कसं बोलायचं हे त्याला नंतरही शिकवता येईल?’’ 
- एका कॉलेजमधील प्राध्यापक मला विचारत होते. ‘‘कसं बोलायचं, हे नक्कीच शिकवता येईल, पण काय बोलायचं, केव्हा बोलायचं, हे नाही शिकवता येणार.’’
- मी त्यांना उत्तर दिलं. 
 
ग्रुप डिस्कशन अथवा गटचर्चा ही नोकरीसाठीच्या निवडप्रक्रि येमधील एक महत्त्वाची पायरी असते.  या गटचर्चेमध्ये काय बघितलं जातं? पंधरा-वीस मिनिटांच्या समूहचर्चेत असं काय असतं की, ज्या आधारावर विद्यार्थ्यांचं करिअर अवलंबून असतं/
 
बर्याचदा चांगली महाविद्यालयं विद्यार्थ्यांकडून ग्रुप डिस्कशनची तयारी करून घेतात. अर्थात, ही तयारी एवढी जास्त असते की हे विद्यार्थी तयारी करून आले आहेत हेही जाणवते आणि तयारी करून आल्यासारखी चर्चा झाली की समजायचे, काहीतरी घोटाळा नक्कीच होणार आहे. 
 
 
 
 
गटचर्चेआधी एखादा विषय दिलेला असतो. हा विषय कोणताही असू शकतो. एखाद्या विषयात विद्यार्थ्यांच्या नॉलेजचा आणि वाचनाचा कस लागतो. 
 
उदा. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील पाच वर्षे कशी असतील?’ 
 
- या विषयावर बोलताना तुम्हाला मुळातच भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती असायला हवी, त्यासाठी तुमचं वाचन, अर्थव्यवस्थेबद्दल तुमची मतं आणि भविष्याबद्दलची मतं तर्कसंगत मांडता यायला हवी, ते तुम्ही कसं मांडता हे महत्त्वाचं ठरतं. 
 
दुसर्या प्रकारात, तुम्हाला विषयाची जाण नसली, माहिती नसली तरी, तुमच्या मतावर तुम्ही गटचर्चेमध्ये बोलू शकतात. 
 
तुमची विचार करण्याची क्षमता, थॉट प्रोसेस, विचारांची खोली आणि तुम्ही तुमची मतं कशी मांडता, लॉजिक, योग्य शब्दांचा प्रयोग, विषयातील खोली, दुसर्यांच्या मतांचा आदर हे सारं बारकाईनं बघितलं जातं. तुम्ही निव्वळ बोलायला लागला आणि दुसर्यांना संधी न देता आपलेच विचार रेटायला लागलात की समजा, तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता कमी आहे. 
 
अर्थात, तुमचे इतरही गुणधर्म येथे बघितले जातात. पण महत्त्वाचं म्हणजे टीममध्ये तुम्ही सर्वांना कसे सामावून घेता, टीममध्ये तुम्ही योग्यप्रकारे कसा भाग घेता, इतरांशी जुळवून घेण्याची तुमची तयारी आहे की नाही हेही बघितले जातं. 
 
समूहचर्चा करणं आणि त्याची तयारी करणं ही काही फारशी कठीण गोष्ट नाही. तुम्ही एरवी तुमच्या मित्नांसोबत चर्चा करताच ना? हीच चर्चा थोडी वेगळ्या लेव्हलवर करा. 
 
एखाद्या विषयावर टिप्पणी करण्याची आपली सवय असतेच. ती व्यविस्थत मुद्देसूद, लॉजिकल करण्याची सवय लावा. 
 
बोलत राहा, घाबरू नका आत्मविश्वासानं आपली मतं मांडा, थोडं वाचन करा, टीव्ही बघा, इतरांची मतं विचारा. एकमेकांना बोलतं करा. इतरांची मतं पटली नाहीत तरी ऐकून घ्यायची तयारी ठेवा. शेवटी जॉबमध्येही हेच करायचं असतं.  
Vinod.Bidwaik@dsm.com
 
 
(शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत सॉफ्ट स्किल्स हा आपल्या जगण्यातला अविभाज्य भाग. त्याविषयीचीच ही चर्चा.)